ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर तुम्ही वाचत किंवा टाइप करत असलेल्या टेक्स्टचे मोठे व्हर्जन बघणे

iPhone वर हॉवर टेक्स्टसह, तुम्ही टेक्स्टचे मोठे व्हर्जन बघण्यासाठी टेक्स्टवर आणि स्क्रीनवरील इतर आयटमवर पॉइंटर मूव्ह करू शकता. किंवा तुम्ही टाइप करत असलेल्या टेक्स्टच्या मोठ्या व्हर्जनसह वेगळी विंडो दाखवण्यासाठी हॉवर टायपिंग वापरा.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

हॉवर टेक्स्ट वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPhone शी ट्रॅकपॅड किंवा माउस ह्यासारखे पॉइंटिंग डिव्हाइस कनेक्ट करावे लागेल. तुमच्या iPhone, iPad किंवा iPod Touch वर AssistiveTouch सह पॉइंटर डिव्हाइस कसे वापरायचे ह्यावर Apple समर्थन लेख पहा.

हॉवर टायपिंग वापरण्यासाठी तुम्हाला पॉइंटिंग डिव्हाइस कनेक्ट करण्याची गरज नाही.

जेव्हा तुम्ही टेक्स्टवर हॉवर करता तेव्हा टेक्स्टचे मोठे व्हर्जन दाखवणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, ’हॉवर टेक्स्ट’ वर टॅप करा, त्यानंतर ’हॉवर टेक्स्ट’ सुरू करा.

  3. पॉइंटर टेक्स्टच्या वर मूव्ह करा जेणेकरून त्याचे मोठे व्हर्जन डिस्प्ले केले जाऊ शकते.

  4. तुमच्याकडे कनेक्ट केलेला कीबोर्ड असल्यास, तुम्हाला हॉव्हर टेक्स्ट विंडो दाखवण्यासाठी कंट्रोल ‘की’ दाबून होल्ड करावी लागेल.

तुम्ही कनेक्ट केलेल्या कीबोर्डसह iPhone वापरत असल्यास, प्रत्येक वेळी ‘की’ न दाबता आणि होल्ड न करता तुम्ही टेक्स्टवर पॉइंटर मूव्ह केल्यावर, तुम्ही हॉवर टेक्स्ट विंडो ऑटोमॅटिकली डिस्प्ले करू शकता. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘हॉवर टेक्स्ट’ वर जा, नंतर ‘ॲक्टिव्हेशन लॉक’ चालू करा. सक्रियकरण लॉक वापरण्यासाठी, ‘कंट्रोल की’ तीन वेळा त्वरित दाबा.

हॉवर टेक्स्ट आणि सक्रियीकरण लॉक सक्रिय करण्यासाठी तुम्ही जी ‘की’ दाबता ती तुम्ही बदलू शकता. ‘ॲक्टिनव्हेशन मॉडिफायर’ वर टॅप करा, नंतर दुसरी ’की’ निवडा.

तुम्ही टाइप करत असलेल्या टेक्स्टचे मोठे व्हर्जन दाखवणे

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग ॲपवर  जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, ’हॉवर टेक्स्ट’ वर टॅप करा, ’हॉवर टायपिंग’ वर टॅप करा, त्यानंतर ’हॉवर टायपिंग’ सुरू करा.

  3. तुम्ही टेक्स्ट एन्ट्री फील्डमध्ये टाइप करत असताना, तुम्ही जे टाइप करत आहात त्याचे मोठे व्हर्जन डिस्प्ले केले जाते.

    हॉवर टायपिंग विंडो तात्पुरती लपवण्यासाठी, त्यावर स्वाइप करा. जेव्हा तुम्ही टाइप करणे पुन्हा सुरू करता तेव्हा ते पुन्हा दिसते.

‘हॉवर टेक्स्ट’ कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग ॲपवर  जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ’हॉवर टेक्स्ट’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक कस्टमाइझ करा :

    • डिस्प्ले मोड : इनलाइन (कर्सरच्या जवळ), स्क्रीनच्या शीर्षस्थानी किंवा थेट ऑनस्क्रीन कीबोर्डच्या वरच्या बाजूला—हॉवर टेक्स्ट किंवा हॉवर टायपिंग विंडो कुठे दाखवायची ते निवडा.

    • कॉण्टेण्ट : ’टेक्स्ट’, ’रंग’ किंवा ’टेक्स्ट व रंग’ दाखवण्याचा पर्याय निवडा.

    • स्क्रोलिंगचा वेग : जलद किंवा मंद गती निवडा (टेक्स्टचे मोठे ब्लॉक पाहताना होवर टेक्स्ट विंडोमध्ये स्क्रोल करण्यासाठी).

    • फॉण्ट : कस्टम फॉण्ट निवडा.

    • आकार : तुमचा प्राधान्यकृत वाचन आकार बदलण्यासाठी स्लायडर ॲडजस्ट करा.

    • टेक्स्टचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे टेक्स्टचा रंग निवडा.

    • बॅकग्राउंड रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे बॅकग्राउंडचा रंग निवडा.

    • बॉर्डरचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे बॉर्डरचा रंग निवडा.

‘हॉवर टायपिंग’ कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग ॲपवर  जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, ’हॉवर टेक्स्ट’ वर टॅप करा, त्यानंतर ’हॉवर टायपिंग’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक कस्टमाइझ करा :

    • डिस्प्ले मोड : इनलाइन (कर्सरच्या जवळ), स्क्रीनच्या शीर्षस्थानी किंवा थेट ऑनस्क्रीन कीबोर्डच्या वरच्या बाजूला—हॉवर टेक्स्ट किंवा हॉवर टायपिंग विंडो कुठे दाखवायची ते निवडा.

    • फॉण्ट : कस्टम फॉण्ट निवडा.

    • आकार : तुमचा प्राधान्यकृत वाचन आकार बदलण्यासाठी स्लायडर ॲडजस्ट करा.

    • टेक्स्टचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे टेक्स्टचा रंग निवडा.

    • इन्सर्शन पॉइंट कलर : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे इन्सर्शन पॉइंटचा रंग निवडा.

    • बॅकग्राउंड रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे बॅकग्राउंडचा रंग निवडा.

    • बॉर्डरचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे बॉर्डरचा रंग निवडा.

    • चुकीचा लिहिलेल्या शब्दाचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे चुकीचे शब्दलेखन केलेल्या शब्दांचा रंग निवडा.

    • ऑटोकरेक्ट केलेल्या शब्दाचा रंग : ‘ग्रिड’, ‘स्पेक्ट्रम’ किंवा ‘स्लायडर्स’ द्वारे ऑटोकरेक्ट केलेल्या शब्दांचा रंग निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.