ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

बेसिक सेटअप करणे

तुम्ही पहिल्यांदा डिव्हाइस चालू करता तेव्हा ते चालू ठेवण्यात मदत करण्यासाठी iPhone मध्ये सेटअपची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा तुमच्याकडे मूलभूत सेट अप केले असल्याची खात्री करायची असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

तुमचा iPhone दुसऱ्या iPhone किंवा iPad च्या जवळ आणून किंवा दुसरे डिव्हाइस न वापरता सेट अप करून iPhone सेट अप करण्याच्या पर्यायांसह क्विक स्टार्ट स्क्रीन.

तुमचे ॲप्स आणि माहिती तुमच्या नवीन iPhone वर ट्रान्सफर करणे

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा iPhone चालू करता आणि सेटअप प्रक्रिया चालू करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आधीच्या iPhone मधून तुमचे बरेचसे ॲप, सेटिंग आणि कॉण्टेंट वायरलेस पद्धतीने थेट तुमच्या नवीन iPhone मध्ये ट्रान्सफर करू शकता—फक्त दोन्ही डिव्हाइस जवळ आणा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

सेटिंगमध्ये Wi-Fi पर्याय स्क्रीन. Wi-Fi चालू केलेले आहे, आणि नेटवर्क सिलेक्ट केले गेले आहे.

मोबाइल सेवा सेट अप करणे आणि Wi-Fi ला कनेक्ट करणे

तुमच्या मॉडेलनुसार, तुमच्या मोबाइल नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे eSIM वापरा किंवा प्रत्यक्ष SIM कार्ड इन्स्टॉल करा. तुमचा iPhone तुमच्या मोबाइल प्लॅनला कनेक्ट केलेला आहे हे तपासण्यासाठी, सेटिंग  > ‘मोबाइल सेवा’ वर जा.

तुमचा iPhone तुमच्या होम Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी, सेटिंग  > ‘Wi-Fi ‘ वर जा, Wi-Fi चालू करा, नंतर तुमचे नेटवर्क निवडा. तुम्ही घरी असताना iPhone ऑटोमॅटिकली तुमच्या Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट होतो.

Apple अकाउंट साइन इन स्क्रीन.

तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे

तुमचे Apple अकाउंट तुम्हाला App Store, iTunes Store, Apple Books, Apple Music, FaceTime, iCloud, iMessage आणि अशा बऱ्याच Apple सेवांचा ॲक्सेस देते.

तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी, सेटिंग  > ‘Apple अकाउंट’ मध्ये जा. तुमच्याकडे iPad असल्यास (iPadOS 17 किंवा नंतरच्या व्हर्जनसह) किंवा दुसरा iPhone (iOS 17 किंवा नंतरच्या व्हर्जनसह) असल्यास, तुम्ही तुमचा iPhone तुमच्या दुसऱ्या डिव्हाइसच्या जवळ आणू शकता. अन्यथा, तुम्ही मॅन्युअली साइन इन करू शकता. तुम्ही साइन इन केले असल्याची पडताळणी करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] वर जा; तुमचे Apple अकाउंट तुमच्या नावाच्या खाली दिसेल.

Face ID रेकग्निशन सेटअप स्क्रीन. वर्तुळात बंद केलेला चेहरा स्क्रीनवर दाखवण्यात आला आहे. फेसच्या खाली असलेले टेक्स्ट यूझरला वर्तुळ पूर्ण करण्यासाठी त्यांचे डोके हळूवारपणे मूव्ह करण्याचे निर्देश देतो.

Face ID किंवा Touch ID सेट अप करणे

तुमचा iPhone सुरक्षितपणे लॉक करण्यासाठी, अनेक ॲपमध्ये साइन इन करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी तुम्ही Face ID (फेस रेकग्निशन) किंवा Touch ID (तुमच्या बोटाचा ठसा) वापरू शकता. तुमच्या सुरक्षेसाठी, Face ID आणि Touch ID डेटा तुमच्या डिव्हाइसमधून बाहेर पडत नाही आणि इतर कुठेही जतन केला जात नाही.

तुमच्या iPhone मॉडेलनुसार, पुढीलपैकी एक करा :

  • Face ID सेट अप करा : सेटिंग  > ‘Face ID व पासकोड’ वर जा, ‘Face ID सेट अप करा’ वर टॅप करा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  • Touch ID सेट अप करा : सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा, ‘बोटाचा ठसा समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

‘शोधाशोध’ स्क्रीन ‘होम’ वर दोन डिव्हाइस दाखवत आहे.

‘माझा iPhone शोधा’ चालू करणे

तुमचा iPhone हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही त्याचा शोधू लावू शकता.

सेटिंग  > [तुमचे नाव] > ’शोधाशोध’ वर जा, ’माझा iPhone शोधा’ वर टॅप करा, नंतर ‘माझा iPhone शोधा’ चालू करा. ‘शोधाशोध’ ॲपमध्ये तुम्ही तुमच्या डिव्हाइसचे स्थान पाहू शकता. तुमचा iPhone हरवल्यास आणि तुमच्याकडे शोधाशोध ॲपचा ॲक्सेस नसल्यास, तुम्ही iCloud.com वर ‘शोधाशोध’ वापरून तुमचे डिव्हाइस शोधू शकता.

iCloud स्टोरेज मीटर आणि ॲप्स व फीचर्सची यादी दाखवणारी iCloud सेटिंग स्क्रीन.

iCloud मध्ये तुमचा डेटा स्टोअर करणे

iCloud तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवण्यात आणि तुमच्या डिव्हाइसवर सिंक करण्यात मदत करते. तुम्ही तुमचा iPhone बदलल्यास किंवा हरवल्यास, किंवा तो खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास, तुमची छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर गोष्टी iCloud मध्ये सुरक्षित राहतात.

iCloud सह तुम्हाला वापरायचे असलेले फीचर चालू करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

सर्व फीचर सर्व iPhone मॉडेलसाठी उपलब्ध नाहीत.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.