ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iCloud सह तुमची छायाचित्रे बॅकअप आणि सिंक करणे

तुम्ही तुमची छायाचित्रे आणि व्हिडिओ iCloud मध्ये सुरक्षितपणे संग्रहित करून ठेवण्यासाठी iCloud छायाचित्रे चा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर iCloud छायाचित्रे चालू केल्यास, तुम्ही iPhone वर काढलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकता. तुम्ही वेब ब्राउझरमध्ये तुमची iCloud छायाचित्रे आणि व्हिडिओदेखील ॲक्सेस करू शकता.

iCloud छायाचित्रे चालू केल्यावर, तुम्ही घेतलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ ऑटोमॅटिकली अपलोड केले जातात आणि पूर्ण रेझोल्यूशनवर त्यांच्या मूळ फॉरमॅटमध्ये संग्रहित केले जातात. एका डिव्हाइसवरील तुमच्या छायाचित्र संग्रहामध्ये तुम्ही केलेले कोणतेही बदल तुमच्या इतर डिव्हाइसवर देखील प्रतिबिंबित केले जातात.

नोट : तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर एकाच Apple अकाउंट मध्ये साइन इन केलेले असल्याची आणि तुमचे डिव्हाइस ह्या किमान सिस्टीम आवश्यकतांची पूर्तता करत असल्याची खात्री करा : iOS 8.3, iPadOS 13.1, macOS 10.10.3 किंवा त्यानंतरचे व्हर्जन किंवा Windows 7.x किंवा त्यानंतरच्या व्हर्जनसाठीचे iCloud असलेले Windows डिव्हाइस.

अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या सर्व डिव्हाइसवर iCloud छायाचित्रे सेट अप करा पहा.

iCloud छायाचित्रे चालू करणे

  1. सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud वर जा.

  2. ‘छायाचित्र’ वर टॅप करा, त्यानंतर ‘हा iPhone सिंक करा’ चालू करा.

iCloud तुम्ही काढलेले प्रत्येक छायाचित्र आणि व्हिडिओ ऑटोमॅटिकली iCloud वर अपलोड करते, जेणेकरून तुमच्या छायाचित्रांचा बॅक अप घेतला जातो आणि ते सिंक केले जातात आणि तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून कोणत्याही वेळी तुमची लायब्ररी ॲक्सेस करू शकता.

iCloud मध्ये तुमच्या छायाचित्रांचा बॅकअप घेतला गेला आहे का ते तपासणे

‘iCloud छायाचित्रे’ तुमची छायाचित्रे iCloud मध्ये सिंक करत आहेत हे तुम्ही तपासू शकता, जेणेकरून तुमच्या iPhone ला काही झाल्यास तुमच्याकडे त्याच्या कॉपी असतील.

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात, तुम्ही तुमच्या सिंकिंग स्टेटसचे प्रीव्ह्यू पाहू शकता. तुम्हाला पुढीलपैकी काहीही दिसू शकते :

    • पिवळा बॅज : iCloud सिंकिंग पॉज केले गेले आहे. तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा.

    • पिवळा चेतावणी आयकॉन : तुमचे iCloud स्टोरेज जवळजवळ भरले आहे. तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा.

    • लाल उद्गारवाचक चिन्ह : तुमचे iCloud स्टोरेज पूर्ण भरलेले आहे. स्पेस जतन करा किंवा अधिक iCloud स्टोरेज मिळवणे पहा.

    • निळा बॅज : तुमच्याकडे शेअर केलेल्या लायब्ररी किंवा शेअर केलेल्या अल्बममधील नोटिफिकेशन आहेत. तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा.

    • तुमच्या अकाउंट आयकॉनच्या भोवती अंशत: भरलेले निळे वर्तुळ : iCloud वर छायाचित्रे सक्रियपणे अपलोड केली जात आहेत. तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा.

    • तुमच्या अकाउंट आयकॉनच्या भोवताली अंशत: भरलेली राखाडी आउटलाइन : अपलोड पॉज केले गेले आहेत. तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा.

  3. अधिक तपशील पाहण्यासाठी तुमच्या अकाउंटवर टॅप करा. मागील वेळी तुमचा iPhone हा iCloud सह कधी सिंक केला गेला हे अकाउंट प्रोफाइलच्या खाली दिसते.

तुमच्या iPhone वरील स्पेस जतन करणे

तुमच्या iPhone मधील स्टोरेज स्पेसचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी iCloud छायाचित्रे मदत करू शकते. जेव्हा ‘iPhone स्टोरेज ऑप्टिमाइझ करा’ चालू केलेले असते, तुमच्या iPhone वरील स्टोरेज जतन करणाऱ्या व्हर्जनसह तुमची सर्व फुल‑रेझोल्यूशन छायाचित्रे आणि व्हिडिओ iCloud मध्ये त्यांच्या मूळ फॉरमॅटमध्ये संग्रहित केले जातात. ‘iPhone स्टोरेज ऑप्टिमाइझ करा’ डिफॉल्टनुसार चालू केले गेले आहे.

हे बंद करण्यासाठी, सेटिंग  > [तुमचे नाव] > iCloud वर जा. ‘छायाचित्र’ वर टॅप करा, नंतर ‘डाउनलोड करा आणि मूळ प्रत ठेवा’ वर टॅप करा.

अधिक iCloud स्टोरेज मिळवणे

तुमची अपलोड केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ तुमच्या स्टोरेज प्लॅनपेक्षा जास्त असल्यास, अधिक स्टोरेज आणि अतिरिक्त फीचरसाठी तुम्ही iCloud+ वर अपग्रेड करू शकता. iCloud+ ची सदस्यता घ्या पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.