ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

Magic Keyboard आणि iPhone सह कीबोर्डमध्ये स्विच करणे

Magic Keyboard सह, तुम्ही तुमच्या प्रदेशासाठी भाषा कीबोर्ड, इमोजी कीबोर्ड, तुम्ही समाविष्ट केलेले इतर भाषा कीबोर्ड आणि ऑनस्क्रीन कीबोर्डमध्ये स्विच करू शकता.

भाषा कीबोर्ड आणि ऑनस्क्रीन इमोजी कीबोर्डमध्ये स्विच करणे

  1. Magic Keyboard वर, ‘कंट्रोल की’ दाबा आणि होल्ड करा.

  2. वेगळ्या भाषांमध्ये टाइप करण्यासाठी तुमच्या प्रदेशातील भाषा कीबोर्ड, इमोजी कीबोर्ड आणि तुम्ही समाविष्ट केलेले कोणतेही कीबोर्ड ह्यादरम्यान जाण्यासाठी स्पेस बार दाबा.

ऑनस्क्रीन कीबोर्ड दाखवणे किंवा लपवणे

ऑनस्क्रीन कीबोर्ड दाखवण्यासाठी, Magic Keyboard वर इजेक्ट की दाबा. ऑनस्क्रीन कीबोर्ड लपवण्यासाठी, इजेक्ट की पुन्हा दाबा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.