iPhone वर कॉल फॉरवर्डिंग सेट अप करणे

तुमच्याकडे GSM नेटवर्कद्वारे मोबाइल सेवा असल्यास तुम्ही iPhone वर कॉल फॉरवर्डिंग सेट अप करू शकता.

तुमच्याकडे CDMA नेटवर्कद्वारे मोबाइल सेवा असल्यास, कॉल फॉरवर्डिंग सेट अप करण्याविषयी माहितीसाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायरशी संपर्क साधा.

  1. तुमच्या iPhone वरील ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’फोन’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘कॉल फॉरवर्डिंग’ वर टॅप करा, नंतर ‘कॉल फॉरवर्डिंग’ चालू करा.

    कॉल फॉरवर्डिंग चालू असताना कॉल फॉरवर्डिंग आयकॉन हा स्टेटस बार मध्ये दिसतो.

  4. ड्युअल SIM असलेल्या मॉडेल वर, लाइन निवडा.

  5. ‘ह्यावर फॉरवर्ड करा’ वर टॅप करा, तुम्हाला ज्याला पुनर्निर्देशित करायचे आहे तो नंबर प्रविष्ट करा, नंतर ‘मागे’ वर टॅप करा.

जेव्हा तुम्ही कॉल फॉरवर्ड करण्यासाठी iPhone सेट करता तेव्हा तुम्ही मोबाइल नेटवर्कच्या रेंजमध्ये असणे आवश्यक आहे, अन्यथा कॉल फॉरवर्ड केले जाणार नाहीत.

लाइन व्यस्त असताना किंवा सेवेत नसताना तुमचे नेटवर्क प्रोव्हायडर सशर्त कॉल फॉरवर्डिंगला सपोर्ट करत असल्यास, सेटअप माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.