ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर स्क्रीन टाइमसह कॉल्स आणि संदेश ब्लॉक करणे

विशिष्ट संपर्कांकडून कॉल आणि संदेशांना अनुमती द्या किंवा ब्लॉक करणे

iCloud मधील विशिष्ट संपर्कांकडून येणारे इनकमिंग आणि आउटगोइंग फोन कॉल, FaceTime कॉल आणि संदेश ह्यासह नेहमीच किंवा ठरावीक कालावधीदरम्यान तुम्ही संभाषणाला अनुमती देऊ शकता किंवा ब्लॉक करू शकता.

  1. तुम्ही iCloud मध्ये आधीच ‘संपर्क’ चालू केलेले नसल्यास, सेटिंग  > [तुमचे नाव] > 'iCloud' वर जा, 'iCloud मध्ये जतन केलेले' च्या पुढे ‘सर्व पहा’ वर टॅप करा, नंतर ‘संपर्क’ चालू करा.

  2. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  3. ‘संभाषण मर्यादा’ वर टॅप करा, ‘स्क्रीन टाईमदरम्यान’ वर टॅप करा, त्यानंतर नेहमीच्या (डाउनटाइम सोडून) संभाषणासाठी पुढीलपैकी एक सिलेक्ट करा :

    • फक्त संपर्क : केवळ तुमच्या संपर्कांबरोबर संभाषण साधण्याची अनुमती देण्यासाठी.

    • कमीत कमी एका संपर्कासह असलेले संपर्क व गट : केवळ तुमच्या संपर्कातील लोकांबरोबर एकमेकांशी संभाषणाची अनुमती द्या आणि किमान एका व्यक्तीबरोबर गट संभाषणाची अनुमती देणे.

    • प्रत्येकजण : अज्ञात नंबरसह कोणाशीही संभाषणाची अनुमती देण्यासाठी.

  4. शीर्षस्थानी डाव्या बाजूला ‘मागे’ वर टॅप करा, त्यानंतर ’डाउनटाइमदरम्यान’ वर टॅप करा.

    तुम्ही पायरी 3 मध्ये सिलेक्ट केलेला पर्याय (‘स्क्रीन टाइमदरम्यान’ साठी) येथे आधीच सेट केलेला आहे. तुम्ही हे सेटिंग ‘विशिष्ट संपर्क’ मध्ये बदलू शकता, नंतर पुढीलपैकी एक निवडा :

    • ‘माझे संपर्क’ मधून निवडा : ‘डाउनटाइम’ दरम्यान तुमच्या सध्याच्या संपर्कांबरोबर संवाद साधण्याची अनुमती देण्यासाठी.

    • नवीन संपर्क समाविष्ट करा : संपर्क समाविष्ट करण्यासाठी आणि डाउनटाइमदरम्यान त्यांच्याशी संभाषणाची अनुमती देण्यासाठी.

तुमच्या संभाषण मर्यादा सेटिंगकडून सध्या ब्लॉक केलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कॉल करण्याचा किंवा तुम्हाला संदेश पाठवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांचे संभाषण यशस्वी होणार नाही.

तुम्ही तुमच्या ‘संभाषण मर्यादा सेटिंग’ कडून सध्या ब्लॉक केलेल्या एखाद्या व्यक्तीला कॉल करण्याचा किंवा संदेश पाठवण्याचा प्रयत्न केल्यास, तुमच्या अलीकडील कॉल किंवा संदेश यादीमध्ये त्यांचे नाव किंवा नंबर लाल रंगात दिसतो आणि तुमचे त्यांच्याशी संभषण होऊ शकत नाही. संभाषण मर्यादा बदलल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संभाषण साधू शकता. जर मर्यादा फक्त डाउनटाइमवर लागू असेल, तर तुम्हाला वेळमर्यादेचा संदेश मिळतो. डाउनटाइम संपल्यावर तुम्ही संपर्काशी संभाषण पुन्हा सुरू करू शकता.

तुमच्या संभाषण मर्यादा सेटिंगद्वारे ब्लॉक केल्या गेलेल्या संपर्कांबरोबर पुन्हा संभाषण सुरू करण्यासाठी, वरील पायऱ्या फॉलो करून सेटिंग बदला.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.