ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘Mail’ मध्ये ईमेलला उत्तर देणे आणि फॉरवर्ड करणे

तुम्ही ‘Mail’ ॲपमध्ये ईमेलला उत्तर देऊ किंवा फॉरवर्ड करू शकता.

उत्तराचे पर्याय दाखवणारा ईमेल. स्क्रीनच्या मधोमध, डावीकडून उजवीकडे उत्तर द्या, सर्वांना उत्तर द्या, फॉरवर्ड करा आणि ट्रॅश असे पर्याय आहेत.

ईमेलला उत्तर देणे

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेशावर टॅप करा, ‘उत्तर द्या’ बटण वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी एक करा :

    • फक्त प्रेषकाला उत्तर द्या : ‘उत्तर द्या’ वर टॅप करा.

    • प्रेषक आणि इतर प्राप्तकर्त्यांना उत्तर द्या : ‘सर्वांना उत्तर द्या’ वर टॅप करा.

  3. तुमचा प्रतिसाद टाइप करा, त्यानंतर पाठवण्यासाठी पाठवा बटण वर टॅप करा.

तुम्ही ईमेलला उत्तर देता तेव्हा काही टेक्स्ट कोट करा

जेव्हा तुम्ही ईमेल संदेशाला उत्तर देता, तेव्हा तुम्ही प्रेषकाचे टेक्स्ट समाविष्ट करून तुम्ही कशाला प्रतिसाद देत आहात हे स्पष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. प्रेषकाच्या संदेशामध्ये, टेक्स्टच्या पहिल्या शब्दाला टच आणि होल्ड करा, नंतर शेवटच्या शब्दाकडे ड्रॅग करा. (टेक्स्ट सिलेक्ट करा, कट करा, कॉपी करा आणि पेस्ट करा पहा.)

  3. ‘उत्तर द्या’ बटण वर टॅप करा, ‘उत्तर द्या’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचा संदेश टाइप करा.

नोट : कोट केलेल्या टेक्स्टचे इंडेंटेशन बंद करण्यासाठी सेटिंग  > ॲप > Mail > ‘कोट लेव्हल वाढवा (कंपोझिंगच्या खाली)’ वर जा आणि नंतर ‘कोट लेव्हल वाढवा’ बंद करा.

ईमेल फॉरवर्ड करणे

तुम्ही नवीन प्राप्तकर्त्यांना ईमेल संदेश फॉरवर्ड करून पाठवू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेशावर टॅप करा, ‘उत्तर द्या’ बटण वर टॅप करा, नंतर ‘फॉरवर्ड करा’ वर टॅप करा.

    जर मूळ संदेशामध्ये अटॅचमेंट असतील—जसे की छायाचित्रे किंवा डॉक्युमेंट—तर तुम्ही ते फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या संदेशामध्ये समाविष्ट करायचे की नाही हे ठरवू शकता. ‘समाविष्ट करा’ किंवा ‘समाविष्ट करू नका’ निवडा.

  3. नवीन प्राप्तकर्त्यांचे ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा.

  4. संदेशामध्ये टॅप करा, त्यानंतर तुमचा प्रतिसाद टाइप करा. फॉरवर्ड केलेला संदेश खाली दिसतो.

ईमेलवर फॉलो अप करणे

जर तुम्ही ईमेल संदेश पाठवला आणि कित्येक दिवस प्रतिसाद मिळाला नाही, तर संदेश ऑटोमॅटिकली तुमच्या इनबॉक्सच्या शीर्षस्थानी परत जातो, ज्यामुळे तुम्हाला फॉलोअपची आठवण ठेवण्यास मदत होते.

फॉलो अप सूचना बंद करण्यासाठी, सेटिंग  > ॲप > ‘Mail’ वर जा, नंतर ‘फॉलो अप सूचना’ बंद करा.

‘Mail’ मध्ये ‘ऑटोमॅटिकली उत्तर द्या’ सेट अप करणे

iCloud.com वर, तुम्ही इनकमिंग ईमेल संदेशांना प्रतिसाद देण्यासाठी ‘ऑटोमॅटिकली उत्तर द्या’ सेट अप करू शकता किंवा संदेश दुसऱ्या इनबॉक्समध्ये ऑटोमॅटिकली फॉरवर्ड करू शकता. iCloud.com वर ‘Mail’ मध्ये ‘ऑटोमॅटिकली उत्तर द्या’ सेट अप करा पहा.

‘स्मार्ट उत्तर’ वापरणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही त्याचा वापर तुम्हाला प्राप्त झालेल्या ईमेलला उत्तर सुचवण्यासाठी करू शकता. Mail ॲपमध्ये Apple Intelligence वापरा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.