ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPhone कॅमेऱ्याने QR कोड स्कॅन करणे

संकेतस्थळे, ॲप, कूपन, तिकीट आणि बऱ्याच गोष्टींच्या लिंकसाठी ‘त्वरित प्रतिसाद’ (QR) कोड स्कॅन करण्यासाठी तुम्ही तुमचा iPhone कॅमेरा किंवा कोड स्कॅनर वापरू शकता. कॅमेरा ऑटोमॅटिकली QR कोड ओळखतो आणि हायलाइट करतो.

QR कोड वाचण्यासाठी कॅमेरा वापरणे

  1. तुमच्या iPhone वर कॅमेरा उघडा.

  2. iPhone असा ठेवा जेणेकरून कॅमेरा फ्रेममध्ये QR कोड दिसेल.

  3. संबंधित संकेतस्थळ किंवा ॲपवर जाण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी दिसणाऱ्या नोटिफिकेशनवर टॅप करा.

टिप : iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, आणि iPhone 16 Pro Max वर, तुम्ही ‘कोड स्कॅनर’ उघडण्यासाठी ‘कॅमेरा कंट्रोल’ वापरू शकता. iPhone वर दुसरे ॲप उघडण्यासाठी कॅमेरा कंट्रोल वापरणे पहा.

‘कंट्रोल सेंटर’ मध्ये ‘कोड स्कॅनर’ समाविष्ट करणे

  1. कंट्रोल सेंटर उघडा.

  2. स्क्रीनच्या बॅकग्राउंडवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘कंट्रोल समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. कंट्रोल सेंटर गॅलरीमध्ये, ‘कोड स्कॅन करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘कंट्रोल सेंटर’ वर परत जाण्यासाठी स्क्रीनवर कुठेही टॅप करा.

    नोट : तुम्ही कंट्रोल सेंटरमध्ये ‘कोड स्कॅनर’ कंट्रोल समाविष्ट केल्यानंतर, भविष्यातील वापरासाठी तुम्हाला ते पुन्हा समाविष्ट करण्याची गरज नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.