ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

HomePod आणि इतर वायरलेस स्पीकरवर iPhone वरून ऑडिओ प्ले करणे

HomePod, Apple TV, AirPlay 2-एनेबल केलेले स्मार्ट TV आणि Bluetooth® हेडफोन आणि स्पीकर ह्यासारख्या वायरलेस डिव्हाइसवर तुम्ही iPhone वरून ऑडिओ प्ले करू शकता.

वायरलेस डिव्हाइसवर iPhone वरून ऑडिओ प्ले करणे

  1. तुमच्या iPhone वर पॉडकास्ट किंवा संगीत ह्यासारखे ऑडिओ ॲप उघडा.

  2. प्ले करण्यासाठी आयटम निवडा.

  3. ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर टॅप करा, नंतर प्लेबॅक गंतव्यस्थान निवडा.

    स्क्रीनच्या खाली असलेल्या प्लेबॅक डेस्टिनेशन बटणासह, ‘संगीत’ साठी प्लेबॅक कंट्रोल.

    नोट : तुमचे AirPlay 2-एनेबल केलेले डिव्हाइस प्लेबॅक डेस्टिनेशनच्या यादीमध्ये दिसत नसल्यास, ते एकाच Wi-Fi नेटवर्कवर असल्याची खात्री करा. डिव्हाइस तुम्ही Bluetooth रेंजच्या बाहेर मूव्ह केल्यास, प्लेबॅक डेस्टिनेशन Bluetooth डिव्हाइससह iPhone वर परत येते.

प्लेबॅक डेस्टिनेशन सिलेक्ट करण्यासाठी, तुम्ही लॉक स्क्रीनवर किंवा कंट्रोल सेंटरमध्ये ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर देखील टॅप करू शकता.

नोट : Bluetooth ऑडिओ डिव्हाइस सेट अप करण्याबाबतच्या माहितीसाठी, Bluetooth ॲक्सेसरीबरोबर तुमचा iPhone पेअर करणे पहा.

अनेक AirPlay 2-एनेबल केलेल्या डिव्हाइसवर ऑडिओ प्ले करणे

AirPlay 2 आणि iPhone सह, तुम्ही एकाच Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट केलेल्या अनेक AirPlay 2-एनेबल केलेल्या डिव्हाइसवर ऑडिओ प्ले करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही बैठकीच्या खोलीत आणि स्वयंपाकघरात HomePod स्पीकरवर, बेडरूममध्ये Apple TV वर, आणि डेनमध्ये AirPlay 2 एनेबल केलेल्या स्मार्ट TV वर पार्टी प्लेलिस्ट प्ले करू शकता.

Siri : असे काहीतरी म्हणा :

  • “Stop playing music everywhere”

  • “Set the dining room volume to 10 percent”

  • “What’s playing in the kitchen?”

  • “Play a song I like in the kitchen”

  • “Add the living room speaker”

  • “Remove the music from the kitchen”

  • “डेनकडे संगीत मूव्ह करा”

तुम्ही iPhone स्क्रीनवरून प्लेबॅक डेस्टिनेशन देखील निवडू शकता.

  1. लॉक स्क्रीनवर किंवा तुम्ही ऐकत असलेल्या ॲपच्या ‘सध्या प्ले होत आहे’ स्क्रीनवर कंट्रोल सेंटरमध्ये ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर टॅप करा.

  2. तुम्हाला वापरायचे असलेले प्रत्येक डिव्हाइस सिलेक्ट करा.

नोट : स्टिरिओ पेअरमध्ये व्यवस्था केलेली डिव्हाइस सिंगल ऑडिओ डिव्हाइस मानली जातात.

iPhone वरून HomePod वर ऑडिओ हॅण्ड ऑफ करणे

संगीत, पॉडकास्ट किंवा इतर ऑडिओ ॲपवरून ऑडिओ प्ले करताना, iPhone ला HomePod च्या वरच्या बाजूस आणा.

ऑडिओ हॅण्डऑफमध्ये खालील आवश्यकता आहेत :

  • तुम्ही दोन्ही डिव्हाइसवर एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे.

  • तुमच्या iPhone वर, तुम्ही Wi-Fi आणि Handoff चालू केले आहे.

  • iPhone आणि HomePod एकाच HomeKit होममध्ये आणि त्याच Wi-Fi नेटवर्कवर असणे आवश्यक आहे.

  • तुमच्या डिव्हाइसेस सेटिंग मध्ये Bluetooth चालू केलेले असणे आवश्यक आहे आणि ते एकमेकांपासून (सुमारे 33 फूट किंवा 10 मीटर) Bluetooth अंतराच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.

iPhone आणि HomePod आणि इतर डिव्हाइसच्या दरम्यान Handoff डिसेबल करण्यासाठी, सेटिंग > सामान्य > ‘AirPlay व कंटिन्युटी’ वर जा.

नोट : HomePod स्पीकर आणि Apple TV वापरण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी HomePod यूझर गाइड आणि Apple TV यूझर गाइड पहा.

AirPlay 2-एनेबल केलेल्या स्मार्ट TV च्या यादीसाठी, होम ॲक्सेसरी संकेतस्थळ पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.