ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील Apple TV ॲपमध्ये बघणे सुरू करणे आणि प्लेबॅक नियंत्रित करणे

Apple TV ॲपमध्ये, तुम्ही TV शो, चित्रपट, खेळ आणि बरेच काही स्ट्रीम करू शकता. तुम्ही चित्रपट आणि TV शोचे एपिसोड देखील डाउनलोड करू शकता. iOS 18.2 किंवा नंतरच्या व्हर्जनमध्ये, तुम्ही TV शोचा पूर्ण सीझन डाउनलोड करू शकता.

Apple TV+ आणि Apple TV चॅनलमधील कॉण्टेंट Apple TV ॲपमध्ये प्ले केला जातो, तर इतर प्रदात्यांचा कॉण्टेंट त्यांच्या व्हिडिओ ॲपमध्ये प्ले केला जातो. तुम्ही काय बघत आहात ते प्ले किंवा पॉज करण्यासाठी प्लेबॅक कंट्रोल वापरा, मागे किंवा पुढे वगळा आणि बरेच काही करा.

जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर SharePlay वापरून बघता, तेव्हा FaceTime कॉलवर प्रत्येकजण प्लेबॅक कंट्रोल शेअर करतो. Apple TV ॲपमध्ये SharePlay वापरण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, FaceTime मध्ये एकत्र बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि प्ले करण्यासाठी SharePlay वापरा पहा.

TV शो किंवा चित्रपट प्ले करणे

होम टॅबच्या मध्यभागी ’पाहणे चालू ठेवा’ ओळीच्या वर वैशिष्ट्यपूर्ण ‘Apple ओरिजिनल’ दर्शविले आहे. तळाशी, डावीकडून उजवीकडे, होम, Apple TV+, स्टोअर, लायब्ररी आणि ‘सर्च करा’ टॅब आहेत.
  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • वैशिष्ट्यपूर्ण आयटम्स ब्राउझ करण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा, त्यानंतर ’प्ले करा’ बटणावर टॅप करा (उपलब्ध असल्यास).

    • ’होम’ वर टॅप करा, त्यानंतर 'बघणे चालू ठेवा' ओळीतील आयटमवर टॅप करा आणि तुम्ही जिथे बघणे थांबवले होते तिथून बघणे त्वरित सुरू करा.

    • अधिक रो बघण्यासाठी खाली स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला बघायचे असलेल्या आयटमवर टॅप करा. जेव्हा त्या आयटमचे पृष्ठ उघडते, तेव्हा ’प्ले करा’ बटणावर (उपलब्ध असल्यास) टॅप करा किंवा तुम्हाला बघायचा असलेल्या विशिष्ट एपिसोड किंवा ट्रेलरवर टॅप करा.

      टिप : श्रेणीतील सर्व आयटम्स बघण्यासाठी किंवा संग्रहाविषयी अधिक माहिती बघण्यासाठी ’शीर्षक’ ओळीवर टॅप करा.

कॉण्टेण्ट डाउनलोड करणे

Apple Originals च्या एपिसोडची यादी दाखवणारा Apple TV+ टॅब. संपूर्ण सीझन आणि प्रत्येक एपिसोड डाउनलोड करण्यासाठीची बटणे स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतील.

Apple TV ॲपमध्ये, तुम्ही चित्रपट आणि TV शोचे एपिसोड डाउनलोड करू शकता. iOS 18.2 किंवा नंतरच्या व्हर्जनमध्ये, तुम्ही TV शोचा पूर्ण सीझन डाउनलोड करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. आयटमचे तपशील पाहण्यासाठी त्यावर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणताही पर्याय निवडा (सर्व शीर्षकांसाठी सर्व पर्याय उपलब्ध नाहीत):

    • चित्रपट डाउनलोड करा : ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा.

    • TV शोचा एपिसोड डाउनलोड करा : ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा, 'सीझन' वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचे असलेल्या एपिसोडच्या पुढे ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा.

    • TV शोचा पूर्ण सीझन डाउनलोड करा : ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा, 'सीझन' वर टॅप करा, नंतर स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या 'सीझन बटण' वर टॅप करा.

iPhone इंटरनेटशी कनेक्ट केलेला नसतानाही तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये डाउनलोड केलेला आयटम शोधू शकता आणि बघू शकता.

तुम्ही भाड्याने घेतलेला चित्रपट बघणे

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲप वर जा.

  2. ‘लायब्ररी’ वर टॅप करा, ‘भाड्याने’ वर टॅप करा, त्यानंतर ‘चित्रपट’ वर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • चित्रपट प्ले करा : ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा. ‘भाडे कालावधी’ मध्ये शिल्लक वेळ दाखवली गेली आहे.

    • चित्रपट डाउनलोड करा : iPhone इंटरनेटशी कनेक्ट केलेला नसेल तेव्हा नंतर आयटम पाहण्यासाठी ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा.

प्लेबॅक कंट्रोल वापरणे

प्लेबॅकच्या दरम्यान, कंट्रोल दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.

