ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ’आरोग्य’ मध्ये तुमचे ‘आरोग्य तपशील’ भरणे

तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी, ‘आरोग्य तपशील’ मध्ये तुमचे नाव, जन्मदिनांक, लिंग आणि इतर मूलभूत माहिती समाविष्ट करा. तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक प्रतिसादकर्त्यांना आणि इतरांना मदत करण्यासाठी, वैद्यकीय ID तयार करा ज्यामध्ये वैद्यकीय स्थिती, औषधे, ॲलर्जी, रक्तगट, आपत्कालीन संपर्क आणि बरीच माहिती असेल. आरोग्य ॲपच्या मदतीने तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी, वेळोवेळी ‘आरोग्य चेकलिस्ट’ रिव्ह्यू करा.

‘आरोग्य तपशील’ स्क्रीन भरणे

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ’आरोग्य’ उघडता, तेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दलची मूलभूत आरोग्य माहिती प्रदान करण्यास सांगितले जाते. तुम्ही विनंती केलेली सर्व माहिती प्रदान केली नसल्यास, तुम्ही ती नंतर ‘आरोग्य तपशील’ स्क्रीनवर समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर आरोग्य ॲपवर जा.

  2. वरच्या उजव्या बाजूला तुमच्या चित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा.

    जर तुम्हाला तुमचे चित्र किंवा आद्याक्षरे दिसत नसतील, तर स्क्रीनच्या तळाशी ‘सारांश’ किंवा ‘ब्राउझ करा’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागावर स्क्रोल करा.

  3. ‘आरोग्य तपशील’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

    ‘आरोग्य तपशील’ स्क्रीन, ज्यात नाव, जन्मदिनांक, रक्तगट आणि इतर माहितीसाठी फील्ड समाविष्ट आहेत.
  4. बदल करण्यासाठी, फील्डवर टॅप करा.

  5. तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

वैद्यकीय ID तयार करणे

तुमचा iPhone लॉक केलेला असला तरीही, प्रथम प्रतिसाद देणारे आणि इतर लोक तुमच्या वैद्यकीय ID मध्ये तुमच्याबद्दलची महत्वाची वैद्यकीय माहिती पाहू शकतात. तुमचा वैद्यकीय ID सेट अप करणे आणि बघणे पहा.

वैद्यकीय ID स्क्रीन ज्यामध्ये जन्मदिनांक, औषधे, ॲलर्जी, आपत्कालीन संपर्क आणि वैद्यकीय स्थिती ह्यासारख्या माहितीचा समावेश असतो.

तुमची ‘आरोग्य चेकलिस्ट’ रिव्ह्यू करणे

  1. तुमच्या iPhone वर आरोग्य ॲपवर जा.

  2. वरच्या उजव्या बाजूला तुमच्या चित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा.

    जर तुम्हाला तुमचे चित्र किंवा आद्याक्षरे दिसत नसतील, तर स्क्रीनच्या तळाशी ‘सारांश’ किंवा ‘ब्राउझ करा’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागावर स्क्रोल करा.

  3. ‘आरोग्य चेकलिस्ट’ वर टॅप करा.

  4. यादीमध्ये आयटम चालू करण्यासाठी किंवा त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, त्यावर टॅप करा.

  5. तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.