ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘शोधाशोध’ मधून डिव्हाइस काढून टाकणे

तुम्ही शोधाशोध ॲपचा वापर करुन तुमच्या डिव्हाइस यादीमधून डिव्हाइस काढून टाकू शकता किंवा तुम्ही आधीच विकलेल्या किंवा दिलेल्या डिव्हाइसवरील सक्रियीकरण लॉक बंद करू शकता. जेव्हा तुम्ही सक्रियीकरण लॉक काढून टाकता, तेव्हा इतर कोणीही डिव्हाइस सक्रिय करू शकतो आणि त्याला त्यांच्या Apple अकाउंटशी कनेक्ट करू शकतात.

तुमच्याकडे अजूनही डिव्हाइस असल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील ‘शोधाशोध’ [डिव्हाइस] सेटिंग बंद करून सक्रियीकरण लॉक बंद करू शकता आणि तुमच्या अकाउंट मधून डिव्हाइस काढून टाकू शकता.

तुमच्या डिव्हाइसच्या यादीमधून डिव्हाइस काढून टाकणे

जर तुम्ही डिव्हाइस वापरण्याचा विचार करत नसाल, तर तुम्ही ते तुमच्या डिव्हाइसच्या यादीतून काढून टाकू शकता. तुम्हाला हे डिव्हाइस काढून टाकण्यासाठी ते ऑफ़लाइन असणे आवश्यक असू शकते.

जर डिव्हाइस सक्रियीकरण लॉक चालू असेल (तुमच्या iPhone, iPad, iPod touch, Mac, किंवा Apple Watch साठी), किंवा तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइससह ( AirPods किंवा Beats हेडफोनसाठी) पेअर केलेले असेल, तर पुढच्या वेळी डिव्हाइस ऑनलाइन आले की ते तुमच्या डिव्हाइसच्या यादीमध्ये येते.

  1. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • iPhone, iPad, iPod touch, Mac किंवा Apple Watch साठी : डिव्हाइस बंद करा.

    • AirPods साठी : AirPods त्यांच्या केसमध्ये ठेवा आणि झाकण बंद करा किंवा AirPods बंद करा.

    • Beats हेडफोनसाठी : हेडफोन बंद करा.

  2. तुमच्या iPhone वरील शोधाशोध ॲप वर जा.

  3. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या डिव्हाइसेसवर टॅप करा, नंतर ऑफलाइन डिव्हाइसच्या नावावर टॅप करा.

  4. ’हे डिव्हाइस काढून टाका’ वर टॅप करा, नंतर’काढून टाका’ वर टॅप करा.

MagSafe सह iPhone वॉलेट काढून टाकणे

तुम्ही MagSafe सह iPhone वॉलेट काढून टाकू शकता आणि तुम्हाला जर ते शोधाशोध ॲपमध्ये दिसू नये असे वाटत असेल तर तुमच्या डिव्हाइसच्या यादीमधील ‘शोधाशोध’ सपोर्ट मधून तुम्ही ते काढून टाकू शकता. ’शोधाशोध’ मधून काढून टाकल्यास दुसऱ्या कोणाला तरी ते त्यांच्या Apple अकाउंटशी कनेक्ट करण्याची अनुमती मिळते.

  1. तुमच्या iPhone वरील शोधाशोध ॲप वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या डिव्हाइसेसवर टॅप करा, त्यानंतर MagSafe सह तुमच्या iPhone वॉलेटच्या नावावर टॅप करा.

  3. ’हे डिव्हाइस काढून टाका’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुमच्या डिव्हाइसमध्ये सक्रियीकरण लॉक बंद करणे

तुम्ही डिव्हाइसची विक्री, देऊन टाकणे किंवा व्यापार करण्यापूर्वी, तुम्ही सक्रियीकरण लॉक काढून टाकायला हवे जेणेकरून डिव्हाइस तुमच्या Apple अकाउंट शी संलग्न राहणार नाही.

Apple सपोर्ट लेख पहा :

तुमच्याकडे नसलेल्या डिव्हाइसवरील सक्रियीकरण लॉक बंद करणे

जर तुम्ही तुमचा iPhone, iPad, iPod touch, Mac, किंवा Apple Watch विकले किंवा देऊन टाकले आणि तुम्ही ’शोधाशोध’ [डिव्हाइस] बंद करायला विसरला असाल, तरीही तुम्ही शोधाशोध ॲप वापरून सक्रीयीकरण लॉक काढून टाकू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील शोधाशोध ॲप वर जा.

  2. स्क्रिनच्या तळाशी असलेल्या डिव्हाइसेसवर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला काढून टाकायचे असलेल्या डिव्हाइसच्या नावावर टॅप करा.

  3. डिव्हाइस इरेझ करा.

    डिव्हाइस हरवले नसल्यामुळे, फोन नंबर किंवा संदेश प्रविष्ट करू नका.

    डिव्हाइस ऑफलाइन असल्यास, पुढच्या वेळी जेव्हा ते Wi-Fi किंवा मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होईल तेव्हा रिमोट इरेझ करणे सुरू होईल. डिव्हाइस इरेझ केल्यावर तुम्हाला ईमेल प्राप्त होतो.

  4. डिव्हाइसवरील सर्व इरेझ केल्यावर, ’हे डिव्हाइस काढून टाका’ वर टॅप करा, त्यानंतर ’काढून टाका’ वर टॅप करा.

    तुमचा सर्व कॉण्टेण्ट इरेझ केला गेला आहे, सक्रियीकरण लॉक बंद केले गेले आहे आणि आता दुसरी कोणीतरी व्यक्ती डिव्हाइस सक्रिय करू शकते.

तुम्ही iCloud.com वापरून ऑनलाइन डिव्हाइस देखील काढून टाकू शकता. सूचनांसाठी, iCloud यूझर गाइडमधील iCloud.com वरील ‘डिव्हाइस शोधा’ मधून डिव्हाइस काढून टाका पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.