कंट्रोल दृश्यमान असलेला, TV शो प्ले केला जात आहे. ‘बंद करा’, पिक्चर इन पिक्चर, AirPlay आणि ‘शेअर करा’ बटणे वर डाव्या बाजूला आहेत. व्हॉल्यूम स्लायडर वरच्या उजव्या बाजूला आहे. मध्यभागी 10 सेकंद मागे वगळण्यासाठी, पॉज करण्यासाठी आणि 10 सेकंद पुढे वगळण्यासाठी बटणे आहेत. खालच्या भागात मध्यभागी एक स्लायडर आहे ज्याला तुम्ही व्हिडिओची स्थिती समायोजित करण्यासाठी ड्रॅग करू शकता; कालबाह्य झालेला वेळ आणि उर्वरित वेळ स्लायडरच्या दोन्ही बाजूंना दिसते. तळाशी उजवीकडे माहिती, इनसाइट आणि ‘बघणे चालू ठेवा’ बटणे आहेत.

कंट्रोल

वर्णन

‘प्ले करा’ बटण

प्ले करा

‘पॉज करा’ बटण

पॉज करा

’10 सेकंद मागे जा’ बटण

10 सेकंद मागे वगळा; रिवाइंड करण्यासाठी टच आणि होल्ड करा

’10 सेकंद पुढे जा’ बटण

10 सेकंद पुढे वगळा; फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी टच आणि होल्ड करा

‘प्लेबॅक स्पीड’ बटण

प्लेबॅकची गती बदला

ऑडिओ बटण

ऑडिओ ट्रॅक बदला आणि संवाद एन्हान्स करा

उपशीर्षक बटण

उपशीर्षके आणि क्लोज्ड कॅप्शन डिस्प्ले करा

‘शेअर करा’ बटण

एपिसोड, चित्रपट, ट्रेलर किंवा क्रीडा इव्हेंट शेअर करा

AirPlay बटण

इतर डिव्हाइसवर व्हिडिओ स्ट्रीम करा

‘पिक्चर इन पिक्चर’ बटण

पिक्चर इन पिक्चर सुरू करा—तुम्ही दुसऱ्या ॲपचा वापर करत असताना तुम्ही व्हिडिओ बघणे चालू ठेवू शकता

‘बंद करा’ बटण

प्लेबॅक थांबवा

जेव्हा ऑडिओ म्यूट केला जातो, तेव्हा उपशीर्षके ऑटोमॅटिकली दिसतात. आणि जर तुम्ही 10 सेकंद मागे वगळले, तर उपशीर्षके दिसतील. उपशीर्षके बंद करण्यासाठी,उपशीर्षक बटण वर टॅप करा, नंतर ‘ऑफ करा’ वर टॅप करा.

प्लेबॅकच्या दरम्यान ऑडिओ पर्याय बदलणे

  1. प्लेबॅकच्या दरम्यान, प्लेबॅक कंट्रोल दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.

  2. ऑडिओ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’संवाद एन्हान्स करा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी एकावर टॅप करा :

    • अधिक वर्धित करा : मिक्समध्ये संवादाला खूप ठळक बनवते.

    • एन्हान्स करा : मिक्समध्ये संवादाला अधिक ठळक बनवते.

    • ऑफ करा : ’संवाद एन्हान्स करा’ बंद केले जाते.

शो, पात्र, कलाकार आणि संगीत ह्यांच्याविषयी माहिती प्राप्त करणे

प्लेबॅकच्या दरम्यान, तुम्ही बघत असलेल्या चित्रपटाची किंवा TV शोची अधिक माहिती मिळवू शकता किंवा थेट ‘बघणे चालू ठेवा’ मध्ये जाऊ शकता.

इनसाइटसह, तुम्ही Apple TV+ चित्रपट किंवा TV शो (Apple TV+ सदस्यता आवश्यक) बघत असताना सध्या स्क्रीनवर असलेल्या कलाकार, पात्र आणि संगीताविषयी रिअल टाइम माहिती मिळवू शकता. तुम्ही एखाद्या अभिनेत्याचे बॅकग्राउंड आणि फिल्मोग्राफी पृष्ठ बघण्यासाठी त्या अभिनेत्यावर टॅप करू शकता किंवा बॅकग्राउंडमध्ये प्ले होत असलेले गाणे त्वरित बघू शकता आणि ते Apple Music प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करू शकता (Apple Music ची सदस्यता आवश्यक आहे).

  1. प्लेबॅकच्या दरम्यान, प्लेबॅक कंट्रोल दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.

  2. खालीलपैकी कोणत्याही पर्यायावर टॅप करा :

    • माहिती : तुम्ही जे बघत आहात त्याबद्दल अधिक माहिती पहा.

    • इनसाइट : अधिक माहिती पाहण्यासाठी अभिनेता किंवा पात्रावर टॅप करा. संगीताची माहिती दिसल्यास, गाणे संगीत ॲप (Apple TV+ आणि Apple Music सदस्यता असणे आवश्यक) मध्ये प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी गाण्यावर टॅप करा.

    • बघणे चालू ठेवा : थेट ’बघणे चालू ठेवा’ वर जा, नंतर पुन्हा बघणे सुरू आयटमवर टॅप करा.

    • लाइव्ह स्पोर्ट : लाइव्ह आणि आगामी स्पोर्ट इव्हेंट बघा.

Apple TV+ (ज्यामध्ये फ्रायडे नाइट बेसबॉल, संडे नाइट सॉकर जे काही देश आणि प्रदेश किंवा दोन्हीमध्ये समाविष्ट आहेत) आणि MLS Season Pass (ज्यामध्ये संडे नाइट सॉकर समाविष्ट आहे) साठी सदस्यता आवश्यक आहेत. MLS Season Pass, संडे नाइट सॉकर आणि फ्रायडे नाइट बेसबॉलसाठी iOS 16.2 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे. सर्व फीचर्स आणि कॉण्टेण्ट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.