ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘संदेश’ मध्ये छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढणे आणि संपादित करणे

तुम्ही संदेश ॲपमध्ये थेट छायाचित्रे आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकता. तुम्ही छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवण्यापूर्वी इमेज संपादित करून, ती चिन्हांकित करून किंवा त्यामध्ये इफेक्ट समाविष्ट करुन देखील त्यात बदल करू शकता.

नोट : तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर अटॅचमेंटसाठी आकाराची मर्यादा सेट करू शकतो; iPhone आवश्यक असेल तेव्हा छायाचित्र आणि व्हिडिओ अटॅचमेंटला कॉम्प्रेस करू शकतो.

‘संदेश’ मध्ये छायाचित्र संपादन.

नवीन छायाचित्र किंवा व्हिडिओ काढणे आणि संपादित करणे

  1. तुमच्या iPhone वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषण उघडा किंवा नवीन संदेश सुरू करा, ॲप बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘कॅमेरा’ वर टॅप करा.

  3. कॅमेऱ्याचा मोड बदलण्यासाठी, ‘स्लो-मो’, व्हिडिओ, छायाचित्र, पोर्ट्रेट किंवा ‘पॅनो’ वर टॅप करा. (तुम्हाला डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करावे लागू शकते.)

  4. तुमच्या छायाचित्र किंवा व्हिडिओमध्ये कॅमेरा इफेक्ट—जसे की फिल्टर, स्टिकर, लेबल आणि आकार समाविष्ट करण्यासाठी— इफेक्ट बटण वर टॅप करा, नंतर फिल्टर बटण किंवा Memoji बटण सारख्या बटणावर टॅप करा. पर्याय निवडा, त्यानंतर तुमच्या इमेजमध्ये इफेक्ट समाविष्ट करण्यासाठी ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

  5. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • छायाचित्र घ्या : व्ह्यूफाइंडरमध्ये शॉट फ्रेम करा, नंतर ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

    • व्हिडिओ काढा : रेकॉर्ड करणे सुरू करण्यासाठी ‘व्हिडिओ रेकॉर्ड करा’ बटण वर आणि थांबवण्यासाठी ‘व्हिडिओ रेकॉर्ड करणे थांबवा’ बटण वर टॅप करा.

  6. संदेश बबलमध्ये छायाचित्र किंवा व्हिडिओ समाविष्ट करण्यासाठी ‘झाले’ वर टॅप करा, टिप्पणी समाविष्ट करा, त्यानंतर तुमचा संदेश पाठवण्यासाठी पाठवा बटण वर टॅप करा. (किंवा संदेश समाविष्ट केल्याशिवाय छायाचित्र किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी केवळ पाठवा बटण वर टॅप करा.)

    नोट : ड्युअल SIM सह असलेल्या मॉडेलवर SMS, MMS किंवा RCS अटॅचमेंट पाठवण्यासाठी, तुम्हाला ड्युअल SIM सेट अप करणे आवश्यक आहे.

तुम्ही Digital Touch इफेक्ट वापरून छायाचित्र किंवा व्हिडिओ देखील पाठवू शकता किंवा FaceTime ॲपमध्ये व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करू शकता.

नोट : तुम्ही तुमच्या (किंवा कुटुंबातील सदस्याच्या) iPhone वर संवेदनशील कॉण्टेंटबद्दल चेतावण्या प्राप्त करू शकता त्यामुळे असा कॉण्टेंट पाठवण्यापूर्वी किंवा प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला सतर्क केले जाऊ शकते. संवेदनशील कॉण्टेण्टबद्दल चेतावण्या प्राप्त करा किंवा संवेदनशील इमेजेस तपासा पहा.

सध्याचे छायाचित्र समाविष्ट आणि संपादित करणे

तुम्ही तुमच्या छायाचित्राच्या लायब्ररीमधून ‘संदेश’ संभाषणात पाठवण्यापूर्वी अस्तित्वात असलेली इमेज तुम्ही संपादित किंवा चिन्हांकित करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषण उघडा किंवा नवीन संदेश सुरू करा, ॲप बटण वर टॅप करा, नंतर ‘छायाचित्र’ वर टॅप करा.

  3. सर्च करण्यासाठी वर स्वाइप करा, सर्व छायाचित्रे ब्राउझ करा किंवा अल्बम बदला, त्यानंतर तुम्हाला पाठवायच्या असलेल्या ‘इमेज’ वर टॅप करा.

  4. छायाचित्र बदलण्यासाठी, संदेश बबलमधील छायाचित्रावर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  5. टिप्पणी समाविष्ट करा (ऐच्छिक), नंतर छायाचित्र पाठवण्यासाठी पाठवा बटण वर टॅप करा.

संदेश बबल पाठवण्यापूर्वी त्यामधून एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी, ‘छायाचित्र काढून टाका’ बटण वर टॅप करा.

नोट : तुम्ही ’iMessage’ (जसे की छायाचित्रे किंवा व्हिडिओ) वर पाठवलेल्या अटॅचमेंट Apple वर अपलोड केल्या जाऊ शकतात आणि एन्क्रिप्ट केल्या जाऊ शकतात जेणेकरून प्रेषक आणि प्राप्तकर्त्याशिवाय कोणीही त्यांना ॲक्सेस करू शकणार नाही. कामगिरी सुधारण्यासाठी, तुमचा iPhone तुम्ही संदेश लिहित असताना Apple वर ऑटोमॅटिकली अटॅचमेंट अपलोड करू शकतो. जर तुम्ही तुमचा संदेश न पाठवण्याचा निर्णय घेतला, तर अनेक दिवसांनंतर अटॅचमेंट सर्व्हरवरून हटवल्या जातात.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.