ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर पॉडकास्ट ट्रान्सक्रिप्ट बघणे

पॉडकास्ट ॲपमध्ये तुम्ही एपिसोड ट्रान्सक्रिप्ट बघू आणि सर्च करू शकता.

पॉडकास्ट ॲपमध्ये वाक्य हायलाइट केलेले एपिसोड ट्रान्सक्रिप्ट. ट्रान्सक्रिप्टच्या खाली प्लेबॅक कंट्रोल आहेत.

एपिसोड ट्रान्सक्रिप्ट उपलब्ध असेल तेव्हा तुम्ही ते वाचू शकता.

  1. तुमच्या iPhone वर पॉडकास्ट ॲप वर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • एपिसोड प्ले करत असताना : ’ट्रान्सक्रिप्ट बघा’ बटण वर टॅप करा. (‘आता प्ले होत आहे’ उघडण्यासाठी तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी असलेल्या प्लेअरवर टॅप करावे लागेल.)

    • एपिसोडची माहिती बघताना : ‘ट्रान्सक्रिप्ट’ विभागामध्ये खाली स्क्रोल करा. तुम्ही अधिक बटण वर टॅप देखील करू शकता, त्यानंतर ’ट्रान्सक्रिप्ट बघा’ वर टॅप करा.

    • ‘आगामी’ विभागामधून : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर 'ट्रान्सक्रिप्ट बघा’ वर टॅप करा.

तुम्ही एखादा एपिसोड प्ले करत असताना त्यासोबत वाचू शकता. एपिसोडमध्ये त्या वेळेपर्यंत जाण्यासाठी शब्दावर टॅप करा. विशिष्ट शब्द किंवा वाक्यांश शोधण्यासाठी ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा.

नोट : ट्रान्सक्रिप्टची उपलब्धता भाषेनुसार आणि देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकते. Apple सपोर्ट लेख iPhone आणि iPad वर Apple Podcasts मधील शो फॉलो करा आणि प्ले करा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.