ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमचा iPhone आणि इतर डिव्हाइसेस दरम्यान फाइल ट्रान्सफर करणे

तुमच्या iPhone आणि iPad, Mac किंवा Windows डिव्हाइससारख्या इतर डिव्हाइसेस दरम्यान छायाचित्रे, व्हिडिओज आणि इतर फाइल ट्रान्सफर करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही AirDrop सारखे फीचर्स किंवा Mail आणि संदेश सारख्या ॲप्ससह वायरलेस पद्धतीने फाइल ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्ही केबलद्वारे तुमचा iPhone संगणक किंवा बाह्य स्टोरेज डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता आणि नंतर फाइल ट्रान्सफर किंवा सिंक करू शकता.

तुम्ही तुमच्या फाइल, छायाचित्रे, व्हिडिओज आणि बरेच काही संग्रहित करण्यासाठी iCloud चा वापर करू शकता आणि तुम्ही एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले आहे अशा तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सर्व काही अद्ययावत ठेवू शकता.

महत्त्वाचे : ॲपच्या मालकी स्वरुपामध्ये जतन केलेल्या फाइल, जुन्या सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये जतन केलेल्या फाइल आणि कॉपीराइट्सने संरक्षित केलेल्या फाइल ह्यासारखा काही प्रकारच्या डेटासाठी ट्रान्सफर करणे, शेअर करणे, किंवा सिंक करणे प्रतिबंधित केले जाऊ शकते.

तुमच्या iPhone मधून फाइल वायरलेस पद्धतीने ट्रान्सफर करणे

तुमच्या iPhone मधील छायाचित्र, फाइल किंवा इतर आयटम जवळपासच्या Apple डिव्हाइसवर त्वरित शेअर करण्यासाठी, तुम्ही AirDrop चा वापर करू शकता. जवळपासच्या Apple डिव्हाइसेसवर आयटम्स पाठवण्यासाठी AirDrop वापरणे पहा.

Mail किंवा संदेश ॲपमध्ये अटॅचमेंट म्हणून फाइल पाठवून तुम्ही तुमच्या iPhone मधून दुसऱ्या डिव्हाइसवर देखील फाइल ट्रान्सफर करू शकता.

तुमचा iPhone केबलसह कनेक्ट करून फाइल ट्रान्सफर करणे

तुमच्या संगणकावर, बाह्य स्टोरेज डिव्हाइसवर किंवा फाइल सर्व्हरवर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही तुमचा iPhone तुमच्या Mac किंवा Windows डिव्हाइसशी केबलने कनेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या Mac किंवा Windows डिव्हाइसवर फाइल ट्रान्सफर करता, तेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावरील मॉडेल आणि ऑपरेटिंग सिस्टीमनुसार Finder, Apple डिव्हाइसेस किंवा iTunes वापरू शकता.

नोट : केवळ iPhone ॲपमधून फाइल ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात ज्या फाइल शेअरिंगला सपोर्ट करतात.

तुमचा iPhone इतर डिव्हाइसेससह सिंक करणे

सपोर्ट केलेला कॉण्टेण्ट सिंक करण्यासाठी तुम्ही तुमचा iPhone तुमच्या Mac किंवा Windows डिव्हाइसशी कनेक्ट देखील करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या iPhone मध्ये चित्रपट समाविष्ट करता, तेव्हा तुम्ही सिंक करू शकता जेणेकरून तुमच्या संगणकावर देखील चित्रपट दिसेल. तुम्ही संगीत, चित्रपट, TV शोज आणि ह्यासारखा बराच कॉण्टेण्ट सिंक करू शकता.

जेव्हा तुम्ही तुमच्या Mac किंवा Windows डिव्हाइसवर फाइल सिंक करता, तेव्हा तुम्ही तुमच्या संगणकावरील मॉडेल आणि ऑपरेटिंग सिस्टीमनुसार Finder, Apple डिव्हाइसेस किंवा iTunes वापरू शकता.

तुमच्या फाइल ऑटोमॅटिकली iCloud सह सिंक करणे

तुम्ही तुमच्या फाइल, छायाचित्रे, व्हिडिओज आणि बरेच काही iCloud मध्ये संग्रहित करू शकता जेणेकरून तुम्ही त्यांना ॲक्सेस करू शकता आणि त्यांना तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर तसेच सपोर्ट करणाऱ्या वेब ब्राउझर्सवर सिंक करू शकता. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेल्या डिव्हाइसवरील फाइलमध्ये तुम्ही केलेला कोणताही बदल त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेल्या सर्व डिव्हाइसेसवर दिसतो. अधिक माहितीसाठी, iCloud यूझर गाइडमध्ये iCloud तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर माहिती कशी अद्ययावत ठेवते पहा.

सुरुवात करण्यासाठी, iCloud यूझर गाइडमध्ये तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर iCloud सेट अप करा पहा.

नोट : OS X 10.10 (किंवा नंतरचे व्हर्जन) किंवा Windows 7 (किंवा नंतरचे व्हर्जन) आवश्यक आहे. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही वेब ब्राउझरसह, तुम्ही तुमच्या iPhone आणि तुमच्या संगणकावर एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असायला हवे. iCloud साठी सिस्टीम आवश्यकता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.