इतर संगीत सेवांमधून iPhone वरील Apple Music मध्ये संगीत ट्रान्सफर करणे

तुम्ही Apple Music ची सदस्यता घेतल्यास, तुम्ही जतन केलेले संगीत आणि तुम्ही थर्ड पार्टी संगीत सेवांमध्ये तयार केलेल्या प्लेलिस्टस् तुमच्या Apple Music लायब्ररीमध्ये समाविष्ट करू शकता.

नोट : Apple Music वर संगीत ट्रान्सफर करण्याची सुविधा थर्ड पार्टीद्वारे प्रदान केली जाते. Apple Music आणि थर्ड पार्टी संगीत सेवांमधून संगीत ट्रान्सफर करणे सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

खालील गोष्टींची खात्री करा :

  • तुम्ही iOS 18.4 किंवा त्यानंतरचे व्हर्जन वापरत आहात आणि तुमच्या Apple अकाउंट मध्ये साइन इन केलेले आहे.

  • संगीत ट्रान्सफर करण्यासाठी ‘सेटिंग’ मध्ये ‘लायब्ररी सिंक करा’ चालू केले आहे. सेटिंग  > ॲप्स > ‘संगीत’ ॲपवर जा, त्यानंतर ‘लायब्ररी सिंक करा’ चालू केलेले नसल्यास चालू करा.

थर्ड पार्टी संगीत सेवांमधून संगीत ट्रान्सफर करणे

  1. तुमच्या iPhone वर संगीत ॲपवर  जा.

  2. सर्वात वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा.

  3. ‘इतर सेवांमधून संगीत ट्रान्सफर करा’ वर टॅप करा.

    तुम्हाला हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

  4. संगीत सेवा सिलेक्ट करा, त्यानंतर सेवेमध्ये साइन इन करा.

  5. तुम्हाला काय ट्रान्सफर करायचे आहे ते (सर्व किंवा सिलेक्ट केलेले आयटम्स) निवडा, त्यानंतर ‘लायब्ररीमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    नोट : थर्ड पार्टी संगीत सेवेनुसार, तुम्ही सर्व संगीत किंवा फक्त काही आयटम्स (उदाहरणार्थ, तुम्ही तयार केलेल्या केवळ प्लेलिस्टस्) ट्रान्सफर करू शकता.

  6. ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर, स्क्रीनच्या शीर्षस्थानी पुढीलपैकी एक संदेश दिसतो :

    • ट्रान्सफर पूर्ण झाले : ट्रान्सफर यशस्वीपणे पूर्ण झाले आणि तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट केलेल्या संगीताचा सारांश तुम्हाला दिसतो. ‘ओके’ वर टॅप करा.

    • काही संगीताला रिव्ह्यू आवश्यक आहे : ट्रान्सफर पूर्ण झाले, पण काही संगीत ट्रान्सफर झाले नाही. तुम्ही पर्यायी व्हर्जन उपलब्ध असल्यास ते रिव्ह्यू करू शकता आणि निवडू शकता (उदाहरणार्थ, थर्ड पार्टी संगीत सेवेमधील गाण्याचे लाइव्ह व्हर्जन Apple Music कॅटलॉगमध्ये सापडले नाही, परंतु डिलक्स व्हर्जन सापडले). ट्रान्सफर रिव्ह्यू करणे पहा.

ट्रान्सफर रिव्ह्यू करणे

ट्रान्सफर दरम्यान, थर्ड पार्टी संगीत सेवेतील संगीत Apple Music कॅटलॉगमध्ये उपलब्ध असलेल्या समान संगीताशी जुळवले जाते. (इतर संगीत सेवेतून काहीही काढून टाकले जात नाही.)

कधीकधी थर्ड पार्टी संगीत सेवेतील गाणे, संगीत व्हिडिओ किंवा अल्बमसाठी Apple Music कॅटलॉगमध्ये कोणत्याही जुळण्या नसतात. जुळण्या रिव्ह्यू करताना, तुम्ही दिलेल्या पर्यायांमधून निवड करू शकता किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ‘संगीत’ ॲप वर जा, त्यानंतर लायब्ररी टॅबच्या शीर्षस्थानी, ‘काही संगीताला रिव्ह्यूची आवश्यकता आहे’ या संदेशामध्ये ‘आत्ता रिव्ह्यू करा’ वर टॅप करा.

    • सेटिंग  > ॲप्स > ‘संगीत’ ॲपवर जा, त्यानंतर ‘सध्याचे ट्रान्सफर रिव्ह्यू करा’ वर टॅप करा.

  2. ‘पर्याय रिव्ह्यू करा’ स्क्रीनवर, रिव्ह्यू करण्याची आवश्यकता असलेल्या प्रत्येक आयटमसाठी खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • पर्यायी व्हर्जन निवडा : थर्ड पार्टी संगीत सेवेवरील मूळ गाण्याशी जुळणारी संभाव्य जुळणी म्हणून दाखवलेल्या आयटम्सपैकी एक सिलेक्ट करा. गाणे प्रीव्ह्यू करण्यासाठी, अल्बम कव्हरवरील ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

    • आयटम ट्रान्सफर करू नका : तुम्हाला तुमच्या Apple Music लायब्ररीमध्ये पर्यायी व्हर्जन ट्रान्सफर करायचे नसल्यास ‘[आयटम] दुर्लक्षित करा’ वर टॅप करा. तुम्ही ट्रान्सफर पूर्ण करण्यासाठी आणि नवीन ट्रान्सफर सुरू करण्यासाठी ‘सर्व दुर्लक्षित करा’ वर टॅप करू शकता.

      ज्या संगीतासाठी पर्यायी सूचना उपलब्ध नाहीत, त्यांची ‘उपलब्ध नाही’ विभागात ‘पर्याय रिव्ह्यू करा’ स्क्रीनच्या तळाशी यादी तयार केली जाते.

  3. प्रत्येक आयटमसाठी तुम्ही सर्व पर्याय रिव्ह्यू करेपर्यंत स्टेप 2 ची पुनरावृत्ती करा, त्यानंतर ‘लायब्ररीमध्ये [आयटम्स] समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    नोट : तुम्ही एका सेशनमध्ये तुमच्या पर्यायी जुळण्या रिव्ह्यू करणे पूर्ण करू शकत नसल्यास, तुम्ही आतापर्यंत सिलेक्ट केलेल्या जुळण्या स्वीकारण्यासाठी कधीही ‘लायब्ररीमध्ये [आयटम्स] समाविष्ट करा’ वर टॅप करा. तुम्ही सुरुवातीच्या ट्रान्सफरवर परत येऊ शकता आणि ते 30 दिवसांच्या आत पूर्ण करू शकता, पण तुम्ही नवीन ट्रान्सफर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला त्या ट्रान्सफरमधील सर्व पर्यायांचा रिव्ह्यू पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हाला संगीत सेटिंगमध्ये ‘सध्याचे ट्रान्सफर रिव्ह्यू करा’ दिसत असल्यास, ह्याचा अर्थ तुमच्याकडे मागील ट्रान्सफरमधील असे संगीत आहे ज्याला रिव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.