ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘व्हॉइस मेमोज’ मध्ये रेकॉर्डिंग व्यवस्थापित करणे

तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंगला ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करू शकता आणि तुमचे रेकॉर्डिंग फोल्डरमध्ये व्यवस्थापित करू शकता.

नोट : Apple Watch रेकॉर्डिंग, अलीकडे हटवलेले रेकॉर्डिंग आणि ‘आवडते’ ‘स्मार्ट फोल्डर’ मध्ये गटबद्ध केले जातात, जे प्रकार आणि सब्जेक्टनुसार ऑटोमॅटिकली फाइल एकत्रित करतात.

रेकॉर्डिंगला ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करणे

  1. तुमच्या iPhone वर व्हॉइस मेमोज ॲप (युटिलिटी फोल्डरमध्ये) वर जा.

  2. रेकॉर्डिंगच्या यादीमध्ये, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुम्हाला ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करायचे असलेल्या रेकॉर्डिंगवर टॅप करा, ‘अधिक कृती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘आवडते’ बटण वर टॅप करा.

    • रेकॉर्डिंग यादीच्या वर ‘संपादित करा’ वर टॅप करा, एक किंवा अधिक रेकॉर्डिंग सिलेक्ट करा, ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, ‘फोल्डरमध्ये मूव्ह करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘आवडते’ वर टॅप करा. (जर ’आवडते’ फोल्डर नसेल, तर फील्डमध्ये ’आवडते’ प्रविष्ट करून एक फोल्डर तयार करा.)

‘आवडते’ म्हणून चिन्हांकित केलेले रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली ‘आवडते’ फोल्डरमध्ये दिसतात.

रेकॉर्डिंग फोल्डरमध्ये व्यवस्थापित करणे

तुम्ही संबंधित रेकॉर्डिंग एकत्रितपणे फोल्डरमध्ये गटबद्ध करू शकता जेणेकरून तुम्ही त्यांना सहजपणे शोधू शकाल.

  1. तुमच्या iPhone वर व्हॉइस मेमोज ॲप (युटिलिटी फोल्डरमध्ये) वर जा.

  2. रेकॉर्डिंगच्या यादीच्या वर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  3. एक किंवा अधिक रेकॉर्डिंग सिलेक्ट करा, ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, ‘फोल्डरमध्ये मूव्ह करा’ वर टॅप करा, नंतर फोल्डर निवडा.

    नवीन फोल्डर तयार करण्यासाठी, ‘नवीन फोल्डर’ बटण वर टॅप करा, फोल्डरचे नाव टाइप करा, नंतर ‘जतन करा’ वर टॅप करा.

तुमचे फोल्डर बघण्यासाठी, मागे बटण वर टॅप करा; एक फोल्डर टॅप करून त्यातील कॉण्टेंट तपासा.

रेकॉर्डिंगच्या यादीवर परत जाण्यासाठी, ‘सर्व रेकॉर्डिंग’ वर टॅप करा.

फोल्डर हटवणे किंवा रीऑर्डर करणे

  1. तुमच्या iPhone वर व्हॉइस मेमोज ॲप (युटिलिटी फोल्डरमध्ये) वर जा.

  2. फोल्डरच्या यादीवर जाण्यासाठी मागे बटण वर टॅप करा.

  3. फोल्डरच्या वर ‘संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • फोल्डर हटवा : फोल्डरच्या पुढे हटवा बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ट्रॅश करा’ बटण वर टॅप करा.

    • फोल्डरची क्रमवारी बदला : कोणत्याही फोल्डरच्या पुढे ‘रिऑर्डर करा’ बटण वर ड्रॅग करा.

  4. 'पूर्ण' वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.