ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर होमसह ॲक्सेसरी नियंत्रित करा

तुमच्या घरातील ॲक्सेसरी नियंत्रित करण्यासाठी होम ॲप आणि कंट्रोल सेंटर वापरा.

होम ॲपमध्ये ॲक्सेसरी नियंत्रित करणे

होम टॅबवर, टाइलच्या डाव्या बाजूला असलेल्या ॲक्सेसरी आयकॉनवर टॅप करा—लाइट, उदाहरणार्थ—ॲक्सेसरी त्वरित चालू किंवा बंद करण्यासाठी. ॲक्सेसरीचे नियंत्रण दाखवण्यासाठी टाइलच्या उजव्या बाजूला ॲक्सेसरीच्या नावावर टॅप करा.

उपलब्ध कंट्रोल ॲक्सेसरीच्या प्रकारावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, काही लाइटबल्बसह, रंग बदलण्यासाठी काही कंट्रोल आहेत. तुमच्या स्मार्ट TV सह, तुम्ही इनपुट सोर्स निवडू शकता.

कंट्रोल सेंटरमध्ये ॲक्सेसरी समाविष्ट करणे

तुमच्या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या ॲक्सेसरीवर सहज ॲक्सेस मिळण्यासाठी तुम्ही होम दृश्ये आणि ॲक्सेसरी कंट्रोल सेंटरमध्ये समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर कंट्रोल सेंटर उघडा.

  2. वर डाव्या बाजूला ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर खालच्या बाजूला 'कंट्रोल समाविष्ट करा' वर टॅप करा.

  3. होम दृश्य किंवा ॲक्सेसरी कंट्रोलवर टॅप करा.

  4. ‘दृश्य किंवा ॲक्सेसरी निवडा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला नियंत्रित करायचे आहे ते घर आणि डिव्हाइस किंवा दृश्य सिलेक्ट करा.

श्रेणी आणि होम स्टेटस पाहणे

लाइट, हवामान, सुरक्षा, स्पीकर आणि TV, आणि पाणी ह्या श्रेणींमुळे तुम्ही खोलीनुसार आयोजित केलेल्या सर्व संबंधित ॲक्सेसरी त्वरित ॲक्सेस करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर टॅप करा.

    तुमच्या घराच्या नावाखाली, बटणे श्रेणीशी संबंधित ॲक्सेसरीजची स्थिती दाखवतात—उदाहरणार्थ, लाइट श्रेणी जी "3 ऑन" दाखवते.

  3. खोलीनुसार व्यवस्थापित केलेल्या त्या श्रेणीतील सर्व ॲक्सेसरी दाखवण्यासाठी, श्रेणी बटणांपैकी एका बटणावर टॅप करा.

  4. श्रेणी बघत असताना, कृती करण्यासाठी ॲक्सेसरी टाइलच्या डाव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर टॅप करा—लाइट किंवा लाइटचा गट चालू किंवा बंद करा, HomePod वर संगीत प्ले करणे सुरू करा, किंवा समोरील दरवाजा लॉक करा.

ॲक्टिव्हिटी हिस्ट्री बघणे

जेव्हा तुमच्याकडे Apple होमचे नवीन व्हर्जन आणि नवीनतम सॉफ्टवेअर वापरणारे होम हब असेल, तेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्य (अतिथी वगळता) गॅरेजचे दरवाजे, लॉक्स, सिक्युरिटी सिस्टीम्स आणि अडॅप्टिव्ह तापमान थर्मोस्टॅटसारख्या ॲक्सेसरीजसाठी ॲक्टिव्हिटी हिस्ट्री बघू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही हे जाणून घेऊ शकता की दरवाजा कधी उघडला गेला आणि तो कोणी उघडला.

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘होम सेटिंग’ वर टॅप करा.

  3. ’ॲक्टिव्हिटी’ वर जा, त्यानंतर 30 दिवसांची ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी ’एक महिना’ वर टॅप करा.

  4. होम टॅबमध्ये, ‘सुरक्षा’ किंवा ‘हवामान’ श्रेणीवर टॅप करा, त्यानंतर ‘ॲक्टिव्हिटी हिस्ट्री’ दाखवण्यासाठी ‘होम ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा.

