ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘संपर्क’ मध्ये अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

संपर्क ॲपमध्ये, तुम्ही अनेक अकाउंट समाविष्ट करू शकता—जसे की iCloud, Microsoft Exchange, Google आणि Yahoo. तुम्ही डिफॉल्ट अकाउंट निवडू शकता, LDAP किंवा CardDAV अकाउंट सेट अप करू शकता, अकाउंट दाखवू किंवा लपवू शकता आणि अकाउंट हटवू शकता.

तुमचे iCloud संपर्क समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. [तुमचे नाव] वर टॅप करा, नंतर iCloud वर टॅप करा.

  3. ‘iCloud वर जतन झाले’ च्या बाजूला असलेल्या ‘सर्व पहा’ वर टॅप करा, नंतर ‘संपर्क’ चालू करा.

इतर अकाउंटमधून तुमचे संपर्क समाविष्ट करणे

Microsoft Exchange, Google, आणि Yahoo ह्यासारख्या इतर अकाउंटमध्ये तुमचे संपर्क मॅनेज करण्यासाठी तुम्ही संपर्क ॲप वापरू शकता.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘संपर्क अकाउंट’ वर टॅप करा, नंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. अकाउंट निवडा, त्यात साइन इन करा, त्यानंतर ‘संपर्क’ चालू करा.

नोट : जर तुम्ही Push नोटिफिकेशन्सला सपोर्ट करत नसलेले अकाउंट समाविष्ट केले, तर तुम्ही अकाउंटमधील तुमचे संपर्क अपडेट करण्यासाठी फेच शेड्यूल सेट करू शकता. सेटिंग  > ॲप्स > ‘संपर्क’ वर जा, ‘संपर्क अकाउंट’ वर टॅप करा, नंतर ‘नवीन डेटा फेच करा’ वर टॅप करा. ’फेच’ च्या खाली, शेड्यूल निवडा. तुम्ही ‘ऑटोमॅटिकली’ निवडल्यास, तुमचा iPhone चार्ज होत असताना आणि Wi-Fi ला कनेक्ट केलेला असताना नवीन डेटा डाउनलोड केला जातो.

संपर्क प्रोव्हायडर ॲपमधून संपर्क समाविष्ट करणे

तुम्ही थर्ड पार्टी ॲपना संपर्क ॲपमध्ये संपर्क समाविष्ट करण्याची अनुमती देऊ शकता. संपर्क हे थर्ड पार्टी ॲपद्वारे मॅनेज केले जातात आणि ‘संपर्क’ मध्ये संपादित केले जाऊ शकत नाहीत.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘प्रोव्हायडर’ वर टॅप करा, त्यानंतर ॲपसाठी पर्याय चालू करा.

तुमचे डिफॉल्ट अकाउंट निवडणे

जिथे नवीन संपर्क ऑटोमॅटिकली समाविष्ट केले जातात ते डिफॉल्ट अकाउंट तुम्ही सिलेक्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘डिफॉल्ट अकाउंट’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला डिफॉल्ट करायचे असलेल्या अकाउंटवर टॅप करा.

व्यवसाय किंवा शाळा डिरेक्टरी ॲक्सेस करण्यासाठी LDAP किंवा CardDAV अकाउंट सेट अप करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘संपर्क अकाउंट’ वर टॅप करा, नंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. ‘इतर अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर ‘LDAP अकाउंट किंवा CardDAV अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  5. अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

संपर्क अकाउंट काढून टाकणे

जेव्हा तुम्ही अकाउंट काढून टाकता, तेव्हा त्या अकाउंटमधील संपर्क ह्यापुढे तुमच्या iPhone वर दिसणार नाहीत. संपर्क तुमच्या इंटरनेट अकाउंटमध्ये (उदाहरणार्थ, iCloud.com किंवा Google) आणि तुम्ही आधी सेट अप केलेल्या इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये राहतात.

  • iCloud संपर्क बंद करा : सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा. ‘iCloud वर जतन झाले’ च्या पुढे असलेल्या ‘सर्व पहा’ वर टॅप करा, नंतर ‘संपर्क’ ॲप बंद करा.

    तुम्ही तुमच्या iPhone वर पूर्वी सिंक केलेले iCloud संपर्क ठेवण्याचा किंवा हटवण्याचा पर्याय निवडू शकता.

  • अकाउंट वापरणे तात्पुरते थांबवा : सेटिंग  > ॲप > संपर्क > ‘संपर्क अकाउंट’ वर जा, ‘अकाउंट’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ बंद करा.

    तुमच्या iPhone वर त्या अकाउंटमधील संपर्क पुन्हा बघण्यासाठी, ‘संपर्क’ चालू करा.

  • अकाउंट हटवा : सेटिंग  > ॲप्स > संपर्क > ‘संपर्क अकाउंट’ वर जा, अकाउंटवर टॅप करा, त्यानंतर ’अकाउंट हटवा’ वर टॅप करा.

    तुम्हाला ‘साइन आउट करा’ किंवा ‘अकाउंट हटवा’ दिसत नसल्यास, तुमचे अकाउंट तुमच्या संस्थेद्वारे मॅनेज केलेले असू शकते. काढून टाकण्याच्या सूचनांसाठी ॲडमिनिस्ट्रेटर पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.