ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone सक्तीने रीस्टार्ट करणे

iPhone प्रतिसाद देत नसल्यास आणि तुम्ही तो बंद आणि नंतर चालू करू शकत नसल्यास, तो सक्तीने रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न करा.

  1. ’व्हॉल्यूम अप’ बटण दाबा आणि त्वरित सोडा.

  2. ’व्हॉल्यूम डाउन’ बटण दाबा आणि त्वरित सोडा.

  3. साइड बटण दाबा आणि होल्ड करा.

  4. जेव्हा Apple लोगो दिसेल, तेव्हा साइड बटण सोडा.

दोन iPhone मॉडेलचे चित्रण, एक होम बटणासह आणि एक होम बटणाशिवाय स्क्रीन वरच्या बाजूस असलेले. प्रत्येक मॉडेलची व्हॉल्यूम बटणे iPhone च्या डाव्या बाजूला असतात आणि साइड बटण उजव्या बाजूला असते.

ह्या टप्प्यांनुसार प्रयत्न करूनही iPhone रीस्टार्ट होत नसल्यास, तुमचा iPhone चालू होत नसल्यास किंवा बराच काळ बंद असल्यास काय करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा. किंवा तुम्ही रीस्टार्ट केल्यानंतर तुमचा iPhone अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्यास, iPhone सपोर्ट संकेतस्थळ पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.