ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘घड्याळ’ मध्ये टायमर सेट करणे

तुम्ही उल्लेखित वेळेपासून काउंट डाउन करण्यासाठी टायमर सेट करू शकता.

Siri : असे काहीतरी म्हणा : “Set the timer for 3 minutes” किंवा “Stop the timer.”  Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

टायमर सेट करण्यासाठी सेटिंग आणि अलीकडेच तयार केलेला टायमर सुरू करण्यासाठी बटण असलेली टायमर जोडण्यासाठीची स्क्रीन.

कस्टम टायमर सेट करणे

  1. तुमच्या iPhone वर घड्याळ ॲपवर जा.

  2. ‘टायमर’ वर टॅप करा, नंतर कालावधी सेट करा.

  3. पुढीलपैकी कोणताही पर्याय निवडा :

    • लेबल : टायमरला “एग टायमर” ह्यासारखे काहीतरी नाव द्या.

    • टायमर समाप्त झाल्यानंतर : टायमर संपल्यावर प्ले करण्यासाठी ध्वनी निवडा.

  4. ‘सुरू करा’ वर टॅप करा.

नोट : तुम्ही दुसरे ॲप उघडले किंवा iPhone स्लीप मोडवर गेल्यावरही हे टायमर चालू राहते.

जेव्हा तुम्ही कस्टम टायमर सेट करता, तेव्हा तो ‘अलीकडील’ च्या खाली दिसतो—त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तोच टायमर सुरू करू शकता.

ऑडिओ किंवा व्हिडिओ प्ले करणे थांबवण्यासाठी टायमर सेट करणे

जर तुम्हाला विशिष्ट वेळेनंतर ऑडिओ किंवा व्हिडिओ प्ले करणे थांबवायचे असेल, तर तुम्ही प्लेबॅक थांबवण्यासाठी टायमर सेट करू शकता—उदाहरणार्थ, जेव्हा रेडिओ ऐकताना तुम्हाला झोप लागते.

  1. तुमच्या iPhone वर घड्याळ ॲपवर जा.

  2. वरीलप्रमाणे कस्टम टायमर सेट करा.

  3. ‘टायमर संपल्यावर’ वर टॅप करा, त्यानंतर ध्वनींच्या यादीच्या तळाशी असलेल्या ’प्ले करणे थांबवा’ वर टॅप करा.

  4. ‘सुरू करा’ वर टॅप करा.

अनेक टायमर सेट करणे

तुम्ही कस्टम टायमर सुरू केल्यानंतर, एकाच वेळी वेगवेगळ्या कामांचा ट्रॅक ठेवण्यासाठी तुम्ही अधिक टायमर समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर घड्याळ ॲपवर जा.

  2. ‘टायमर’ वर टॅप करा, नंतर टायमर सुरू करा.

  3. शीर्षस्थानी उजव्या बाजूला ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी एक कृती करा :

    • कस्टम टायमर समाविष्ट करा : कालावधी सेट करा, लेबल किंवा ध्वनी समाविष्ट करा, नंतर शीर्षस्थानी उजव्या बाजूला ‘सुरू करा’ वर टॅप करा.

    • अलीकडील टायमर समाविष्ट करा : तुम्ही अलीकडे सेट केलेल्या टायमरच्या पुढील ‘सुरू करा’ बटण वर टॅप करा.

      लेबल आणि ध्वनी संपादित करण्यासाठी टायमरवर टॅप करा.

टायमर थांबवणे, पॉज करणे किंवा काढून टाकणे

जेव्हा टायमर संपतो, तेव्हा तुम्ही कोणतेही ॲप वापरत असलात तरीही तुमच्या स्क्रीनच्या शीर्षस्थानी तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होते. नोटिफिकेशन क्लिअर करण्यासाठी ‘रद्द करा’ बटण वर टॅप करा किंवा जर तुम्हाला टायमर पुन्हा रन करायचा असेल तर रीसेट बटण वर टॅप करा.

तुम्ही टायमर संपण्यापूर्वी तो बंददेखील करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर घड्याळ ॲपवर जा.

  2. ‘टायमर’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • टायमर पॉज करा : त्याच क्षणी टायमर थांबवण्यासाठी त्याच्या पुढे असलेल्या ‘पॉज करा’ बटण वर टॅप करा. मोजणी सुरू ठेवण्यासाठी ‘सुरू करा’ बटण वर टॅप करा.

    • टायमर काढून टाका : डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.

    • अनेक टायमर काढून टाका : ‘संपादित करा’ वर टॅप करा, ‘काढून टाका’ बटण वर टॅप करा.

तुमच्या लॉक स्क्रीनवरून, तुम्ही ‘टायमर’ वर डावीकडे स्वाइप करू शकता, त्यानंतर ‘क्लिअर करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.