ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Genmoji सह तुमचा स्वतःचा इमोजी तयार करणे

Apple Intelligence वापरून,* तुम्ही कस्टम इमोजी तयार करू शकता—ज्याला Genmoji म्हणतात. Genmoji कसा दिसावा असे तुम्हाला वाटते त्याचे फक्त वर्णन करा किंवा एखाद्या फ्रेंड आणि कुटुंबाच्या छायाचित्रांच्या आधारे तयार करा. तुम्ही संदेशांमध्ये Genmoji समाविष्ट करू शकता, त्यांना स्टिकर म्हणून किंवा Tapback आणि बरेच काही म्हणून शेअर करू शकता.

नोट : Apple Intelligence सर्व iPhone मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. ** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची आणि Apple Intelligence सुरू केलेले असल्याची खात्री करा.

संदेश ॲपमध्ये iPhone संभाषण दाखवत आहे. कीबोर्डच्या वर, स्क्रीनच्या मध्यभागी Genmoji दिसतो.

Genmoji तयार करणे

  1. ‘टेक्स्ट फील्ड’ वर टॅप करा, त्यानंतर इमोजी कीबोर्डवर स्विच करण्यासाठी इमोजी बटण किंवा पुढील कीबोर्ड ‘की’ वर टॅप करा.

  2. ऑनस्क्रीन कीबोर्डच्या वरच्या उजव्या बाजूला Genmoji बटण वर टॅप करा.

  3. ‘Genmoji चे वर्णन करा’ फील्डमध्ये “रेनबो कॅक्टस” सारखे वर्णन प्रविष्ट करा.

    तुमचा Genmoji सुधारण्यासाठी, फक्त वर्णन बदला. उदाहरणार्थ, जर मूळ वर्णन ‘Giraffe riding a unicycle,’ असे असेल, तर ‘Purple giraffe riding a unicycle,’ असे टाइप करा आणि नवीन वर्णनाशी जुळवून घेण्यासाठी तुमचा Genmoji अपडेट केला गेला आहे.

  4. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

  5. संदेशात Genmoji समाविष्ट करण्यासाठी, तुम्हाला वापरायचा असलेला Genmoji शोधण्यासाठी स्वाइप करा, त्यानंतर ’समाविष्ट करा’ वर टॅप करा.

छायाचित्रावर आधारित Genmoji तयार करण्यासाठी, तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये तुम्ही ओळखलेल्या व्यक्तीचे नाव प्रविष्ट करा, वर्णन समाविष्ट करा—उदाहरणार्थ, “डॅनी त्याचा पस्तीसाव्वा वाढदिवस साजरा करत आहे”—‘व्यक्ती निवडा’ वर टॅप करा, तुमच्या ‘छायाचित्र लायब्ररी’ मध्ये ओळखलेली व्यक्ती सिलेक्ट करा, नंतर व्हेरिएशन निवडा.

Genmoji हटवणे

  1. ‘टेक्स्ट फील्ड’ वर टॅप करा, त्यानंतर इमोजी कीबोर्डवर स्विच करण्यासाठी इमोजी बटण किंवा पुढील कीबोर्ड ‘की’ वर टॅप करा.

  2. उजवीकडे स्वाइप करा किंवा ‘स्टिकर्स’ बटण वर टॅप करा.

  3. ‘स्टिकर्स’ बटण वर टॅप करा, Genmoji ला टच आणि होल्ड करा, नंतर ‘काढून टाका’ वर टॅप करा.

तुम्ही ‘संदेश’ संभाषणामध्ये ॲप बटण वर टॅप देखील करू शकता, ‘स्टिकर्स’ वर टॅप करू शकता, Genmoji ला टच आणि होल्ड करू शकता, नंतर ‘काढून टाका’ वर टॅप करू शकता.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेलचा वापर करते आणि आउटपुट बदलू शकतात. अचूकतेसाठी महत्त्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence सर्व iPhone 16 मॉडेल्स, iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max वर बीटामध्ये उपलब्ध आहे, तसेच Siri आणि डिव्हाइसवर चीनी (सरलीकृत), इंग्रजी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, यूके किंवा यू.एस.), फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज (ब्राझील) किंवा स्पॅनिशमध्ये सेट केलेले आहे. काही फीचर्स कदाचित सर्व प्रदेश किंवा भाषांमध्ये उपलब्ध नसतील. अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.