ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘फाइल’ मध्ये फाइल आणि फोल्डर व्यवस्थापित करणे

फाइल ॲपमध्ये, तुम्ही फोल्डरमधील डॉक्युमेंट, इमेज आणि इतर फाइल व्यवस्थापित करू शकता.

फोल्डर तयार करणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्थान किंवा सध्याचे फोल्डर उघडा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘नवीन फोल्डर’ वर टॅप करा.

    नोट : तुम्हाला नवीन फोल्डर दिसत नसल्यास, तुम्ही त्या स्थानामध्ये फोल्डर तयार करू शकत नाही.

फाइल किंवा फोल्डरचे नाव बदलणे, कॉम्प्रेस करणे आणि त्यात इतर बदल करणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्थान किंवा सध्याचे फोल्डर उघडा.

  3. फाइल किंवा फोल्डरवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर पर्याय निवडा : कॉपी करा, मूव्ह करा, नाव बदला, कॉम्प्रेस करा, डुप्लिकेट तयार करा किंवा हटवा.

एकाच वेळी अनेक फाइल किंवा फोल्डरमध्ये बदल करण्यासाठी, अधिक बटण वर टॅप करा, ’सिलेक्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला बदलायचे असलेले फाइल किंवा फोल्डर सिलेक्ट करण्यासाठी ’सिलेक्ट करा’ वर टॅप करा, नंतर स्क्रीनच्या तळाशी असलेल्या पर्यायावर टॅप करा (उदाहरणार्थ, शेअर करा, मूव्ह करा किंवा हटवा).

नोट : तुम्ही सिलेक्ट केलेल्या आयटमनुसार काही पर्याय कदाचित उपलब्ध नसतील; उदाहरणार्थ, तुम्ही ॲप लायब्ररी (ॲपच्या नावाने लेबल केलेला फोल्डर) हटवू किंवा मूव्ह करू शकत नाही.

फाइल किंवा फोल्डर झिप किंवा अनझिप करणे

तुम्ही फाइल किंवा फोल्डर कॉम्प्रेस करण्यासाठी झिप करू शकता जेणेकरून ते तुमच्या iPhone वर कमी स्टोरेज स्पेस घेईल. तुम्ही कॉम्प्रेस केलेली फाइल किंवा फोल्डर अनझिप देखील करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. तुम्हाला झिप करायची असलेल्या फाइल किंवा फोल्डरवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘कॉम्प्रेस करा’ वर टॅप करा.

कॉम्प्रेस केलेली फाइल किंवा फोल्डर अनझिप करण्यासाठी, त्यावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘अनकॉम्प्रेस करा’ वर टॅप करा.

फाइल किंवा फोल्डर टॅग करणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्थान किंवा सध्याचे फोल्डर उघडा.

  3. फाइल किंवा फोल्डरला टच आणि होल्ड करा, ‘टॅग’ वर टॅप करा, नंतर एक किंवा अधिक टॅगवर टॅप करा.

  4. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

टॅग केलेले आयटम शोधण्यासाठी, ‘ब्राऊझ करा’ वर टॅप करा, नंतर ‘टॅग’ च्या खाली असलेल्या आयटमवर टॅप करा.

टॅग काढून टाकण्यासाठी, त्यावर पुन्हा टॅप करा.

फोल्डर ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्थान उघडा, फोल्डरला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘आवडते’ वर टॅप करा.

‘आवडते’ शोधण्यासाठी, ‘ब्राऊझ करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.