ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Apple TV किंवा Apple TV चॅनलची सदस्यता घेणे

Apple TV ॲपमध्ये, तुम्ही Apple TV आणि Apple TV चॅनल्स ची सदस्यता घेऊ शकता. सदस्यता घेतल्याने तुम्हाला iPhone, iPad, Mac, Apple TV 4K, Apple Vision Pro आणि सपोर्ट करणाऱ्या स्मार्ट TV आणि स्ट्रीमिंग डिव्हाइसेसवर मागणीनुसार कॉण्टेण्टचा ॲक्सेस मिळतो. तुम्ही iPhone, iPad आणि Mac वर ऑफलाइन बघण्यासाठी कॉण्टेण्ट डाउनलोड देखील करू शकता.

Apple One ची सदस्यता घेऊन तुम्ही तुमच्या Apple TV ला इतर Apple सेवांसह एकत्रित करण्याचा पर्याय निवडू शकता. Apple One सह Apple सदस्यता एकत्रित करणे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

युनायटेड स्टेट्समध्ये Apple TV आणि Peacock हे देखील बंडल केलेल्या सदस्यतेच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

नोट : Apple TV, MLS Season Pass, Formula 1, Apple TV चॅनल्स आणि Apple One सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Apple TV ची सदस्यता घेणे

Apple TV ही एक सदस्यता स्ट्रीमिंग सेवा आहे ज्यामध्ये Apple Originals च्या पुरस्कारप्राप्त सिरीज, आकर्षक नाटके, अभूतपूर्व माहितीपट, मुलांचे मनोरंजन, कॉमेडी आणि ह्यासारखे बरेच नवीन आयटम दर महिन्याला समाविष्ट केले जातात. काही देश आणि प्रदेशांमध्ये, Major League Soccer (MLS), ‘Friday Night Baseball’ डबलहेडर्स आणि Formula 1 शर्यती देखील सदस्यतेमध्ये समाविष्ट आहेत.

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. Apple TV वर टॅप करा, त्यानंतर सदस्यता बटणावर टॅप करा.

  3. निःशुल्क ट्रायल (पात्र असल्यास) आणि सदस्यता तपशील रिव्ह्यू करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

Apple TV चॅनल आणि ॲपची सदस्यता घेणे

कोणतीही ॲप्स डाउनलोड न करता, तुम्हाला हवे असलेले शोज मिळविण्यासाठी तुम्ही Apple TV चॅनल्सची सदस्यता घेऊ शकता.

टिप : युनायटेड स्टेट्समध्ये Apple TV आणि Peacock हे बंडल केलेल्या सदस्यतेच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, त्यानंतर ’चॅनल व ॲप्स’ ओळीपर्यंत खाली स्क्रोल करा.

  3. ब्राउझ करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा, त्यानंतर आयटमवर टॅप करा.

  4. सदस्यता बटणावर टॅप करा, निःशुल्क ट्रायल (पात्र असल्यास) आणि सदस्यता तपशील रिव्ह्यू करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

सपोर्ट केलेल्या स्ट्रीमिंग ॲपना डिस्कनेक्ट करण्यासाठी, वरच्या उजव्या बाजूला तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा, ‘कनेक्ट केलेले ॲप’ वर टॅप करा, नंतर स्ट्रीमिंग ॲपच्या पुढील बटणावर टॅप करून ते डिस्कनेक्ट करा.

Apple TV किंवा Apple TV चॅनल्सच्या तुमच्या सदस्यता बदलणे किंवा रद्द करणे

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, नंतर वरच्या उजव्या बाजूला तुमच्या पिक्चरवर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा.

  3. ‘सदस्यता’ वर टॅप करा किंवा तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ‘सदस्यता’ वर टॅप करा.

  4. तुमची सदस्यता बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

कुटुंबातील सदस्यांबरोबर Apple TV आणि Apple TV चॅनल्स शेअर करणे

जेव्हा तुम्ही Apple TV, Apple TV चॅनल्स किंवा Apple One ची सदस्यता घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या सदस्यता कुटुंबातील जास्तीत जास्त पाच इतर सदस्यांबरोबर शेअर करण्यासाठी कौटुंबिक शेअरिंगचा वापर करू शकता. तुमच्या कौटुंबिक गटातील सदस्यांना काहीही करण्याची गरज नाही—तुमची सदस्यता सुरु झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा Apple TV ॲप उघडतात, तेव्हा त्यांच्यासाठी शेअर केलेली सदस्यता उपलब्ध असते.

जर तुम्ही Apple TV, Apple TV चॅनल्स किंवा Apple One ची सदस्यता घेतलेला कौटुंबिक गट जॉइन केलात आणि तुम्ही आधीच सदस्यता घेतली असल्यास, तुमच्या पुढच्या बिलिंग दिनांकाला तुमची सदस्यता नूतनीकृत केली जात नाही, त्याऐवजी तुम्ही गटाची सदस्यता वापरता. तुम्ही सदस्यता न घेतलेला कौटुंबिक गट जॉइन केल्यास, गट तुमची सदस्यता वापरतो.

नोट : कौटुंबिक गटाबरोबर तुमची सदस्यता शेअर करणे थांबवण्यासाठी, तुम्ही सदस्यता रद्द करू शकता, कौटुंबिक शेअरिंग गटातून बाहेर पडू शकता किंवा एखाद्या सदस्याला काढून टाकू शकता किंवा (तुम्ही कौटुंबिक गटाचे संयोजक असल्यास), कौटुंबिक शेअरिंग थांबवू शकता.

Apple TV साठी सदस्यता आवश्यक आहे, ज्यामध्ये काही देश आणि प्रदेशांमध्ये पुढीलपैकी काही किंवा सर्व गोष्टी समाविष्ट असू शकतात : Friday Night Baseball, Major League Soccer (MLS) आणि Formula 1. सर्व फीचर्स आणि कॉण्टेण्ट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple TV सदस्यतेमध्ये थर्ड पार्टी ब्रँडेड सदस्यता सेवा किंवा Apple TV ॲपमध्ये भाड्याने किंवा खरेदीसाठी उपलब्ध असलेला कॉण्टेण्ट समाविष्ट नाही.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.