ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या कुटुंबाबरोबर फीचर शेअर करणे

तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय खरेदी शेअर करण्यासाठी, संपर्कात राहण्यासाठी आणि तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष फीचर वापरू शकता. तुम्हाला मुले असल्यास, तुमची मुले त्यांचे Apple डिव्हाइसेस कसे वापरतात हे मॅनेज करण्यासाठी तुम्ही ‘आईवडिलांचे नियंत्रण’ देखील सेट अप करू शकता.

सेटिंगमधील कौटुंबिक शेअरिंग स्क्रीन. कुटुंबातील पाच सदस्य यादीमध्ये आहेत. त्यांच्या नावांच्या खाली कौटुंबिक शिफारशी, सदस्यता आणि खरेदी शेअरिंग पर्याय आहेत.

कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे

कौटुंबिक शेअरिंगद्वारे, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य योग्य खरेदी आणि सदस्यता, तुमचे स्थान आणि बरेच काही शेअर करू शकता. प्रत्येकजण स्वतःचे डिव्हाइस आणि Apple अकाउंट वापरतो, परंतु iCloud स्टोरेज, सदस्यता (Apple Music आणि Apple Arcade सारख्या सेवांसाठी) आणि इतर कॉण्टेंट शेअर केले जातात.

सुरुवात करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘कुटुंब’ वर जा.

’शोधाशोध’ स्क्रीन लोकांची यादी आणि नकाशावर त्यांचे स्थान दाखवत आहे.

‘शोधाशोध’ सह तुमचे स्थान शेअर करणे

जेव्हा तुम्ही कौटुंबिक शेअरिंग सेट अप करता, तेव्हा तुम्ही तुमचे स्थान तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करू शकता आणि त्यांना शोधाशोध ॲप वापरून हरवलेले डिव्हाइसेस शोधण्यात मदत करू शकता.

तुमचे स्थान कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘कुटुंब’ वर जा, नंतर ‘स्थान शेअरिंग’ वर टॅप करा. तुम्हाला तुमचे स्थान शेअर करायचे असेल अशा कुटुंबातील सदस्याच्या नावावर टॅप करा. तुम्ही तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटाच्या सदस्यांबरोबर तुमचे स्थान शेअर केल्यानंतर, ते हरवलेले डिव्हाइस शोधण्यात मदत करू शकतात.

आरोग्य ॲपमध्ये शेअरिंग स्क्रीन.

तुमचा आरोग्य डेटा शेअर करणे

तुम्ही कुटुंब सदस्यांबरोबर तुमची ॲक्टिव्हिटी, गतिशीलता आणि आरोग्य ट्रेण्ड ह्यासारखा—तुमचा आरोग्य डेटा शेअर करण्यासाठी आरोग्य ॲप वापरू शकता.

आरोग्य ॲपमध्ये , स्क्रीनच्या तळाशी ‘शेअरिंग’ वर टॅप करा, नंतर ’कोणाबरोबर शेअर करा’ वर टॅप करा. तुम्हाला काय शेअर करायचे आहे ते तुम्ही निवडू शकता, आणि तुम्ही ज्या लोकांबरोबर शेअर करत आहात त्यांना महत्त्वपूर्ण ट्रेण्ड्सविषयी सूचित केले जावे असे तुम्हाला वाटत असेल, जसे की ॲक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

छायाचित्र ॲपमध्ये छायाचित्र उघडलेले आहे. स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला, ‘शेअर केलेल्या लायब्ररी’ मध्ये छायाचित्र मूव्ह करण्याचा पर्याय आहे.

कुटुंब छायाचित्र लायब्ररी सुरू करणे

कुटुंबातील इतर जास्तीत जास्त पाच सदस्यांबरोबर छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्ही ‘iCloud शेअर केलेली छायाचित्र लायब्ररी’ वापरू शकता. प्रत्येकजण छायाचित्रे समाविष्ट करू शकतो, संपादित करू शकतो आणि त्यांना कॅप्शन देऊ शकतो आणि त्यांच्या आठवणी, वैशिष्ट्यीकृत छायाचित्रे आणि ‘छायाचित्र’ विजेटमध्ये शेअर केलेल्या छायाचित्रांचा आनंद घेऊ शकतो.

सुरुवात करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > iCloud > ‘छायाचित्र’ वर जा, ‘हा iPhone सिंक करा’ चालू करा, नंतर ‘शेअर केलेली लायब्ररी’ वर टॅप करा.

‘रिकव्हरी संपर्क समाविष्ट करा’ स्क्रीन रिकव्हरी संपर्क म्हणून सिलेक्ट करण्यासाठी सुचवलेले संपर्क दाखले जात आहेत आणि दुसऱ्या संपर्काची निवड करण्याचा पर्याय देत आहे.

फक्त काही बाबतीत

तुम्ही कधीही लॉक आउट झाल्यास तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस पुन्हा मिळवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्य आणि इतर विश्वासार्ह लोकांना अकाउंट रिकव्हरी संपर्क म्हणून समाविष्ट करू शकता. डिजिटल लेगसी प्रोग्राम तुम्हाला लोकांना लेगसी संपर्क म्हणून नियुक्त करण्याची अनुमती देतो, जेणेकरून तुमच्या मृत्यूच्या वेळी ते तुमचे अकाउंट आणि वैयक्तिक माहिती ॲक्सेस करू शकतील.

लोकांना समाविष्ट करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘साइन इन व सुरक्षा’ वर जा, नंतर ‘अकाउंट रिकव्हरी’ किंवा ‘लेगसी संपर्क’ वर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

सर्व देश किंवा प्रदेशात सर्व फीचर उपलब्ध नाहीत.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.