ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘Apple होम’ च्या नवीन व्हर्जनवर अपग्रेड करणे

iOS 16.2 ने ‘Apple होम’ चे नवीन व्हर्जन सादर केले आहे जे अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम आहे. उपलब्धता आणि तपशीलांसाठी, Apple Home अपडेट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुम्ही अपग्रेड करण्यापूर्वी, तुमच्या घराशी कनेक्ट केलेले Apple डिव्हाइस नवीनतम सॉफ्टवेअर वापरत असल्याची खात्री करा. यामध्ये ओनरचे कोणतेही डिव्हाइस आणि शेअर केलेल्या युझरचे कोणतेही डिव्हाइस समाविष्ट आहेत.

नोट : रिमोट ॲक्सेस, तुमचे ‘होम’ ॲप शेअर करणे, नोटिफिकेशन्स, ऑटोमेशन्स, HomeKit सुरक्षित व्हिडिओ आणि लाइटिंग ह्यासारख्या फीचर्ससाठी Apple TV 4K किंवा HomePod सारखे होम हब आवश्यक आहे. Apple होमच्या नवीन व्हर्जनसह होम हब म्हणून iPad सपोर्ट करत नाही. तुम्ही तुमच्या स्मार्ट होम ॲक्सेसरीज कनेक्ट करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी iPad वर ‘होम’ ॲप वापरणे चालू ठेवू शकता.

तुमचे ‘होम’ अपग्रेड करणे

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर, ‘अधिक’ बटणवर टॅप करा, त्यानंतर ‘होम सेटिंग’ वर टॅप करा.

  3. ‘सॉफ्टवेअर अपडेट’ वर टॅप करा, ‘अधिक जाणून घ्या’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    नोट : कोणतेही कनेक्ट केलेले डिव्हाइस जे नवीनतम सॉफ्टवेअर वापरत नाहीत ते अपडेट होईपर्यंत अपग्रेड केलेल्या होमचा ॲक्सेस गमावतील.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.