ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर मीडिया प्रकारानुसार छायाचित्रे आणि व्हिडिओज शोधणे

छायाचित्र ॲपमध्ये, तुम्ही मीडिया प्रकारानुसार व्यवस्थापित केलेल्या छायाचित्रांचे आणि व्हिडिओजचे संग्रह शोधू शकता. उदाहरणार्थ, तुमची सर्व पोट्रेट मोड छायाचित्रे किंवा टाइम लॅप्स व्हिडिओज एकाच ठिकाणी ब्राउझ करा.

मीडिया प्रकारानुसार छायाचित्रे आणि व्हिडिओज ब्राउझ करणे

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. खाली स्क्रोल करा, त्यानंतर ‘मीडिया प्रकार’ वर टॅप करा.

    छायाचित्र ॲपमध्ये, छायाचित्रांच्या संग्रहांची यादी दाखवणारा ‘मीडिया प्रकार’ संग्रह उघडलेला आहे.
  3. तुम्हाला बघायचे असलेल्या छायाचित्र किंवा व्हिडिओच्या प्रकारावर टॅप करा.

मीडिया प्रकार रीऑर्डर करणे

तुम्ही वारंवार ॲक्सेस करत असलेले मीडिया प्रकार शोधण्यात मदत करण्यासाठी तुम्ही मीडिया प्रकारांची यादी पुन्हा क्रमवार लावू शकता.

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. खाली स्क्रोल करा, ‘मीडिया प्रकार’ वर टॅप करा, त्यानंतर ’संपादित करा’ वर टॅप करा.

  3. तुम्हाला मूव्ह करायचे असलेल्या संग्रहावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.

    तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी,’ रीसेट करा’ वर टॅप करा.

  4. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.