ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर टेक्स्ट, व्हॉइस आणि संभाषणे भाषांतरित करणे

तुम्ही टेक्स्ट, व्हॉइस आणि संभाषणे कोणत्याही सपोर्ट करणाऱ्या भाषेत भाषांतरित करू शकता. इंटरनेट कनेक्शनशिवायही तुम्ही पूर्णतः डिव्हाइसवर भाषांतर करण्यासाठी भाषादेखील डाउनलोड करू शकता.

इंग्रजीतून स्पॅनिशमध्ये आणि इंग्रजीतून मॅण्डॅरिनमध्ये भाषांतरित केलेले वाक्यांश दाखवणारा ‘भाषांतर’ टॅब.

नोट : सपोर्ट असलेल्या भाषांसाठी भाषांतर उपलब्ध आहे. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

टेक्स्ट किंवा तुमचा व्हॉइस भाषांतरित करा

  1. तुमच्या iPhone वर भाषांतर ॲप वर जा.

  2. तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचे तुम्हाला ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे, त्या भाषेवर टॅप करा.

    भाषा स्वॅप करण्यासाठी, ‘भाषा स्वॅप करणे’ बटण वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी एकावर टॅप करा :

    • टेक्स्टचे भाषांतर करा : “टेक्स्ट प्रविष्ट करा” वर टॅप करा, वाक्यांश टाइप करा (किंवा टेक्स्ट पेस्ट करा), नंतर कीबोर्डवरील ‘पुढील’ वर टॅप करा.

      तुम्ही स्क्रीनच्या शीर्षस्थानी डाव्या कोपऱ्यात असलेल्या ’पूर्ण’ वरही टॅप करू शकता.

    • तुमच्या व्हॉइसचे भाषांतर करा : ‘ऐका’ बटण वर टॅप करा, त्यानंतर वाक्यांश सांगा.

    नोट : तुम्ही जेव्हा टाइप करता किंवा बोलता, तेव्हा शब्दांचे भाषांतर केले जाते.

  4. जेव्हा भाषांतर दाखवले जाते, तेव्हा पुढीलपैकी कोणतीही कृती करा :

    • ऑडिओचे भाषांतर प्ले करा : ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

      टिप : प्लेबॅक गती ॲडजस्ट करण्यासाठी ‘प्ले करा’ बटण ला टच आणि होल्ड करा.

    • इतर कोणाला तरी भाषांतर दाखवा : ‘फुल स्क्रीनमध्ये प्रवेश करा’ बटण वर टॅप करा.

    • भाषांतर ’आवडते’ म्हणून जतन करा : ‘आवडते’ बटण वर टॅप करा.

    • शब्दकोशातील शब्द शोधा : शब्दकोश बटण वर टॅप करा.

    • भाषांतर कॉपी करा : ‘कॉपी करा’ बटण वर टॅप करा.

टिप : तुमची अलीकडील हिस्ट्री पाहण्यासाठी, भाषांतर खालच्या बाजूला स्वाइप करा.

भाषांतर हटवण्यासाठी, डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘हटवा’ बटण वर टॅप करा.

तुमचे आवडते भाषांतर पहा

इंग्रजीमधून कोरियनमध्ये आणि इंग्रजीमधून स्पॅनिशमध्ये भाषांतरित आणि जतन केलेले वाक्यांश दाखवणारा ‘आवडते’ टॅब.
  1. तुमच्या iPhone वर भाषांतर ॲप वर जा.

  2. ‘आवडते’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्ही ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित केलेली भाषांतरे, तसेच तुम्ही अलीकडे भाषांतरित केलेले शब्द आणि वाक्यांश बघण्यासाठी स्क्रोल करा.

    तुमच्या ‘आवडते’ मधून भाषांतर काढून टाकण्यासाठी, डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘आवडते’ मधून काढून टाका’ बटण वर टॅप करा.

नोट : तुम्ही तुमच्या Apple अकाउंटने साइन इन केले आहे अशा तुमच्य iPhone, iPad किंवा Apple Watch वर तुम्ही तुमची आवडती भाषांतरे भाषांतर ॲपमध्ये पाहू शकता.

संभाषणाचे भाषांतर करणे

संभाषणाच्या दोन्ही बाजूंना iPhone वर भाषांतरित टेक्स्ट बबलच्या स्वरूपात दिसते. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल किंवा जेव्हा ’ऑन डिव्हाइस मोड’ चालू असेल, तेव्हा डाउनलोड केलेल्या भाषांसाठी ‘संभाषण’ काम करते.

