ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘छायाचित्र’ सह सुरुवात करणे

तुमची छायाचित्रे शोधण्यासाठी, तुमच्या आठवणींचा आनंद घेण्यासाठी आणि तुमचे सर्वोत्तम शॉट शेअर करण्यासाठी तुमच्या iPhone वर ‘छायाचित्र’ वापरा. हे कसे सुरू करायचे ते येथे दिले आहे.

‘छायाचित्र’ ॲप उघडलेले आहे आणि स्क्रीनच्या तळाशी ’लायब्ररी’ टॅब सिलेक्ट केलेला आहे.

तुमची छायाचित्रे ब्राउझ करणे

तुमची छायाचित्रे आणि व्हिडिओ बघणे सुरू करण्यासाठी, छायाचित्र ॲपवर जा. ‘लायब्ररी’ टॅब दिनांकानुसार व्यवस्थापित केलेली तुमची सर्व छायाचित्रे दाखवतो. छायाचित्रांचे संग्रह बघण्यासाठी — जसे अल्बम्स, अलीकडील दिवस, लोक व पाळीव प्राणी आणि बरेच काही—‘संग्रह’ टॅबवर टॅप करा.

’आठवणी’ संग्रहासाठी छायाचित्र ॲप उघडलेले आहे.

तुमच्या आठवणींचा आनंद घेणे

संगीतावर सेट केलेल्या आणि चित्रपटाप्रमाणे प्ले केलेल्या छायाचित्रांच्या आणि व्हिडिओच्या वैयक्तिकृत संग्रहासह तुमच्या आवडत्या आठवणी पुन्हा अनुभवा. ’संग्रह’ वर टॅप करा, ’आठवणी’ वर टॅप करा, त्यानंतर आठवणीवर टॅप करा. प्रत्येक आठवणीमध्ये एखादी व्यक्ती, पाळीव प्राणी, ठिकाण, इव्हेंट किंवा ॲक्टिव्हिटी ह्यासारख्या थीमवर तयार केलेल्या तुमच्या लायब्ररीमधील छायाचित्रे असतात.

मध्यभागी छायाचित्रासह ‘संपादित करा’ स्क्रीन. स्क्रीनच्या तळाशी, डावीकडून उजवीकडे, ‘ॲडजस्ट करा’, ‘फिल्टर्स’, ‘क्रॉप करा’ आणि ‘क्लीन अप’ बटणे आहेत. ‘ॲडजस्ट करा’ बटण सिलेक्ट केले गेले आहे आणि ‘ब्रिलिअन्स’ ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर आहे. ‘रद्द करा’ बटण स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात आहे आणि ‘झाले’ बटण वरच्या उजव्या कोपऱ्यात आहे.

तुमची छायाचित्रे संपादित करणे

तुमची छायाचित्रे उठून दिसण्यासाठी, प्रकाश आणि रंग ॲडजस्ट करा, क्रॉप करा, फिरवा, फिल्टर समाविष्ट करा आणि बरेच काही करा. छायाचित्र किंवा व्हिडिओ उघडा, त्यानंतर संपादन सुरू करण्यासाठी ‘संपादित करा’ बटण वर टॅप करा.

खाली शेअर पर्यायांच्या ओळीसह, सिलेक्ट केलेले छायाचित्र iPhone स्क्रीनच्या वरच्या अर्ध्या भागात डिस्प्ले केले जाते. ‘छायाचित्र कॉपी करा’, ‘शेअर केलेल्या अल्बममध्ये समाविष्ट करा’, ‘अल्बममध्ये समाविष्ट करा’ आणि ‘वॉलपेपर म्हणून वापरा’ ह्यासह अतिरिक्त पर्याय त्याच्या खाली दिसतात.

तुमची छायाचित्रे शेअर करणे

छायाचित्र किंवा व्हिडिओ उघडा, ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’, ‘संदेश’ किंवा ‘AirDrop’ ह्यासारखा शेअर करण्याचा पर्याय निवडा. संग्रहातील सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओज शेअर करण्यासाठी, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘शेअर करा’ वर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.