ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iMessage विषयी माहिती

‘iMessage’ ही एक सुरक्षित संदेश सेवा आहे जिचा वापर तुम्ही तुमच्या iPhone, iPad, Mac, Apple Watch आणि Apple Vition Pro वर संदेश ॲप मध्ये टेक्स्ट संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी करू शकता.

जर कोणतीही व्यक्ती ‘iMessage’ वापरून तुमच्या ईमेल ॲड्रेसवर किंवा फोन नंबरवर संदेश पाठवत असेल, तर तुम्हाला तुमच्या सर्व Apple डिव्हाइसवर संदेश प्राप्त होतो, जे त्या ईमेल ॲड्रेसवर किंवा फोन नंबरवर संदेश प्राप्त करण्यासाठी सेट केलेले असतात. जेव्हा तुम्ही ‘iMessage’ संभाषण पाहता, तेव्हा तुम्हाला कोणत्याही डिव्हाइसवरून पाठवलेले सर्व संदेश दिसतात, जेणेकरून तुम्ही जिथे असाल तिथे इतरांच्या संपर्कात राहू शकता.

काही ‘iMessage’ फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला Apple अकाउंटची आवश्यकता आहे. जर तुम्ही iTunes Store किंवा App Store वरून खरेदी केली असेल किंवा तुम्ही iCloud मध्ये साइन इन केले असेल, तर तुमच्याकडे Apple अकाउंट असेल.

iMessage ॲप वापरून संभाषण.

‘iMessage’ मध्ये संप्रेषण करण्याबाबत काही गोष्टी जाणून घ्या :

iPhone वरील ’संदेश’ ॲपमधील ‘समाविष्ट करा’ मेन्यूमध्ये, अनेक iMessage फिचर्सची यादी आहे : ऑडिओ संदेश, App Store, GIF इमेजेस, चेक इन, Digital Touch, स्थान शेअरिंग आणि Memoji.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.