ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone चे ध्वनी आणि व्हायब्रेशन बदलणे

जेव्हा तुम्हाला कॉल, टेक्स्ट, व्हॉइसमेल, ईमेल, रिमाइंडर किंवा इतर प्रकारचे नोटिफिकेशन मिळतात, तेव्हा तुम्ही iPhone वर प्ले होणारे ध्वनी बदलू शकता.

हॅप्टिक प्रतिसाद असे व्हायब्रेशन आहे जे तुम्ही काही कृती करता तेव्हा तुमच्या iPhone वर जाणवते, जसे की, जेव्हा तुम्ही ‘होम स्क्रीन’ वर कोणत्याही आयकॉनवर टच आणि होल्ड करता.

तुमच्या iPhone चे आवाज आणि व्हायब्रेशन्स कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ध्वनी व हॅप्टिक्स’ वर टॅप करा.

  3. सर्व ध्वनीचे व्हॉल्यूम सेट करण्यासाठी रिंगटोन्स आणि अलर्ट्सच्या खालील स्लायडर ड्रॅग करा.

  4. ‘हॅप्टिक्स’ वर टॅप करा, नंतर रिंगटोन आणि अलर्ट्ससाठी हॅप्टिक्सचा पर्याय निवडा—‘नेहमी प्ले करा’, ‘’सायलेंट मोड मध्ये प्ले करा’, ‘सायलेंट मोड मध्ये प्ले करू नका’, किंवा ’कधीही प्ले करू नका’.

  5. ’रिंगटोन’, ’टेक्स्ट टोन’ किंवा दुसऱ्या पर्यायावर टॅप करा.

  6. टोन निवडा.

  7. ‘हॅप्टिक्स’ वर टॅप करा, त्यानंतर व्हायब्रेशन पॅटर्न निवडा किंवा तुमचे स्वतःचे तयार करण्यासाठी ‘नवीन व्हायब्रेशन तयार करा’ वर टॅप करा.

तुम्ही विशिष्ट लोकांसाठी iPhone वर प्ले केलेले ध्वनी देखील बदलू शकता. संपर्क वर जा, व्यक्तीच्या नावावर टॅप करा, ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर रिंगटोन आणि टेक्स्ट टोन निवडा.

हॅप्टिक फीडबॅक बंद किंवा चालू करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ध्वनी व हॅप्टिक्स’ वर टॅप करा.

  3. ‘हॅप्टिक्स’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

    हॅप्टिक्स ’कधीही प्ले करू नका’ वर सेट केल्यावर, तुम्हाला इनकमिंग कॉल्स आणि अलर्ट्ससाठी व्हायब्रेशन्स ऐकू येणार नाहीत किंवा जाणवणार नाहीत.

टिप : तुम्हाला इनकमिंग कॉल आणि अलर्ट्स प्राप्त होणे अपेक्षित असताना तसे होत नसल्यास, कंट्रोल सेंटर उघडा, ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू आहे की नाही हे तपासा. ‘डू नॉट डिस्टर्ब’ बटण हायलाइट केलेले असल्यास, 'डू नॉट डिस्टर्ब' बंद करण्यासाठी त्यावर टॅप करा. (‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू असताना, त्याचा आयकॉन स्टेटस बारमध्ये देखील दिसतो.)

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.