ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone मधून Apple TV 4K किंवा स्मार्ट TV वर व्हिडिओज आणि छायाचित्रे वायरलेस पद्धतीने स्ट्रीम करणे

तुमच्या iPhone मधून स्ट्रीम केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही तुमचा Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेला स्मार्ट TV वापरू शकता.

नोट : तुमच्या iPhone मधून Apple TV 4K किंवा स्मार्ट TV वर व्हिडिओज किंवा छायाचित्रे स्ट्रीम करण्यासाठी, दोन्ही डिव्हाइसेस एकाच Wi-Fi नेटवर्क वर असणे आवश्यक आहे.

Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेल्या स्मार्ट TV वर व्हिडिओ प्ले करणे

  1. Apple TV ॲप किंवा तुमच्या iPhone वर दुसरे सपोर्ट केलेले व्हिडिओ ॲप व्हिडिओ प्ले करत असताना, कंट्रोल दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.

  2. AirPlay बटण वर टॅप करा, नंतर प्लेबॅक डेस्टिनेशन म्हणून तुमचा Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेला स्मार्ट TV निवडा.

    टिव्ही स्क्रीनवर AirPlay पासकोड दिसल्यास, तुमच्या iPhone वर पासकोड प्रविष्ट करा.

    iPhone स्क्रीनवर चित्रपट प्ले केला जात आहे. स्क्रीनच्या मध्यभागी प्लेबॅक कंट्रोल आहेत. AirPlay बटण वरच्या डाव्या बाजूला आहे.

प्लेबॅक डेस्टिनेशन बदलण्यासाठी, तुमच्या iPhone स्क्रीनवर वेगळा AirPlay पर्याय निवडा.

Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेल्या स्मार्ट TV वर छायाचित्रे दाखवणे

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. छायाचित्रावर टॅप करा, नंतर शेअर बटण वर टॅप करा.

  3. ‘वर’ स्वाइप करा, AirPlay बटण वर टॅप करा, नंतर प्लेबॅक डेस्टिनेशन म्हणून तुमचा Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेला स्मार्ट TV निवडा.

    टिव्ही स्क्रीनवर AirPlay पासकोड दिसल्यास, तुमच्या iPhone वर पासकोड प्रविष्ट करा.

छायाचित्रांचे स्ट्रीमिंग थांबवण्यासाठी, iPhone स्क्रीनच्या वरच्या बाजूला AirPlay बटण वर टॅप करा, नंतर ‘AirPlay बंद करा’ वर टॅप करा.

ऑटोमॅटिक AirPlay स्ट्रीमिंग ऑन किंवा ऑफ करणे

AirPlay सह नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या ॲप्समधून कॉण्टेण्ट प्ले करताना तुम्ही तुमच्या iPhone ला कोणत्याही वारंवार वापरल्या जाणाऱ्या Apple TV 4K किंवा स्मार्ट TV ला शोधण्याची आणि ऑटोमॅटिकली कनेक्ट करण्याची अनुमती देऊ शकता.

सेटिंग  > सामान्य > ‘AirPlay कंटिन्युटी’ वर जा, नंतर ‘ऑटोमॅटिक’, ‘कधीही नाही’ किंवा ‘विचारा’ निवडा.

Apple TV 4K किंवा स्मार्ट TV वर तुमचा iPhone मिरर करणे

Apple TV 4K किंवा स्मार्ट TV वर, तुमच्या iPhone वर जे दिसते ते तुम्ही दाखवू शकता.

  1. तुमच्या iPhone वर कंट्रोल सेंटर उघडा.

  2. ‘स्क्रीन मिररिंग’ बटण वर टॅप करा, नंतर प्लेबॅक डेस्टिनेशन म्हणून तुमचा Apple TV 4K किंवा AirPlay 2 एनेबल केलेला स्मार्ट TV निवडा.

    टिव्ही स्क्रीनवर AirPlay पासकोड दिसल्यास, तुमच्या iPhone वर पासकोड प्रविष्ट करा.

iPhone वर पुन्हा स्विच करण्यासाठी, कंट्रोल सेंटर उघडा, ‘स्क्रीन मिररिंग’ बटण वर टॅप करा, नंतर ‘मिररिंग थांबवा’ वर टॅप करा.

नोट : AirPlay 2-एनेबल केलेल्या स्मार्ट TV च्या यादीसाठी, होम ॲक्सेसरी संकेतस्थळ पहा.

Apple TV 4K वापरण्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी, Apple TV 4K यूझर गाइड पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.