ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone ला गेम कंट्रोलरशी कनेक्ट करणे

तुम्ही Bluetooth® किंवा वायर्ड कनेक्शनद्वारे सुसंगत गेम कंट्रोलर तुमच्या iPhone शी कनेक्ट करू शकता. तुम्ही बटणे कस्टमाइझ करू शकता, मित्राकडून मदत मिळवण्यासाठी दुसरा कंट्रोलर समाविष्ट करू शकता आणि iPhone वर Apple Games ॲप मध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी तुमचा कंट्रोलर वापरू शकता.

Bluetooth गेम कंट्रोलर पेअर करणे

  1. कंट्रोलरला शोध मोडमध्ये ठेवण्यासाठी त्याबरोबर आलेल्या सूचनांचे पालन करा.

  2. तुमच्या iPhone वरील ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  3. ‘Bluetooth’ वर टॅप करा, ‘Bluetooth’ सुरू करा, नंतर डिव्हाइसच्या नावावर टॅप करा.

तुमच्या Apple डिव्हाइसला वायरलेस गेम कंट्रोलर कनेक्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

वायर्ड गेम कंट्रोलर कनेक्ट करणे

तुम्ही तुमच्या iPhone ला सुसंगत वायर्ड गेम कंट्रोलर कनेक्ट करू शकता. तुमच्या iPhone मॉडेल आणि कंट्रोलरनुसार, तुम्हाला अडॅप्टरची आवश्यकता असू शकते (स्वतंत्रपणे विकले गेलेले). तुमच्या कंट्रोलरसह आलेल्या सूचनांचे पालन करा.

गेम कंट्रोलर बटणे कस्टमाइझ करणे

तुम्ही सुसंगत गेम कंट्रोलर पेअर केल्यानंतर किंवा कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही Apple Games ॲपवरून सपोर्ट असलेल्या गेम्ससाठी बटणे कस्टमाइझ करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’सामान्य’ वर टॅप करा, त्यानंतर ’गेम कंट्रोलर’ वर टॅप करा.

  3. तुम्हाला कस्टमाइझ करायचा असलेला कंट्रोलर सिलेक्ट करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही कृती करा

    • डिफॉल्ट कंट्रोल्स कस्टमाइझ करा : ’डिफॉल्ट’ वर टॅप करा.

    • विशिष्ट गेमसाठी कंट्रोल्स कस्टमाइझ करा : ’गेम समाविष्ट करा’ वर टॅप करा, गेम सिल्केट करा, नंतर सिलेक्ट केलेल्या गेमसाठी ‘डीफॉल्ट’ वर टॅप करा.

  4. तुमच्या कंट्रोलरसह तुम्हाला वापरायच्या असलेल्या कृती आणि जेस्चर्स सिलेक्ट करा.

दुसरा गेम कंट्रोलर समाविष्ट करणे आणि फ्रेंडकडून मदत मिळवणे

‘बडी कंट्रोलर’ सह, iPhone दोन कंट्रोलर्सना एकाच प्लेअरच्या कॅरॅक्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकत्र काम करण्याची अनुमती देतो, जेणेकरून फ्रेंड तुम्हाला गेमच्या आव्हानात्मक भागांमध्ये नॅव्हिगेट करण्यास मदत करू शकेल. ‘बडी कंट्रोलर’ गेम कंट्रोलरला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही गेमशी सुसंगत आहे.

  1. दोन सुसंगत गेम कंट्रोलर्सना Bluetooth किंवा वायर्ड कनेक्शनद्वारे iPhone शी कनेक्ट करा.

  2. तुमच्या iPhone वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  3. ’सामान्य’ वर टॅप करा, त्यानंतर ’गेम कंट्रोलर’ वर टॅप करा.

  4. ’बडी कंट्रोलर’ वर टॅप करा.

  5. प्राथमिक कंट्रोलर निवडा, त्यानंतर दुय्यम कंट्रोलर निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.