ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘कौटुंबिक शेअरिंग’ सह आईवडिलांचे नियंत्रण सेट अप करणे

कौटुंबिक शेअरिंग सह, आयोजक किंवा आई-वडील/पालक म्हणून नियुक्त केलेले इतर प्रौढ, कौटुंबिक शेअरिंग गटातील मुलांसाठी किंवा इतर सदस्यांसाठी आईवडिलांचे नियंत्रण सेट अप करू शकतात. तुमची मुले त्यांचे Apple डिव्हाइस कसे वापरतात, हे मॅनेज करण्यासाठी तुम्ही ‘स्क्रीन टाइम’ वापरू शकता. तुम्ही ’खरेदीसाठी विचारा’ देखील चालू करू शकता, त्यामुळे मुलांना पात्र खरेदीसाठी आणि निःशुल्क डाउनलोडसाठी तुमची मान्यता मिळणे आवश्यक ठरते.

कौटुंबिक शेअरिंग सदस्यांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या.

सेटअपदरम्यान पालक नियंत्रणे कस्टमाइझ करणे

जेव्हा तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात मुलाला समाविष्ट करता किंवा मुलासाठी डिव्हाइस सेट अप करता, तेव्हा तुम्ही सुरुवातीपासूनच आईवडिलांचे नियंत्रण कस्टमाइझ करू शकता. तुम्ही ती सेटिंग कधीही बदलू शकता.

पुढीलपैकी कोणताही पर्याय समाविष्ट करण्यासाठी सेटअप दरम्यान ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा :

  • ॲप्स, पुस्तके, TV शो आणि चित्रपटांमधील कॉण्टेण्टसाठी वयासंबंधी निर्बंध

  • विशिष्ट ॲपसाठी डाउनटाइम आणि मर्यादा

  • तुमचे मूल कोणाशी संवाद साधू शकते, ह्यावरील निर्बंध

  • खरेदी किंवा निःशुल्क डाउनलोडसाठी मान्यता

तुमच्या मुलाच्या iPhone, iPad आणि iPod touch वर आईवडिलांचे नियंत्रण वापरणे हा Apple सपोर्ट लेख पहा.

संवेदनशील कॉण्टेंटविषयी चेतावणी प्राप्त करणे

तुम्ही किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी लैंगिकदृष्ट्या स्पष्ट दिसणारी छायाचित्रे किंवा व्हिडिओज प्राप्त केले आहेत किंवा पाठवले आहेत का, ते स्क्रीन टाइम तपासू शकते. iPhone वरील ‘स्क्रीन टाइम’ मध्ये संवेदनशील इमेजेस आणि व्हिडिओज तपासणे पहा.

तुम्ही संवेदनशील कॉण्टेण्ट ब्लॉकदेखील करू शकता आणि खरेदीवर निर्बंध सेट करू शकता. कॉण्टेण्ट ब्लॉक करणे आणि iTunes व App Store; खरेदी प्रतिबंधित करणे पहा.

लहान मुलासाठी स्क्रीन टाइम सेट अप करणे

स्क्रीन टाइम तुम्हाला डाउनटाइम, ॲपचा वापर, संपर्क, कॉण्टेण्ट मानांकने आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी सेटिंग व्यवस्थापित करण्याची अनुमती देतो. ‘स्क्रीन टाइम’ वापरण्यासाठी, तुमचे मूल योग्य डिव्हाइस वापरत असणे आवश्यक आहे. iCloud साठीच्या सिस्टीम आवश्यकता ह्या Apple सपोर्ट लेखातील स्क्रीन टाइम विभाग पहा.

  1. सेटिंग  > ‘कुटुंब’ वर जा.

  2. ज्या अपत्यासाठी तुम्हाला स्क्रीन टाइम सेट अप करायचा आहे त्याच्या नावावर टॅप करा, ‘स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, ’चालू ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वेब कॉण्टेण्टसाठी निर्बंध बदला : ’वेब कॉण्टेण्ट’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय सिलेक्ट करा.

    • ॲप्स वापरण्यासाठी मानांकन सेट करा : ॲप्सवर टॅप करा, त्यानंतर ॲप्स वापरण्याची अनुमती देण्यासाठी वयानुसार मानांकन निवडा (उदाहरणार्थ, ’4+, 9+ ला अनुमती देऊ नका’) किंवा वयाची पर्वा न करता ’ॲप ब्लॉक करण्याची अनुमती देऊ नका’ निवडा.

    • मीडिया कॉण्टेण्टला अनुमती द्या किंवा ब्लॉक करा : मीडिया कॉण्टेण्टच्या प्रकारावर टॅप करा, त्यानंतर त्यासाठी वयानुसार मानांकन निवडा.

  3. स्क्रीन टाइम पर्याय सेट अप करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करणे चालू ठेवा.

    स्क्रीन टाइमविषयीच्या माहितीसाठी, कुटुंबातील सदस्यासाठी स्क्रीन टाइम सेट अप करा पहा.

    भिन्न कॉण्टेण्ट आणि गोपनीयता निर्बंधांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या मुलाच्या iPhone, iPad आणि iPod touch वर आईवडिलांचे नियंत्रण वापरा हा Apple सपोर्ट लेख पहा.

जर तुमचे मूल अधिक स्क्रीन वेळेची विनंती करत असेल, तर तुम्ही सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ मध्ये जाऊन किंवा ‘संदेश’ मध्ये विनंतीला मान्यता देऊ शकता किंवा ती नाकारू शकता.

‘खरेदीसाठी विचारा’ चालू करणे

तुम्ही ‘खरेदीसाठी विचारा’ सेट अप करता, तेव्हा मुलाच्या खरेदीला कुटुंब आयोजक किंवा कौटुंबिक गटातील आई-वडील किंवा पालक यांनी मान्यता दिली पाहिजे.

  1. सेटिंग  > ‘कुटुंब’ वर जा.

  2. ज्या मुलासाठी तुम्हाला ‘खरेदीसाठी विचारा’ सेट अप करायचे आहे, त्या मुलाच्या नावावर टॅप करा.

  3. ’खरेदीसाठी विचारा’ वर टॅप करा, त्यानंतर ’खरेदीसाठी विचारा सुरू करा’ वर टॅप करा.

मुले ‘खरेदीसाठी विचारा’ सह काय खरेदी करतात, त्याला मान्यता देणे हा Apple सपोर्ट लेख पहा.

नोट : ‘खरेदीसाठी विचारा’ साठी वयोमर्यादा प्रदेशानुसार बदलते. युनायटेड स्टेट्समध्ये, कुटुंबातील 18 वर्षाखालील कोणत्याही सदस्यासाठी कुटुंब आयोजक हे ‘खरेदीसाठी विचारा’ चालू करू शकतात; 13 वर्षाखालील मुलांसाठी ते डीफॉल्टनुसार चालू आहे.

तुम्ही लहान मुलासाठी Apple Cash कुटुंब अकाउंटदेखील सेट करू शकता. कौटुंबिक शेअरिंगसह Apple Cash आणि Apple Card वापरा (फक्त यू.एस. मध्येच) पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.