ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर क्विक नोट्स वापरणे

iPhone वर कोणत्याही ॲप किंवा स्क्रीनवर माहिती लिहिण्यासाठी तुम्ही क्विक नोट्स वापरू शकता. क्विक नोटमध्ये लिंक, इमेज, टॅग, आणि उल्लेख समाविष्ट करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची नावे, नंबर, आणि कल्पना सहजपणे मिळू शकतील. जेव्हा तुम्ही Safari मध्ये टेक्स्ट हायलाइट करता किंवा ॲपमधून लिंक समाविष्ट करता, तेव्हा पुढील वेळी तुम्ही संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला क्विक नोट थंबनेल दिसते, जे तुम्हाला तुम्ही आधी जे बघत होता तेथे घेऊन जाईल.

कौटुंबिक सुट्टीसाठी करायच्या कामांची यादी दाखवणारी नोट. नोटमध्ये वेबपेजची लिंक, दुसऱ्या नोटची लिंक, खरेदी करण्यासाठी वस्तुंची यादी, आणि सर्वात खाली छायाचित्र असते.

तुम्ही नोट्स ॲपमध्ये तुमच्या सर्व क्विक नोट्स ॲक्सेस करू शकता. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या iPhone वर क्विक नोट तयार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या iPad आणि Mac वर देखील नोट पाहू शकता.

क्विक नोट तयार करणे

कोणत्याही ॲपमधून क्विक नोट बनवण्यासाठी, खालीलपैकी कोणतेही काम करा :

क्विक नोट्स बघणे आणि व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या iPhone वर नोट्स ॲपवर जा.

  2. फोल्डर यादीमध्ये ‘क्विक नोट्स’ वर टॅप करा.

नोट : वेगळ्या फोल्डरमध्ये मूव्ह केल्याशिवाय तुम्ही क्विक नोट लॉक करू शकत नाही.

तुम्ही वैयक्तिक क्विक नोट वेगळ्या फोल्डरमध्ये मूव्ह केल्यास, ती स्टॅण्डर्ड नोट बनते आणि इतर ॲपमध्ये ह्यापुढे क्विक नोट म्हणून दिसत नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.