ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ’शोधाशोध’ मध्ये आयटम किंवा AirTag मागे ठेवल्यास विलगीकरण अलर्ट्स सेट करणे

शोधाशोध ॲपमध्ये, तुम्ही AirTag किंवा इतर आयटमसाठी विलगीकरण अलर्ट्स चालू करू शकता जेणेकरून तुम्ही चुकून ते मागे विसरणार नाही. तुमचे लोकेशन डिव्हाइस शेअर करत असताना आयटमपासून वेगळे झाल्यावर प्रत्येक वेळी तुम्हाला अलर्ट प्राप्त होतो.

तुम्ही ‘विश्वासार्ह स्थान’ देखील सेट करू शकता, जी स्थाने अशी आहेत की जिथे अलर्ट प्राप्त न होताही तुम्ही आयटम राहू देऊ शकता.

महत्त्वाचे : विलगीकरण अलर्ट्स प्राप्त करण्यासाठी, शोधाशोध ॲपला तुम्ही नोटिफिकेशनला अनुमती दिल्याची खात्री करा. iPhone वर नोटिफिकेशन सेटिंग बदलणे पहा.

  1. तुमच्या iPhone वर शोधाशोध ॲप वर जा.

  2. स्क्रिनच्या तळाशी असलेल्या आयटमवर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला अलर्ट सेट करायचा आहे त्या आयटमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘नोटिफिकेशन’ च्या खाली, ’मागे राहिल्यास सूचित करा’ वर टॅप करा.

  4. ’मागे राहिल्यास सूचित करा’ चालू करा.

  5. जर तुम्हाला ’विश्वासार्ह स्थान’ समाविष्ट करायचे असेल, तर तुम्ही सुचवलेले स्थान निवडू शकता किंवा ‘नवीन स्थान’ वर टॅप करू शकता, नकाशावरील स्थान सिलेक्ट करू शकता, नंतर ’पूर्ण’ वर टॅप करू शकता.

  6. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.