ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील संकेतस्थळे आणि ॲप्समध्ये साइन इन करण्यासाठी पासकी वापरणे

तुमच्या iPhone वर सपोर्ट केलेली संकेतस्थळे आणि ॲप्स ह्यावर साइन इन करण्यासाठी वापरले जाणारे पासवर्ड बदलण्यासाठी तुम्ही पासकी तयार आणि जतन करू शकता.

पासवर्डपेक्षा ’पासकी’ अधिक सुरक्षित असतात, कारण त्या तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसद्वारे प्रत्येक अकाउंटसाठी अद्वितीयपणे तयार केल्या जातात आणि त्यांना फिशिंगचा धोका कमी असतो. आणि तुम्ही एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेल्या तुमच्या सर्व डिव्हाइसवर काम करतात.

तसेच, संकेतस्थळे आणि ॲप ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटसाठी पासकी तयार करू शकतात, जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी साइन इन करता तेव्हा तुम्ही पासकी वापरू शकता.

पासवर्डप्रमाणे, ‘पासकी’ एन्क्रिप्ट केल्या जातात आणि तुमच्या iCloud कीचेन मध्ये संग्रहित केल्या जातात, जिथे त्या कोणालाही दिसत नाहीत (Apple सह).

नोट : पासकी वापरण्यासाठी, iCloud कीचेन आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केलेले असणे आवश्यक आहे.

तुमचा iPhone वापरून पासकी तयार करणे आणि जतन करणे

तुम्ही संकेतस्थळे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या ॲपसाठी पासकी तयार आणि जतन करू शकता.

नोट : ॲप, संकेतस्थळ किंवा ब्राउझरनुसार ’पासकी’ तयार करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी सूचना बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यतः पुढीलप्रमाणेच पायऱ्या असतात.

  1. तुमच्या iPhone वर सपोर्ट केलेल्या संकेतस्थळ किंवा ॲपच्या साइन इन स्क्रीनवर जा आणि पुढीलपैकी एक करा :

    • तुम्ही नवीन अकाउंट सेट अप करत असल्यास : नवीन अकाउंट्स सेट अप करण्यासाठी बटण किंवा लिंकवर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    • तुमच्याकडे आधीपासूनच सध्याचे अकाउंट असल्यास : तुमचे अकाउंटचे नाव आणि पासवर्ड वापरून साइन इन करा, त्यानंतर अकाउंट सेटिंग किंवा मॅनेजमेंट स्क्रीनवर जा.

  2. जेव्हा तुम्हाला अकाउंटची पासकी जतन करण्याचा पर्याय दिसतो, तेव्हा ’चालू ठेवा’ वर टॅप करा.

    तुमची पासकी जतन केली गेली आहे.

    जेव्हा पासकी अकाउंटसाठी जतन केली जाते तेव्हा दिसणारी साइन इन स्क्रीन. ‘चालू ठेवा’ आणि ‘इतर पर्याय’ बटणे स्क्रीनच्या तळाशी आहेत.

    नोट : जर तुम्हाला ’पासकी’ पर्याय दिसत नसेल, तर ह्याचा अर्थ असा की संकेतस्थळ किंवा ॲप सध्या ’पासकी’ ला सपोर्ट करत नाही.

तुम्ही तयार केलेल्या ‘पासकी’ तुमच्या iPhone वर पासवर्ड ॲपमध्ये संग्रहित केल्या जातात.

तुमच्याकडे एकाच संकेतस्थळ किंवा ॲपसाठी पासकी आणि पासवर्ड असू शकतो, आणि पासवर्ड ॲपमध्ये एकाच अकाउंटखाली तुम्ही ते दोन्ही शोधू शकता.

तुम्ही ‘हार्डवेअर सुरक्षा की’ मध्ये देखील एक पासकी जतन करू शकता. “इतर पर्याय”, “दुसऱ्या डिव्हाइसवर जतन करा” किंवा तत्सम (उपलब्ध असल्यास) पर्यायावर टॅप करा, त्यानंतर पासकी जतन करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी ‘सुरक्षा की’ वापरा पहा.

तुमच्या iPhone वरील संकेतस्थळ किंवा ॲपमध्ये साइन इन करण्यासाठी पासकी वापरणे

तुम्ही संकेतस्थळ किंवा ॲपसाठी ‘पासकी’ तयार आणि जतन केल्यानंतर, तुम्ही जेव्हा साइन इन करता तेव्हा तुम्ही ‘पासकी’ वापरू शकता.

नोट : ॲप, संकेतस्थळ किंवा ब्राउझरनुसार ’पासकी’ सह साइन इन करण्यासाठी सूचना बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यतः पुढीलप्रमाणेच पायऱ्या असतात.

  1. तुमच्या iPhone वर संकेतस्थळ किंवा ॲपवर जा आणि साइन इन स्क्रीनवर अकाउंटच्या नावाच्या फील्डवर टॅप करा.

  2. स्क्रीनच्या तळाशी किंवा कीबोर्डच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या सुचवलेल्या अकाउंटच्या नावावर टॅप करा. जर अकाउंटचे नाव दिसत नसेल, किंवा तुम्हाला वेगळे नाव वापरायचे असेल, तर ते प्रविष्ट करा.

  3. साइन इन पूर्ण करण्यासाठी Face ID किंवा Touch ID वापरा. जर तुम्ही तुमच्या iPhone वर Face ID किंवा Touch ID सेट अप केला नसेल, तर तुमच्या डिव्हाइसचा पासकोड प्रविष्ट करा (जो कोड तुम्ही तुमचा iPhone अनलॉक करण्यासाठी वापरता).

