ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर तुमच्या ‘आवडते’ मधील पॉडकास्ट्स आणि चॅनल्स सिलेक्ट करणे

तुम्ही तुमच्या सदस्यतेमधून अधिक चांगल्या शो च्या शिफारसी आणि शोचे ॲक्सेस मिळविण्यासाठी ‘पॉडकास्ट’ ॲपमध्ये तुम्ही ‘आवडते’ मधील श्रेणी आणि चॅनल्स सिलेक्ट करू शकता.

तुमच्या ‘आवडते’ मधील श्रेणी सिलेक्ट करणे

शोच्या अधिक चांगल्या शिफारशी मिळविण्यासाठी आणि श्रेणी पृष्ठांवर सहज ॲक्सेस मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या ‘आवडते’ मध्ये श्रेणी समाविष्ट करू शकता. ‘आवडते’ मधील श्रेणी शोध परिणामांमध्ये उच्च स्थानावर असतात आणि ‘आवडते’ आयकॉन सह ‘श्रेणी व्यवस्थापित करा’ स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसतात.

  1. तुमच्या iPhone वर ‘पॉडकास्ट’ ॲपमध्ये वर जा.

  2. ’लायब्ररी’ वर टॅप करा, ’श्रेणी’ वर टॅप करा, त्यानंतर ’मॅनेज करा’ वर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्या ‘आवडते’ मध्ये श्रेणी समाविष्ट करा : एक किंवा अधिक श्रेणी सिलेक्ट करा.

    • तुमच्या ‘आवडते’ मधून श्रेणी काढून टाका : ‘आवडते काढून टाका’ बटण वर टॅप करा.

तुमचे ‘आवडते’ मधील चॅनेल्स सिलेक्ट करणे

तुमच्या आवडत्या चॅनल्सना तुमच्या लायब्ररीमध्ये शोधणे सोपे करण्यासाठी त्यांना ‘आवडते’ मध्ये समाविष्ट करू शकता आणि तुमचा विचार बदलला तर काढून टाकू शकता. तुमचे ‘आवडते’ चॅनल्स ‘आवडते’ आयकॉन सह लायब्ररीमध्ये चॅनल्सच्या विभागाच्या शीर्षस्थानी दिसतात.

नोट : जर तुम्ही चॅनलची सदस्यता घेतली नसेल, चॅनलद्वारे ऑफर केलेल्या शोला फॉलो केले नसेल किंवा चॅनलला ‘आवडते’ म्हणून समाविष्ट केलेले नसेल तर चॅनल्स ‘लायब्ररी’ टॅबमध्ये दिसणार नाहीत.

  1. तुमच्या iPhone वर ‘पॉडकास्ट’ ॲपमध्ये वर जा.

  2. ‘लायब्ररी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘चॅनल’ वर टॅप करा.

    तुम्ही चॅनल सर्च किंवा ब्राउझ देखील करू शकता.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्या ‘आवडते’ मध्ये चॅनल समाविष्ट करा : चॅनलवर टॅप करा, नंतर ‘आवडते’ बटण वर टॅप करा.

    • तुमच्या ‘आवडते’ मधून चॅनल काढून टाका : चॅनलवर टॅप करा, नंतर ‘आवडते काढून टाका’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.