‘ॲक्टिव्हिटी हिस्ट्री’ सुरू आणि बंद करणे

केवळ घरमालक किंवा ॲक्सेसरीज समाविष्ट करण्याची आणि संपादित करण्याची परवानगी असलेली ‘शेअर्ड होम यूझर’ व्यक्तीच ॲक्टिव्हिटी हिस्ट्री सुरू आणि बंद करू शकते. जेव्हा तुम्ही ‘ॲक्टिव्हिटी हिस्ट्री’ बंद करता, तेव्हा ‘होम’ मधील मागील सर्व ॲक्टिव्हिटी कायमच्या हटवल्या जातात.

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर, अधिक बटण वर टॅप करा, ‘होम सेटिंग’ वर टॅप करा, त्यानंतर ’ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा.

  3. ‘ॲक्टिव्हिटी हिस्ट्री’ सुरू किंवा बंद करण्यासाठी ‘एक महिना’ निवडा.

ॲडॅप्टिव्ह लाइटिंग चालू करणे

काही Apple होम सुसंगत लाइट्समध्ये तुम्हाला त्या लाइट्सच्या रंगाचे तापमान, शीतल निळ्या रंगातून उबदार पिवळ्या रंगात ॲडजस्ट करता येते. तुम्ही दिवसभर रंग तापमान ऑटोमॅटिकली समायोजित करण्यासाठी सपोर्ट केलेले लाइट सेट करू शकता. उबदार रंगांसह सतर्क व्हा, दुपारी थंड रंगांसह सतर्क आणि केंद्रित रहा, आणि रात्री निळा प्रकाश काढून टाकून विश्रांती घ्या. अडॅप्टिव्ह लाइटिंगला सपोर्ट करणाऱ्या लाइटसाठी ह्या सूचनांचे पालन करा :

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. कंट्रोल दाखवण्यासाठी लाइटच्या टाइलवर टॅप करा.

    तुम्ही टाइलवर टच आणि होल्ड देखील करू शकता, आणि नंतर ॲक्सेसरी सेटिंग निवडू शकता.

  3. ‘अडॅप्टिव्ह लाइटिंग’ बटण वर टॅप करा, त्यानंतर अडॅप्टिव्ह लाइटिंग चालू करा.

नोट : अडॅप्टिव्ह लाइटिंगसाठी होम हबची आवश्यकता असते—जसे की Apple TV 4K किंवा HomePod स्पीकर्ससारखे डिव्हाइस.

होम ॲक्सेसरी संपादित करणे

ॲक्सेसरी सेटिंग संपादित करण्यासाठी, ॲक्सेसरी टाइलच्या उजव्या बाजूला टॅप करा, ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा, नंतर खालीलपैकी कोणतेही काम करा :

  • ॲक्सेसरीचे नाव बदला : जुने नाव हटवण्यासाठी ‘हटवा’ बटण वर टॅप करा, नंतर नवीन नाव टाइप करा.

  • ॲक्सेसरीचा आयकॉन बदला : ॲक्सेसरीच्या नावाच्या पुढील आयकॉनवर टॅप करा, त्यानंतर नवीन आयकॉन सिलेक्ट करा. जर तुम्हाला निवड करण्यास इतर आयकॉन मिळत नसतील, तर ह्याचा अर्थ ह्या ॲक्सेसरीसाठी आयकॉन बदलला जाऊ शकत नाही.

गट ॲक्सेसरी

तुम्ही बटणावर टॅप करून ॲक्सेसरी गटबद्ध करून अनेक ॲक्सेसरी नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. ॲक्सेसरी टाइलच्या उजव्या बाजूला टॅप करा, ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा, नंतर ‘इतर ॲक्सेसरीसह गटबद्ध करा’ वर टॅप करा.

  3. तुम्हाला ह्या ॲक्सेसरीसह गटबद्ध करायच्या असलेल्या ॲक्सेसरीवर टॅप करा—उदाहरणार्थ, खोलीतील आणखी एक लाइट.

  4. ‘गटाचे नाव’ फील्डमध्ये, गटासाठी नाव टाइप करा.

  5. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    होम टॅबवर ‘आवडते' मध्ये गट समाविष्ट करण्यासाठी ‘’आवडते’ मध्ये समाविष्ट करा' चालू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.