    तुम्ही जतन केलेल्या ‘पासकी’ मुळे साइन इन ऑटोमॅटिकली पूर्ण केले जाते.

इतर डिव्हाइसवर साइन इन करण्यासाठी तुमच्या iPhone वर जतन केलेली पासकी वापरणे

जर तुम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न नसलेले डिव्हाइस वापरत असाल (जसे की सार्वजनिक लायब्ररीमधील संगणक, इंटरनेट कॅफे किंवा फ्रेंडचे घर) आणि तुमच्याकडे तुमचा iPhone असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी तयार केलेल्या ‘पासकी’ वापरून त्या डिव्हाइसवरील ॲप किंवा संकेतस्थळावर साइन इन करू शकता.

नोट : ॲप, संकेतस्थळ किंवा ब्राउझरनुसार दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी वापरण्यासाठी सूचना बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यतः पुढीलप्रमाणेच पायऱ्या असतात.

  1. दुसऱ्या डिव्हाइसवर, संकेतस्थळ किंवा ॲपवर जा आणि साइन इन स्क्रीनवर अकाउंटच्या नावाच्या फिल्डमध्ये तुमचे यूझर नेम प्रविष्ट करा.

  2. “इतर पर्याय”, “जवळपासच्या डिव्हाइसमधील पासकी” किंवा तत्सम पर्याय सिलेक्ट करा, त्यानंतर स्क्रीनवर QR कोड डिस्प्ले करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  3. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचा iPhone कॅमेरा वापरा.

    ‘iCloud कीचेन’ मध्ये जतन केलेल्या ‘पासकी’ मुळे साइन इन ऑटोमॅटिकली पूर्ण केले जाते.

डिव्हाइसवर अशी एक पासकी तयार करणे जी तुमची नाही

तुमच्याकडे तुमचा iPhone असल्यास, तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न नसलेल्या डिव्हाइसचा वापर करताना तुम्ही एक ‘पासकी’ तयार करू शकता (जसे की सार्वजनिक लायब्ररीमधील संगणक, इंटरनेट कॅफे किंवा फ्रेंडचे घर) आणि तुम्ही पासकी तयार करण्यासाठी वापरत असलेल्या डिव्हाइसऐवजी iCloud कीचेनमध्ये ती जतन करू शकता.

नोट : ॲप, संकेतस्थळ किंवा ब्राउझरनुसार ’पासकी’ तयार करण्यासाठी सूचना बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यतः पुढीलप्रमाणेच पायऱ्या असतात.

  1. इतर डिव्हाइसवर, सपोर्ट करणाऱ्या संकेतस्थळ किंवा ॲपच्या साइन इन पृष्ठावर जा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :

    • तुम्ही नवीन अकाउंट सेट अप करत असल्यास : नवीन अकाउंट्स सेट अप करण्यासाठी बटण किंवा लिंकवर टॅप करा, त्यानंतर नवीन यूझरनेम प्रविष्ट करा.

    • तुमच्याकडे आधीपासूनच अकाउंट असल्यास : तुमचे अकाउंटचे नाव आणि पासवर्ड वापरून साइन इन करा, त्यानंतर अकाउंट सेटिंग किंवा मॅनेजमेंट स्क्रीनवर जा.

  2. जेव्हा तुम्हाला अकाउंटची पासकी जतन करण्याचा पर्याय दिसतो, तेव्हा “इतर पर्याय”, “दुसऱ्या डिव्हाइसवर जतन करा” किंवा तत्सम पर्याय (‘चालू ठेवा’ ऐवजी) सिलेक्ट करा.

    नोट : जर तुम्हाला ’पासकी’ पर्याय दिसत नसेल, तर ह्याचा अर्थ असा की संकेतस्थळ किंवा ॲप सध्या ’पासकी’ ला सपोर्ट करत नाही.

  3. “कॅमेरा असलेल्या डिव्हाइसवर पासकी जतन करा” किंवा तत्सम पर्याय सिलेक्ट करा, नंतर स्क्रीनवर QR कोड डिस्प्ले करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  4. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचा iPhone कॅमेरा वापरा.

    ही ‘पासकी’ तुमच्या iPhone आणि iCloud कीचेनमध्ये जतन केली गेली आहे.

पासकी बदलणे

कदाचित तुम्हाला सध्याची पासकी बदलण्यासाठी नवीन पासकी तयार करावी लागेल (उदाहरणार्थ, जर तुम्ही हे आधी ज्यांच्याकडे तुम्हाला आता ॲक्सेस द्यायचा नाही अशा व्यक्तीबरोबर शेअर केले असेल तर).

पासकी बदलण्यासाठी, पासकी तयार करा आणि जतन करा किंवा डिव्हाइसवर अशी एक पासकी तयार करणे जी तुमची नाही मध्ये सध्याच्या अकाउंटसाठीच्या सूचनांचे पालन करा.

पासकी हटवणे

  1. तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर जा.

  2. ’पासकी’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्ही हटवू इच्छित असलेल्या ’पासकी’ साठी अकाउंटवर टॅप करा.

  3. ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  4. ’पासकी हटवा’ वर टॅप करा.

तुम्ही जर ’पासकी’ हटवली, तर तुम्ही कधीही नवीन ’पासकी’ तयार करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.