ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPhone विषयी माहिती मिळवणे

एकूण स्टोरेज उपलब्धता आणि प्रत्येक ॲपसाठी वापरलेले स्टोरेज बघणे

सेटिंग  > सामान्य > ’iPhone स्टोरेज’ वर जा.

Apple Support लेख तुमच्या iPhone आणि iPad वरील स्टोरेज कसे तपासायचे आणि तुमचे iCloud स्टोरेज मॅनेज करा पहा.

बॅटरी वापर पहाणे

iPhone चार्ज झाल्यापासूनची वेळ आणि ॲपद्वारे बॅटरीचा झालेला वापर पाहण्यासाठी, सेटिंग  ‘बॅटरी’ वर जा.

तुम्ही बॅटरीची पातळी टक्केवारीनुसार डिस्प्ले करू शकता, ‘लो पॉवर मोड’ चालू किंवा बंद करू शकता आणि तुमच्या बॅटरीचे आरोग्य तपासू शकता.

iPhone बॅटरी पातळीचे निरीक्षण पहा.

कॉलची वेळ आणि मोबाइलचा वापर बघणे

सेटिंग  > ‘मोबाइल सेवा’ वर जा. iPhone वर मोबाइल डेटा सेटिंग बघणे किंवा बदलणे पहा.

तुमचा IMEI शोधणे

तुम्ही तुमच्या iPhone साठी सेटिंगमध्ये IMEI (आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख) बघू शकता.

  1. सेटिंग  > सामान्य > ‘विषयी माहिती’ वर जा.

  2. तुमचा IMEI शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा.

नाव, मॉडेल, iOS व्हर्जन, सिरिअल नंबर आणि बरेच काही पहाणे

सेटिंग  > सामान्य > ‘विषयी माहिती’ वर जा. तुम्ही बघू शकता अशा आयटममध्ये हे समाविष्ट आहे :

  • नाव

  • iOS सॉफ्टवेअर व्हर्जन

  • मॉडेलचे नाव

  • पार्ट आणि मॉडेल नंबर. मॉडेलच्या उजवीकडे, पार्ट नंबर दिसेल. मॉडेल नंबर बघण्यासाठी, पार्ट नंबरवर टॅप करा.

  • सिरियल नंबर

  • गाणी, व्हिडिओ, छायाचित्रे आणि ॲपची संख्या

  • क्षमता आणि उपलब्ध स्टोरेज स्पेस

  • Wi-Fi आणि Bluetooth® ॲड्रेस

  • मोबाइल नेटवर्क

  • नेटवर्क प्रोव्हायडर सेटिंग. नेटवर्क प्रोव्हायडरच्या उजवीकडे, नेटवर्क प्रोव्हायडर सेटिंग व्हर्जन नंबर दिसेल. अतिरिक्त नेटवर्क प्रोव्हायडर-विशिष्ट माहिती पाहण्यासाठी, ‘व्हर्जन नंबर’ वर टॅप करा. अधिक तपशिलासाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

  • GSM नेटवर्कसाठी ICCID (इंटिग्रेटेड सर्किट कार्ड आयडेंटिफायर किंवा स्मार्ट कार्ड)

  • CDMA नेटवर्कसाठी MEID (मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिफायर)

  • मोडेम फर्मवेअर

सीरिअल नंबर आणि इतर आयडेंटिफायर कॉपी करण्यासाठी, ‘कॉपी करा’ दिसेपर्यंत आयडेंटिफायरवर टच आणि होल्ड करा.

कायदेशीर व नियामक माहिती (कायदेशीर सूचना व परवाना, वॉरंटी आणि RF एक्स्पोझर माहितीसह) आणि नियामक चिन्हे पाहण्यासाठी, सेटिंग > सामान्य > ‘कायदेशीर व नियामक’ वर जा.

सपोर्ट केलेल्या मॉडेल वर, तुम्हाला ‘SIM कार्ड ट्रे’ वर IMEI आणि SIM ट्रे उघडण्याच्या स्लॉटमध्ये मॉडेल नंबर देखील आढळू शकतो.

डायग्नॉस्टिक माहिती बघणे किंवा बंद करणे

सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘विश्लेषिकी आणि सुधारणा’ वर जा.

Apple ची उत्पादने आणि सेवा सुधारण्यात मदत करण्यासाठी, iPhone डायग्नोस्टिक आणि वापराची माहिती पाठवते. हा डेटा तुमची वैयक्तिक ओळख पटवत नाही, परंतु त्यात स्थान माहिती समाविष्ट असू शकते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.