ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Mail मध्ये तुमचा ईमेल तपासणे

Mail ॲपमध्ये, तुम्ही ईमेल संदेश वाचू शकता, संपर्क समाविष्ट करू शकता आणि संदेश न उघडता संदेशातील काही कॉण्टेण्ट प्रिव्ह्यू करू शकता.

ईमेलची यादी दाखवणारा, Mail इनबॉक्स.

ईमेल वाचणे

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. तुम्हाला वाचायचे असलेल्या संदेशावर टॅप करा.

नंतर ‘प्राथमिक’ संदेशावर परत येण्यासाठी ’मला आठवण करून द्या’ वापरणे

तुमच्याकडे प्राथमिक संदेश त्वरित हाताळण्यासाठी वेळ नसल्यास, तुम्ही रिमाइंडर प्राप्त करण्यासाठी वेळ आणि दिनांक सेट करू शकता आणि संदेश तुमच्या इनबॉक्सच्या शीर्षस्थानी परत आणू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. ‘प्राथमिक’ संदेशावर टॅप करा, ‘उत्तर द्या’ बटण वर टॅप करा, ’मला आठवण करून द्या’ वर टॅप करा, नंतर आठवण कधी करून द्यायची ते निवडा.

अनेक ईमेल्स ’वाचलेले’ म्हणून त्वरित चिन्हांकित करणे

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेश यादी बघताना, अधिक बटण वर टॅप करा, ‘सिलेक्ट करा’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला चिन्हांकित करायचे असलेले संदेश सिलेक्ट करा.

    महत्त्वाचे : जेव्हा तुम्ही ‘व्यवहार’, ‘अपडेट्स’ किंवा ‘जाहिराती’ मध्ये संदेश सिलेक्ट करता, तेव्हा तुम्ही प्रेषकाकडून त्या श्रेणीतील सर्व संदेश सिलेक्ट करत असता.

  3. संदेश यादीच्या तळाशी असलेल्या ‘मार्क करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’वाचलेले म्हणून चिन्हांकित करा’ निवडा.

नोट : तुमच्या होम स्क्रीनवर दाखवलेल्या न वाचलेल्या संदेशांची संख्या तुमच्या ‘प्राथमिक’ श्रेणीतील न वाचलेल्या संदेशांची संख्या दर्शवते. सर्व श्रेणीतील न वाचलेल्या तुमच्या संदेशांची एकूण संख्या दाखवण्यासाठी, सेटिंग > नोटिफिकेशन्स > Mail > 'नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करा' वर जा, नंतर ’सर्व न वाचलेले संदेश’ सुरू करा.

‘प्राथमिक’ संदेश आणि पर्यायांची यादी प्रीव्ह्यू करणे

जर तुम्हाला प्राथमिक संदेश कशाबद्दल आहे हे बघायचे असेल पण तो पूर्णपणे उघडायचा नसेल, तर तुम्ही तो प्रिव्ह्यू करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. ‘प्राथमिक’ संदेश यादीमध्ये, संदेशातील कॉण्टेण्ट प्रीव्ह्यू करण्यासाठी संदेशावर टच आणि होल्ड करा आणि उत्तर देण्यासाठी, तो मूव्ह करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी पर्यायांची यादी पहा.

प्रत्येक ईमेलसाठी मोठा प्रिव्ह्यू दाखवणे

तुमच्या इनबॉक्समध्ये, ‘Mail’ डीफॉल्टनुसार प्रत्येक ईमेल संदेशासाठी टेक्स्टच्या दोन ओळी डिस्प्ले करते. संदेश उघडल्याशिवाय तुम्ही टेक्स्टच्या अधिक ओळी पाहण्यास निवडू शकता.

सेटिंग  > ॲप > Mail > 'प्रिव्ह्यू' वर जा ('संदेश यादी' च्या ख़ाली), त्यानंतर पाच ओळींपर्यंत निवडा.

संपूर्ण संभाषण दाखवणे

सेटिंग  > ॲप > ‘Mail’ वर जा, त्यानंतर ’थ्रेडने व्यवस्थापित करा’ चालू करा.

टिप : तुम्ही येथे इतर सेटिंग देखील बदलू शकता—उदाहरणार्थ, वाचलेले संदेश किंवा सर्वात अलीकडील संदेश वरच्या बाजूला संक्षिप्त करू शकता.

तुमच्या इनबॉक्समध्ये ‘प्रति’ आणि ‘Cc’ लेबल दाखवणे

सेटिंग  > ॲप > ‘Mail’ वर जा, आणि त्यानंतर (संदेश यादीच्या खाली) ‘प्रति/Cc लेबल दाखवा’ चालू करा.

तुम्ही प्रति/Cc मेलबॉक्स देखील बघू शकता, जो तुम्हाला पाठवलेले सर्व मेल गोळा करतो. हे दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, तुम्हाला मेलबॉक्सेस दिसेपर्यंत ‘Mail’ ॲपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात मेलबॉक्स बटण वर टॅप करा, ‘संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘प्रति किंवा Cc’ सिलेक्ट करा.

तुमच्या संपर्कांमध्ये एखाद्याला समाविष्ट करणे किंवा त्यांना VIP बनवणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या ‘संपर्क’ मध्ये जतन करू शकता जेणेकरून भविष्यात त्यांचे ईमेल संदेश सहजपणे पुन्हा सापडतील किंवा त्यांना VIP बनवू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होणारा कोणताही संदेश ऑटोमॅटिकली स्टार केला जाईल.

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेशमध्ये, एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा ईमेल ॲड्रेसवर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :

    • नवीन संपर्क समाविष्ट करा : ’संपर्क कार्ड बघा’ वर टॅप करा, त्यानंतर ’नवीन संपर्क तयार करा’ वर टॅप करा. इतर कोणतीही संपर्क माहिती भरा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • सध्याच्या संपर्कात ईमेल ॲड्रेस समाविष्ट करा : ‘संपर्क कार्ड बघा’ वर टॅप करा, नंतर ‘सध्याच्या संपर्कात समाविष्ट करा’ वर टॅप करा. संपर्क सिलेक्ट करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

    • तुमच्या VIP यादीमध्ये समाविष्ट करा : ‘VIP मध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

संपर्क छायाचित्रे दाखवणे किंवा लपवणे

  1. तुमच्या iPhone वरील Mail ॲपवर जा.

  2. इनबॉक्समध्ये, स्क्रीनच्या शीर्षस्थानी अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’संपर्क छायाचित्रे दाखवा’ सिलेक्ट करा किंवा डीसिलेक्ट करा.

ईमेल सारांश बघणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही त्याचा वापर ईमेल संदेश किंवा ईमेल थ्रेडमधील सर्वात महत्वाचे मुद्दे सारांशित करण्यासाठी करू शकता. Mail ॲपमध्ये Apple Intelligence वापरा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.