ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

CarPlay सह टर्न बाय टर्न दिशानिर्देश प्राप्त करणे

टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश, रहदारीची स्थिती आणि प्रवासाचा अंदाजित वेळ (सर्व भागात उपलब्ध नाही) मिळवण्यासाठी Siri वापरा किंवा ‘नकाशा’ उघडा.

नोट : दिशानिर्देश मिळवण्यासाठी, iPhone इंटरनेटशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे, आणि ‘स्थान सेवा’ चालू केलेल्या असणे आवश्यक आहे. (iPhone वर तुम्ही शेअर करत असलेली स्थान माहिती नियंत्रित करणे पहा.)

CarPlay साइडबारमध्ये ‘नकाशा’, ‘संगीत’ आणि ‘दिनदर्शिका’ दाखवत आहे. उजवीकडे Apple Park पासून Apple यूनियन स्टेशनपर्यंतचा नॅव्हिगेशन मार्ग आहे.

मार्ग शोधणे

CarPlay तुमच्या ईमेल, टेक्स्ट संदेश, संपर्क आणि दिनदर्शिकेमधील पत्त्यांचा वापर करून तसेच तुम्ही वारंवार जाता त्या ठिकाणांचा वापर करून संभाव्य गंतव्यस्थान तयार करते. तुम्ही स्थान देखील सर्च करू शकता, तुम्ही जतन केलेल्या ठिकाणांचा ’आवडते’ म्हणून आणि संग्रहांमध्ये वापर करू शकता आणि जवळपासची आकर्षणे आणि सेवा शोधू शकता.

Siri : असे काहीतरी म्हणा :

  • “Find a gas station”

  • “Give me directions home”

  • “Take me to the Golden Gate Bridge”

  • “Find a charging station”

  • “Find coffee near me”

Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या

किंवा CarPlay मध्ये ‘नकाशा’ उघडण्यासाठी आणि मार्ग सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या वाहनाच्या बिल्ट इन कंट्रोलचा वापर करू शकता.

नोट : जर तुम्ही ‘CarPlay डॅशबोर्ड’ बघत असाल आणि नुकत्याच ॲपच्या यादीमध्ये डावीकडील ‘नकाशा’ दिसत नसेल, तर ‘नकाशा’ चा समावेश असलेल्या तुमच्या सर्व CarPlay ॲपची पृष्ठे पाहण्यासाठी होम बटण वर टॅप करा.

  1. CarPlay मध्ये ‘नकाशा’ उघडलेले असताना, पुढीलपैकी एक करा :

  2. अनेक मार्ग दिसल्यास, तुम्ही प्राधान्य दिलेला मार्ग सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या वाहनाच्या कंट्रोलचा वापर करा.

  3. तुम्ही निघण्यापूर्वी तुमच्या गंतव्यस्थानाला कॉल करण्यासाठी फोन बटण सिलेक्ट करा.

  4. टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश सुरू करण्यासाठी, ‘जा’ सिलेक्ट करा.

‘नकाशा’ तुमच्या सध्याच्या स्थानावरून दिशानिर्देश दाखवते.

जेव्हा तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आणि तुमच्या वाहनातून बाहेर पडता, तेव्हा पार्क केलेला कारचा मार्कर iPhone वर ‘नकाशा’ मध्ये दिसेल, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचा मार्ग शोधू शकता.

टर्न बाय टर्न दिशानिर्देशांचे पालन करणे

जेव्हा CarPlay तुमच्या प्रगतीचा मागोवा घेते, तेव्हा ते तुमच्या गंतव्यस्थानापर्यंतचे टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश सांगते.

तुमच्या ट्रिप दरम्यान कोणत्याही वेळी पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • तुमच्या ड्रायव्हिंग दिशानिर्देशांमध्ये स्टॉप समाविष्ट करा : तळाशी डावीकडील ETA डिस्प्ले सिलेक्ट करा, ’स्टॉप समाविष्ट करा’ सिलेक्ट करा, नंतर गंतव्यस्थान निवडा किंवा ते सर्च करण्यासाठी Siri चा वापर करा.

  • दिशानिर्देश कोणत्याही वेळी समाप्त करा : Siri ला “Stop navigating,” असे काहीतरी म्हणा किंवा खाली डावीकडील अंदाजित आगमन वेळ (ETA) डिस्प्ले सिलेक्ट करा, नंतर ‘मार्ग समाप्त करा’ निवडा.

  • टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश म्यूट करा : व्हॉल्यूम बटण वर टॅप करा, त्यानंतर सर्व दिशानिर्देश म्यूट करण्यासाठी म्यूट बटण निवडा.

  • अलर्ट्स आणि धोक्यांव्यतिरिक्त, टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश म्यूट करा : व्हॉल्यूम बटण वर टॅप करा, नंतर ‘केवळ अलर्ट्स’ बटण निवडा.

  • त्वरित वळसा घ्या : Siri ला “Find a gas station” असे काहीतरी म्हणा. किंवा ETA डिस्प्ले सिलेक्ट करा, ‘सर्च करा’ सिलेक्ट करा, ‘सुचवलेली सेवा’ सिलेक्ट करा, नंतर गंतव्यस्थान निवडा.

  • तुमचा ETA शेअर करा : तळाशी डावीकडील ETA डिस्प्ले सिलेक्ट करा, ‘ETA शेअर करा’ सिलेक्ट करा, नंतर सुचवलेले एक किंवा अधिक संपर्क सिलेक्ट करा.

    iOS 13.1, iPadOS 13.1 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या डिव्हाइसचा वापर करणारे लोक तुमच्या ETA द्वारे ‘नकाशा’ चे नोटिफिकेशन प्राप्त करतात, आणि ते ‘नकाशा’ मध्ये तुमच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. आधीचे व्हर्जन असलेल्या डिव्हाइसचा वापर करणारे लोक iMessage च्या माध्यमातून नोटिफिकेशन प्राप्त करतात. इतर मोबाइल डिव्हाइसचा वापर करणाऱ्या लोकांना एक SMS संदेश प्राप्त होतो. (मानक नेटवर्क प्रोव्हायडर डेटा आणि टेक्स्टचे दर लागू होऊ शकतात.)

    ETA माहिती पाठवणे थांबवण्यासाठी, CarPlay स्क्रीनच्या तळाशी ‘ETA शेअर करत आहे’ सिलेक्ट करा, त्यानंतर संपर्क निवडा.

नोट : ‘CarPlay डॅशबोर्ड’ ला सपोर्ट करणाऱ्या नॅव्हिगेशन ॲपसाठी, डॅशबोर्ड कोणतेही ॲप नॅव्हिगेट करत नसल्यास उघडलेले शेवटचे नॅव्हिगेशन ॲप, सक्रियपणे नॅव्हिगेट करणारे ॲप किंवा अनेक ॲप नॅव्हिगेट करत असल्यास शेवटी उघडलेले आणि सक्रियपणे नॅव्हिगेट करणारे ॲप दाखवते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.