ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील नकाशांमध्ये गाइड असलेली ठिकाणे एक्सप्लोअर करणे

तुम्हाला खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे, खरेदी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी जगभरातील उत्तम ठिकाणे शोधण्यात मदत करण्यासाठी गाइड उपलब्ध आहेत. नवीन ठिकाणांचा समावेश केल्याबरोबर गाइड ऑटोमॅटिकली अपडेट केले जातात, त्यामुळे तुम्हाला नेहमी नवीनतम शिफारशी मिळतात.

नकाशा ॲप पाण्याखालील स्थानांविषयी गाइड दाखवित आहे.

गाइडसह जग एक्सप्लोअर करणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. खाली स्क्रोल करा, त्यानंतर ‘आम्हाला आवडणारी गाइड्स’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणत्याही एकानुसार ब्राउझ करा :

    • शहर : स्क्रीनच्या शीर्षस्थानाजवळ ‘खाली जा’ बटण वर टॅप करा, नंतर शहरावर टॅप करा. तुम्ही ‘शहरे’ श्रेणीमध्येदेखील खाली स्क्रोल करू शकता.

    • आवडते : स्वारस्य असलेल्या गोष्टीवर टॅप करा, त्यानंतर त्या गटातील गाइड्स ब्राउझ करण्यासाठी टॅप करा.

    • प्रकाशक : ‘प्रकाशकानुसार ब्राउझ करा’ श्रेणीपर्यंत खाली स्क्रोल करा, त्यानंतर ‘प्रकाशक’ वर टॅप करा.

‘गाइड’ बघणे, शेअर करणे आणि जतन करणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. गाइड उघडण्यासाठी, त्याच्या कव्हरवर टॅप करा. त्याचा कॉण्टेण्ट बघण्यासाठी, ‘खाली’ स्क्रोल करा.

    तुम्ही पुढील गोष्टीदेखील करू शकता :

    • गाइड जतन करा : ’गाइड्समध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • गाइड शेअर करा : ‘शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

    • जतन केलेली गाइड पहा : ’स्थान’ वर टॅप करा, त्यानंतर ’गाइड्स’ वर टॅप करा. कस्टम गाइड्ससह ठिकाणे व्यवस्थापित करा पहा.

    • गाइड बंद करा : ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

टिप : ॲप क्लिप बटणे शोधा. यामुळे तुम्हाला थेट गाइडकडून टेबल आरक्षित करण्यासारख्या गोष्टी करण्याची अनुमती मिळते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.