ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर कॉलवर असताना

जेव्हा तुम्ही iPhone वर फोन कॉलवर असाल, तेव्हा तुम्ही ऑडिओ स्पीकरवर किंवा Bluetooth® डिव्हाइसवर स्विच करू शकता.

कॉल दरम्यान ऑडिओ ॲडजस्ट करणे

व्हॉल्यूम बदलण्यासाठी, iPhone च्या बाजूला असलेल्या व्हॉल्यूम बटणांवर प्रेस करा. किंवा कॉल बॅनरवर खाली स्वाइप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • म्यूट करा : ‘म्यूट करा’ बटणावर टॅप करा.

  • कॉल होल्डवर ठेवा : ’म्यूट करा’ बटणावर टच आणि होल्ड करा.

  • हॅण्डस् फ्री चर्चा करा : ऑडिओ बटणावर टॅप करा, नंतर ऑडिओ डेस्टिनेशन निवडा.

कॉल करत असताना दुसरे ॲप वापरणे

  1. होम स्क्रीनवर जा , नंतर ॲप उघडा.

  2. कॉलवर परत जाण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या हिरव्या ‘कॉल इंडिकेटर’ वर टॅप करा.

त्याच लाइनवर दुसऱ्या कॉलला प्रतिसाद देणे

जर तुम्ही कॉलवर असाल आणि दुसरा कॉल आला असेल, तर पुढीलपैकी एक करा :

  • कॉलकडे दुर्लक्ष करा आणि तो व्हॉइसमेलवर पाठवा : ‘दुर्लक्ष करा’ वर टॅप करा.

  • पहिला कॉल समाप्त करा आणि नवीन कॉलला उत्तर द्या : GSM नेटवर्क वापरताना, ‘समाप्त करा + स्वीकारा’ वर टॅप करा. CDMA नेटवर्कसह, ‘समाप्त करा’ वर टॅप करा; जेव्हा दुसरा कॉल पुन्हा वाजेल, तेव्हा ‘स्वीकारा’ वर टॅप करा किंवा iPhone लॉक असल्यास स्लायडर ड्रॅग करा.

  • पहिला कॉल होल्डवर ठेवा आणि नवीन कॉलला उत्तर द्या : ‘होल्ड करा’ + ‘स्वीकारा’ वर टॅप करा.

    तुमचा कॉल होल्डवर असताना कॉलमध्ये स्विच करण्यासाठी, ‘कॉलमध्ये स्विच करण्यासाठी स्वॅप करा’ वर टॅप करा किंवा एकाच वेळी दोन्ही पक्षांशी बोलण्यासाठी ‘कॉल एकत्र करा’ वर टॅप करा. कॉन्फरन्स किंवा थ्री-वे कॉल सुरू करणे पहा.

नोट : CDMA सह, दुसरा कॉल आउटगोइंग असल्यास तुम्ही कॉलमध्ये स्विच करू शकत नाही, परंतु तुम्ही कॉल एकत्र करू शकता. दुसरा कॉल येत असल्यास तुम्ही कॉल एकत्र करू शकत नाही. जर तुम्ही दुसरा कॉल किंवा एकत्र केलेला कॉल समाप्त केला, तर दोन्ही कॉल समाप्त होतात.

ड्युअल SIM असलेल्या मॉडेल वर, पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

  • दुसऱ्या लाइनचा कॉलसाठी वापर केला जात असताना कॉल प्राप्त करण्यासाठी त्या लाइनला एनेबल करण्यासाठी लाइनसाठी ‘Wi-Fi कॉलिंग’ चालू करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एका लाइनवर कॉल आला आणि दुसरी लाइन कॉलसाठी वापरली जात आहे आणि कोणतेही Wi-Fi कनेक्शन उपलब्ध नसेल, तर iPhone दुसऱ्या लाइनवरील कॉल प्राप्त करण्यासाठी, कॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या लाइनचा मोबाइल डेटा वापरतो. शुल्क लागू होऊ शकते. दुसऱ्या लाइनवरील कॉल प्राप्त करण्यासाठी, कॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या लाइनला तुमच्या ‘मोबाइल डेटा सेटिंग’ (एकतर डिफॉल्ट लाइन म्हणून किंवा ‘मोबाइल डेटा स्विचिंग करण्याची अनुमती द्या’ चालू करुन नॉन डिफॉल्ट लाइन म्हणून) मध्ये डेटाचा वापर करण्याची परवानगी असणे आवश्यक आहे.

  • जर तुम्ही लाइनसाठी Wi-Fi कॉलिंग चालू केले नाही, तर त्या लाइनवरील कोणतेही इनकमिंग फोन कॉल (आपत्कालीन सेवांच्या कॉलसह) दुसरी लाइन वापरात असताना थेट व्हॉइसमेलवर (तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरद्वारे उपलब्ध असल्यास) जातात; तुम्हाला मिस्ड कॉल नोटिफिकेशन प्राप्त होणार नाहीत.

    जर तुम्ही लाइन व्यस्त असताना किंवा सेवेत नसताना एका लाइनवरून दुसऱ्या लाइनवर ‘कंडिशनल कॉल फॉरवर्डिंग’ (तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरद्वारे उपलब्ध असल्यास) सेट अप केल्यास, कॉल व्हॉइसमेलवर जात नाहीत; सेटअपच्या माहितीसाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.