बबल स्वरूपातील चॅट आणि त्यांचे भाषांतर दाखवणारा ‘संभाषण’ टॅब.
  1. तुमच्या iPhone वर भाषांतर ॲप वर जा.

  2. ‘संभाषण’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी एकावर टॅप करा :

    • टेक्स्ट टाइप करा : “टेक्स्ट प्रविष्ट करा” वर टॅप करा, वाक्यांश टाइप करा (किंवा टेक्स्ट पेस्ट करा), नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • तुमचा व्हॉइस वापरा : ‘ऐका’ बटण वर टॅप करा, त्यानंतर वाक्यांश सांगा.

    नोट : तुम्ही जेव्हा टाइप करता किंवा बोलता, तेव्हा शब्दांचे भाषांतर केले जाते.

  4. ऑडिओ भाषांतर ऐकण्यासाठी ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

    ऑडिओ भाषांतर ऑटोमॅटिकली ऐकण्यासाठी, ‘अधिक पर्याय’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘भाषांतर प्ले करा’ वर टॅप करा.

टिप : प्रत्येक व्यक्ती बोलण्यापूर्वी तुम्ही ‘मायक्रोफोन’ बटणावर टॅप न करता संभाषणाचे भाषांतर करू शकता. संभाषण सुरू करण्यासाठी ‘अधिक पर्याय’ बटण वर टॅप करा, ‘ऑटो भाषांतरित करा’ वर टॅप करा, नंतर ‘ऐका’ बटण वर टॅप करा. तुम्ही बोलणे केव्हा सुरू करता आणि केव्हा थांबवता, हे iPhone ऑटोमॅटिकली ओळखतो.

समोरासमोर चॅट करताना, शीर्षस्थानी डावीकडे असलेल्या ‘दृश्य’ वर टॅप करा, नंतर ‘फेस टू फेस’ वर टॅप करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्यांचे स्वतःचे संभाषण पाहता येईल.

अनेक अर्थ असलेल्या शब्दांचे रिव्ह्यू करणे

अनेक अर्थ असलेल्या शब्दाचे भाषांतर करताना, तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या शब्दाची निवड करू शकता. व्याकरणिकदृष्ट्या लिंगभेद असलेल्या शब्दांसाठी तुम्ही स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी भाषांतरही सिलेक्ट करू शकता.

नोट : जेव्हा शब्दाचे लिंग उल्लेखित केलेले नसते, तेव्हा भाषांतरे ऑटोमॅटिकली शब्दाच्या सर्व लिंग तटस्थ स्वरूपात डिफॉल्ट होतात.

इंग्रजीमधून स्पॅनिशमध्ये भाषांतरित केलेले वाक्यांश आणि खाली लिस्ट केलेल्या विविध लिंगभेदांसह करड्या रंगात हायलाइट केलेला शब्द दाखवणारा ‘भाषांतर’ टॅब.
  1. तुमच्या iPhone वर भाषांतर ॲप वर जा.

  2. शब्द किंवा वाक्यांशाचे भाषांतर करा, नंतर कीबोर्डवर ’पुढील’ वर टॅप करा.

  3. उपलब्ध असल्यास, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • वेगळा अर्थ निवडा : उपलब्ध असल्यास, तुम्हाला हवा असलेला अर्थ निवडण्यासाठी फिकट रंगाने हायलाइट केलेल्या शब्दावर टॅप करा.

    • व्याकरणात्मक लिंग भाषांतर निवडा : उपलब्ध असल्यास, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी भाषांतर सिलेक्ट करण्यासाठी फिकट रंगाने हायलाइट केलेल्या शब्दावर टॅप करा.

व्याकरणात्मक लिंग भाषांतर बंद करण्यासाठी, ‘अधिक पर्याय’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘व्याकरणात्मक लिंग दाखवा’ वर टॅप करा.

ऑफलाइन भाषांतर किंवा ‘ऑन डिव्हाइस मोड’ साठी भाषा डाउनलोड करणे

तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसताना किंवा ’ऑन-डिव्हाइस मोड’ चालू असताना भाषांतर करण्यासाठी भाषा डाउनलोड करा.

  1. सेटिंग  > ॲप > ‘भाषांतर करा’ वर जा.

  2. पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • ‘डाउनलोड केलेल्या भाषा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायच्या असलेल्या भाषांपुढील ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा.

    • ’ऑन डिव्हाइस मोड’ चालू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.