ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘नकाशा’ मध्ये इलेक्ट्रिक वाहन रूटिंग सेट अप करणे

तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्ज करण्यासाठीचे थांबे समाविष्ट असलेल्या ट्रिपचे नियोजन करू शकता आणि ड्रायव्हिंग करताना तुमच्या चार्जमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवू करू शकता.

महत्त्वाचे : सिलेक्टेड वाहनावर आणि सिलेक्ट केलेल्या भागांमध्ये EV रूटिंग उपलब्ध आहे. देश आणि प्रदेशानुसार फीचर बदलत असतात. सुसंगततेच्या माहितीसाठी तुमच्या वाहनाच्या ओनर गाइडचा संदर्भ घ्या.

जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग दिशानिर्देश प्राप्त होतात, तेव्हा नकाशा तुमच्या वाहनाच्या चार्जचा मागोवा घेऊ शकते. मार्गातील उंचसखल भाग आणि इतर घटकांचे विश्लेषण करून, ‘नकाशा’ मार्गावरील योग्य चार्जिंग स्टेशन ओळखते आणि सिलेक्ट केलेले चार्जिंग प्रदाते आणि देशांसाठी, ते रिअल टाइम चार्जिंग स्टेशन उपलब्धता प्रदान करते. तुमचा चार्ज खूप कमी होईपर्यंत तुम्ही ड्राइव्ह केल्यास, तुम्हाला जवळच्या सुसंगत चार्जिंग स्टेशनपर्यंत जाण्याचा मार्ग प्रदान केला जाईल.

CarPlay ने EV रूटिंग सेट अप करणे

उत्पादकाककडून ॲपची आवश्यकता नसलेल्या सुसंगत इलेक्ट्रिक वाहनासाठी (EV), ‘नकाशा’ ॲपमध्ये EV रूटिंग सेट अप करण्यासाठी CarPlay चा वापर करा.

नोट : सुसंगततेच्या माहितीसाठी तुमच्या वाहनाच्या ओनर गाइडचा संदर्भ घ्या.

  1. iPhone ला CarPlay शी कनेक्ट करा.

  2. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  3. ड्रायव्हिंग दिशानिर्देश प्राप्त करा.

  4. ‘कनेक्ट करा’ वर टॅप करा (मार्गांच्या यादीच्या वर), नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

CarPlay आणि iPhone ची प्रस्तावना पहा.

वाहन उत्पादकाच्या ॲपचा वापर करून EV रूटिंग सेट अप करणे

उत्पादकाककडून ॲपची आवश्यकता असलेल्या सुसंगत वाहनासाठी, ‘नकाशा’ मध्ये EV रूटिंग सेट अप करण्यासाठी ॲपचा वापर करा.

नोट : सुसंगततेच्या माहितीसाठी तुमच्या वाहनाच्या ओनर गाइडचा संदर्भ घ्या.

  1. तुमच्या iPhone वर App Store वर जा.

  2. तुमच्या वाहनाच्या उत्पादकाचा शोध घ्या, नंतर त्याच्यासाठी EV रुटिंगला सपोर्ट करणारे ॲप डाउनलोड करा. ( App Store मध्ये ॲप्स मिळवणे पहा)

  3. ॲप उघडा, त्यानंतर त्याच्या सेटअप सूचनांचे पालन करा.

  4. नकाशा ॲप वर जा, त्यानंतर सर्च फील्डच्या पुढे तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा.

    जर तुम्हाला तुमचे छायाचित्र किंवा आद्याक्षरे दिसत नसतील, तर फील्डच्या पुढे ’रद्द करा’ वर टॅप करा किंवा सर्च फील्डवर टॅप करा, नंतर ’रद्द करा’ वर टॅप करा.

  5. ’वाहन’ वर टॅप करा, ’तुमची इलेक्ट्रिक वाहने कनेक्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुम्ही तुमच्या वाहनासाठी पसंतीचे चार्जिंग नेटवर्क नियुक्त करू शकता. नकाशा ॲप सिलेक्ट केलेले चार्जिंग प्रदाते आणि देशांना रिअल टाइम चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देते आणि तुम्ही प्लग प्रकार आणि नेटवर्कनुसार शोधू शकता.

तुम्हाला दिशानिर्देश मिळाल्यावर वेगळे वाहन निवडणे

जर तुम्ही अनेक वाहने चालवत असाल, तर तुम्ही बदलू शकता की ‘नकाशा’ कोणत्या वाहनासाठी रूट दिशानिर्देश प्रदान करत आहे.

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. ड्रायव्हिंग दिशानिर्देश प्राप्त करा.

  3. तुम्ही ’जा’ वर टॅप करण्यापूर्वी, रूट कार्डमध्ये खाली स्क्रोल करा.

  4. दुसरे इलेक्ट्रिक वाहन निवडा, किंवा तुमच्या iPhone वर EV रूटिंग ॲप नसलेले वाहन तुम्ही चालवत असल्यास, ‘भिन्न कार’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.