ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone लॉक स्क्रीनवरून फीचर ॲक्सेस करणे

तुम्ही iPhone चालू किंवा सक्रिय करता तेव्हा लॉक स्क्रीन दिसते. लॉक स्क्रीनवरून तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता, कॅमेरा आणि कंट्रोल सेंटर उघडू शकता, तुमच्या आवडत्या ॲपमधून एका दृष्टिक्षेपात माहिती मिळवू शकता, मीडिया प्लेबॅक नियंत्रित करू शकता आणि ह्यासारखे बरेच काही करू शकता.

तुम्ही वॉलपेपर निवडून, आवडते छायाचित्र दाखवून, वेळेचा फॉण्ट बदलून, विजेट समाविष्ट करुन आणि ह्यासारखे बरेच काही करून तुमची लॉक स्क्रीन वैयक्तिकृत करू शकता. कस्टम iPhone लॉक स्क्रीन तयार करणे पहा.

iPhone लॉक स्क्रीन शीर्षस्थानाजवळ वेळ व दिनांक आणि खाली फ्लॅशलाइट व कॅमेरा आयकॉन दाखवते.

लॉक स्क्रीनवरून फीचर आणि माहिती ॲक्सेस करणे

iPhone लॉक असतानाही, तुम्ही लॉक स्क्रीनवरून उपयुक्त फीचर आणि माहिती त्वरित ॲक्सेस करू शकता.

लॉक स्क्रीनवर जा, नंतर खालीलपैकी कोणतेही काम करा :

लॉक स्क्रीनवरून तुम्ही जे ॲक्सेस करू शकता ते निवडण्यासाठी, iPhone वर लॉक स्क्रीन फीचर चालू करणे पहा.

लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन प्रिव्ह्यू दाखवणे

  1. सेटिंग  > ‘नोटिफिकेशन’ वर जा.

  2. ‘प्रिव्ह्यू दाखवा’ वर टॅप करा, नंतर ‘नेहमी’ वर टॅप करा.

  3. लॉक स्क्रीनवर तुम्हाला नोटिफिकेशन कशाप्रकारे डिस्प्ले करायचे आहे ते निवडा :

    • फक्त नोटिफिकेशनची संख्या बघा : ‘गणना’ वर टॅप करा.

    • ॲपनुसार रांगेत गटबद्ध केलेले नोटिफिकेशन बघा : ‘स्टॅक’ वर टॅप करा.

    • यादीमध्ये नोटिफिकेशन बघा : ‘यादी’ वर टॅप करा.

    लेआउट बदलण्यासाठी तुम्ही लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन पिंच करू शकता.

‘नोटिफिकेशन प्रिव्ह्यू’ मध्ये ‘संदेश’ मधील टेक्स्ट, Mail संदेशांमधील ओळी आणि दिनदर्शिका आमंत्रणांचे तपशील समाविष्ट केले जाऊ शकतात. iPhone वर नोटिफिकेशन बघणे आणि त्यांना प्रतिसाद देणे पहा.

लॉक स्क्रीनवर लाइव्ह ॲक्टिव्हिटी बघणे आणि नियंत्रित करणे

तुम्ही तुमच्या लॉक स्क्रीनवर लाइव्ह ॲक्टिव्हिटी बघू शकता—ज्यात लाइव्ह स्पोर्ट अपडेट, ऑर्डर अपडेट आणि मीडिया प्लेइंगचा समावेश असतो—जेणेकरून तुम्ही संपूर्ण इव्हेंट पाहू शकत नसलात तरीही तुम्ही तुमच्या लॉक स्क्रीनवर थेट फॉलो करू शकता.

जेव्हा तुम्ही तुमच्या iPhone वर संगीत, चित्रपट किंवा इतर मीडिया प्ले करता, तेव्हा तुम्ही तुमच्या लॉक स्क्रीनवरील प्लेबॅक कंट्रोलचा वापर (आत्ता प्ले होत असलेले) प्ले करणे, पॉज करणे, रिवाइंड करणे आणि फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी करू शकता.

तुम्ही तुमच्या iPhone लॉक स्क्रीनमधून रिमोट डिव्हाइसवर (जसे की, तुमचा Apple TV किंवा HomePod) मीडिया प्लेबॅक देखील नियंत्रित करू शकता.

लॉक स्क्रीनमध्ये अल्बम कव्हर दाखवले जाते आणि त्याखाली रिमोट डिव्हाइसवर संगीत प्ले करण्यासाठी कंट्रोल केले जाते.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.