ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Face ID आणि ‘लक्ष देणे’ सेटिंग बदलणे

Face ID सह iPhone वर, तुम्हाला शारीरिक किंवा दृष्टीच्या मर्यादा असल्यास तुम्ही Face ID आणि ‘लक्ष देणे’ सेटिंग ॲडजस्ट करू शकता.

ॲक्सेसिबिलिटी पर्यायांसह Face ID सेट अप करणे

Face ID सेट अप करण्यासाठी सहसा तुमच्या डोक्याची हळूवारपणे वर्तुळाकार हालचाल करावी लागते जेणेकरून तुमचा चेहरा सर्व बाजूंनी दिसेल. तुम्ही हेड मोशनची संपूर्ण कक्षा करू शकत नसल्यास, तुम्ही तुमचे डोके न हलवता Face ID सेट अप करू शकता.

  1. सेटिंग  > ‘Face ID व पासकोड’ वर जा.

  2. ‘Face ID सेट अप करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’सुरुवात करा’ वर टॅप करा.

  3. तुमचा चेहरा फ्रेममध्ये बसवा, नंतर ‘ॲक्सेसिबिलिटी पर्याय’ वर टॅप करा.

Face ID अजूनही सुरक्षित आहे परंतु तुम्ही iPhone अनलॉक केल्यावर अधिक सुसंगतता आवश्यक आहे.

‘लक्ष देणे’ सेटिंग बदलणे

अतिरिक्त सुरक्षेसाठी, Face ID अटेंशन अवेअर आहे. तुमचे डोळे उघडे असताना आणि स्क्रीनवर बघत असताना iPhone अनलॉक होतो. iPhone नोटिफिकेशन आणि संदेश देखील दाखवू शकतो, तुम्ही वाचत असताना स्क्रीनवर प्रकाशित ठेवू शकतो किंवा अलर्ट्सचा व्हॉल्यूम कमी करू शकतो.

तुम्हाला तुमचे लक्ष iPhone द्वारे तपासायचे नसल्यास, पुढील गोष्टी करा :

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > 'Face ID व लक्ष' वर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक चालू किंवा बंद करा :

    • Face ID साठी लक्ष देणे आवश्यक आहे : केवळ जेव्हा तुम्ही iPhone कडे बघत असता तेव्हाच iPhone अनलॉक करून अतिरिक्त पातळीची सुरक्षा प्रदान करा.

    • अटेंशन अवेअर फीचर्स : iPhone डिस्प्ले डिम करणे, लॉक असल्यावर नोटिफिकेशन विस्तारीत करणे, किंवा काही अलर्ट्सचा आवाज कमी करण्याआधी लक्ष आहे का ते तपासतो.

    • यशस्वी ऑथेंटिकेशनवर हॅप्टिक : जेव्हा Face ID यशस्वीरित्या iPhone अनलॉक करते, Apple Pay ला अधिकृत करते, किंवा iTunes आणि App Store खरेदीची पडताळणी करते तेव्हा हॅप्टिक प्ले करा.

    तुम्ही प्रथम iPhone सेट अप केलेला असताना VoiceOver चालू केलेले असल्यास, ह्या सेटिंग डिफॉल्टनुसार बंद केल्या जातात.

नोट : आवश्यक लक्ष Face ID ला अधिक सुरक्षित बनवते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.