ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

Phone वर बोललेल्या ऑडिओचे लाइव्ह कॅप्शन मिळवणे

iPhone वर ‘लाइव्ह कॅप्शन’ सह, तुम्ही बोललेल्या ऑडिओचे रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शन प्राप्त करू शकता. FaceTime किंवा पॉडकास्ट ह्यासारखे, तसेच तुमच्या भोवतालची लाइव्ह संभाषणे कोणत्याही ॲपमध्ये ऑडिओला अधिक सहजपणे फॉलो करण्यासाठी ‘लाइव्ह कॅप्शन’ वापरा.

नोट : iPhone 11 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर प्राथमिक भाषा ही इंग्रजी (यू.एस.) किंवा इंग्रजी (कॅनडा) वर सेट केलेली असेल, तर ‘लाइव्ह कॅप्शन’ उपलब्ध आहेत. लाइव्ह कॅप्शनची अचूकता बदलू शकते आणि जास्त जोखीम किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्यावर अवलंबून राहू नये.

लाइव्ह कॅप्शन सेट अप आणि कस्टमाइझ करणे

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘लाइव्ह कॅप्शन’ वर जा, नंतर ‘लाइव्ह कॅप्शन’ चालू करा.

  2. कॅप्शनचे टेक्स्ट, आकार आणि रंग कस्टमाइझ करण्यासाठी ‘दिखावट’ वर टॅप करा.

  3. डिफॉल्टनुसार, लाइव्ह कॅप्शन सर्व ॲप्सवर दाखवले जातात. केवळ FaceTime किंवा RTT सारख्या विशिष्ट ॲपसाठी लाइव्ह कॅप्शन मिळविण्यासाठी, त्या इन एप लाइव्ह कॅप्शनच्या खाली चालू करा.

लाइव्ह कॅप्शन वापरणे

‘लाइव्ह कॅप्शन’ चालू केलेले असताना, iPhone ॲप्समध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या संवादातून बोलल्या जाणाऱ्या ऑडिओचे ऑटोमॅटिक ट्रान्सक्रिप्शन करतो. तुम्ही पुढीलपैकी काहीही करू शकता :

  • वैयक्तिक संभाषण ट्रान्सक्राइब करा : ‘लाइव्ह कॅप्शन’ वर टॅप करा, नंतर ‘मायक्रोफोन’ वर टॅप करा.

  • iPhone ऑडिओ ट्रान्सक्राइब करा : ‘लाइव्ह कॅप्शन’ वर टॅप करा, नंतर ‘iPhone ऑडिओ’ वर टॅप करा.

  • ट्रान्सक्रिप्शन पॉज करा : ‘लाइव्ह कॅप्शन’ वर टॅप करा, नंतर ’ऐकणे पॉज करा’ वर टॅप करा.

  • लाइव्ह कॅप्शन विंडो मूव्ह करा : लाइव्ह कॅप्शन विंडो ड्रॅग करून तिला स्क्रीनवर पुन्हा स्थापित करा.

  • लाइव्ह कॅप्शन विंडो लपवा : जेव्हा कोणताही ऑडिओ ओळखला जात नाही, तेव्हा लाइव्ह कॅप्शन विंडो ऑटोमॅटिकली लपवली जाते. विंडो दिसत असल्यास, ती लपवण्यासाठी विंडोवर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा. विंडो रीस्टोअर करण्यासाठी, ‘लाइव्ह कॅप्शन संक्षिप्त करा’ बटण वर टॅप करा.

  • ट्रान्सक्रिप्शन विंडो फुल स्क्रीन करा : ‘मॅक्झिमाइझ करा’ बटण वर टॅप करा. छोट्या आकारात विंडो रीस्टोअर करण्यासाठी, ‘मिनिमाइझ करा’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.