ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘आरोग्य’ सह सुरुवात करणे

iPhone वरील आरोग्य ॲप अनेक वेगवेगळ्या स्रोतांकडून आरोग्य डेटा संग्रहित करते : तुमचा iPhone, iPad, Apple Watch आणि सुसंगत ॲप आणि थर्ड पार्टी डिव्हाइसेस. तुम्ही झोपेचे शेड्यूल सेट अप करू शकता, तुमच्या हेडफोनची पातळी तपासू शकता, तुमची औषधे कधी घ्यायची हे शेड्यूल करू शकता आणि बरेच काही करू शकता.

‘आरोग्य’ ॲपमधील सारांश स्क्रीन. ’पिन केलेले’ च्या खाली ॲक्टिव्हिटी, स्लीप स्कोअर, मनाची स्थिती आणि औषधांबद्दलची माहिती दिसते.

तुमचा आरोग्य डेटा एकाच ठिकाणी शोधणे

iPhone तुमच्या वैद्यकीय प्रदात्याकडून गतिशीलता डेटा, झोपेची हिस्ट्री आणि अगदी आरोग्य रेकॉर्डसह महत्त्वाचे आरोग्य तपशील ऑटोमॅटिकली संग्रहित करतो आणि त्यांचे विश्लेषण करतो. तुम्ही घेत असलेली औषधे, तुमचे ऋतुचक्र आणि इतर बऱ्याच गोष्टींची माहितीदेखील तुम्ही मॅन्युअली समाविष्ट करू शकता. तुमचा सर्व आरोग्य डेटा डिस्प्ले करण्यासाठी, ‘आरोग्य’ ॲपवर जा आणि हायलाइट्स पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

‘आरोग्य तपशील’ स्क्रीन, ज्यात नाव, जन्मदिनांक, रक्तगट आणि इतर माहितीसाठी फील्ड समाविष्ट आहेत.

तुमचे आरोग्य तपशील भरणे

तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी, ‘आरोग्य तपशील’ मध्ये तुमचे नाव, जन्मदिनांक, लिंग आणि इतर मूलभूत माहिती समाविष्ट करा. तुमचे आरोग्य तपशील संपादित करण्यासाठी, ’सारांश’ वर टॅप करा, वरच्या उजव्या बाजूला तुमच्या चित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा, ’आरोग्य तपशील’ वर टॅप करा, नंतर ’संपादित करा’ वर टॅप करा.

’आरोग्य’ मधील ‘औषध’ स्क्रीन औषधांसाठीचा दिनांक आणि लॉग दर्शवित आहे.

तुमची औषधे शेड्यूल करणे

तुम्ही घेत असलेल्या औषधांची यादी तयार करा, ती केव्हा घ्यायची ह्याचे शेड्यूल बनवा आणि तुम्ही ती घेता तेव्हा ते लॉग करा. नवीन औषध समाविष्ट करण्यासाठी, ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ‘औषधे’ वर टॅप करा, नंतर ‘औषध समाविष्ट करा’ वर टॅप करा.

स्क्रीनच्या शीर्षस्थानी आठवड्याची टाइमलाइन दाखवणारी ‘सायकल ट्रॅकिंग’ स्क्रीन. लाल घन वर्तुळे आणि जांभळे डॉट टाइमलाइनवर पहिले 5 दिवस चिन्हांकित करतात. टाइमलाइनच्या खाली मासिक पाळी, लक्षणे आणि इतर बरीच माहिती समाविष्ट करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

तुमच्या ऋतुचक्राचा मागोवा घेणे

‘सायकल ट्रॅकिंग’ सह, तुम्ही तुमची मासिक पाळी लॉग करू शकता, पेटक्यासारखी लक्षणे नोंदवू शकता आणि स्तनपानासारख्या ऋतुचक्र घटकांचा मागोवा घेऊ शकता. तुमची पुढील मासिक पाळी किंवा ‘गर्भधारणेसाठी योग्य काळ’ कधी सुरू होईल ह्याचा अंदाज लावण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. ‘सायकल ट्रॅकिंग’ सेट अप करण्यासाठी, ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ‘सायकल ट्रॅकिंग’ वर टॅप करा, नंतर ‘सायकल ट्रॅकिंग सेट अप करा’ वर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.