ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Safari मध्ये संकेतस्थळे शोधणे

संकेतस्थळे किंवा विशिष्ट माहिती शोधण्यासाठी ‘URL’ किंवा सर्च करण्यासाठी ‘शब्द' प्रविष्ट करा.

स्क्रीनच्या खालच्या भागात ऑनस्क्रीन कीबोर्ड असलेली Safari सर्च स्क्रीन. कीबोर्डच्या वर, सर्च फील्डमध्ये “भूकंप गेम स्कोअर” हे टेक्स्ट आहे.

वेबवर शोधणे

  1. तुमच्या iPhone वर Safari ॲपवर जा.

  2. सर्च फील्डमध्ये सर्च शब्द, वाक्यांश, किंवा URL प्रविष्ट करा.

  3. ‘सर्च सूचना’ वर टॅप करा, किंवा ‘कीबोर्डवर जा’ वर टॅप करा.

जर तुम्हाला सुचवलेले सर्च शब्द पाहायचे नसतील, तर सेटिंग  > ॲप > Safari वर जा, त्यानंतर ‘सर्च इंजिन सूचना’ बंद करा.

तुम्ही सर्च करत असताना तुमची आवडती संकेतस्थळे पाहणे

  1. सेटिंग  > ॲप्स > 'Safari' वर जा.

  2. ‘आवडते’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला पाहायचे असलेले ‘आवडते’ फोल्डर सिलेक्ट करा.

वेबपृष्ठ शोधणे

तुम्ही वेबपृष्ठावर विशिष्ट शब्द किंवा वाक्यांश शोधू शकता.

  1. तुमच्या iPhone वर Safari ॲपवर जा.

  2. ‘पृष्ठ सेटिंग’ बटण टॅप करा, त्यानंतर 'पृष्ठावर शोधा' बटण टॅप करा.

  3. सर्च फील्डमध्ये शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा.

  4. इतर उल्लेखांवर जाण्यासाठी ‘खाली जा’ बटण वर टॅप करा.

सर्च इंजिन निवडणे

  1. सेटिंग  > ॲप्स > 'Safari' वर जा.

  2. ‘सर्च इंजिन’ वर टॅप करा, त्यानंतर सर्च इंजिन निवडा.

तुमच्या छायाचित्रांमध्ये ऑब्जेक्ट शोधणे

'व्हिज्युअल लूक अप' सह तुम्ही तुमच्या छायाचित्रांमध्ये आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकप्रिय खुणा, वनस्पती, पाळीव प्राणी, आणि इतर गोष्टी ओळखू शकता आणि त्याबद्दल माहिती घेऊ शकता. तुमच्या छायाचित्रांमधील आणि व्हिडिओमधील ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी ‘व्हिज्युअल लूक अप’ वापरा पहा.

छायाचित्र ॲपमध्ये छायाचित्र उघडलेले आहे. स्क्रीनच्या खालच्या भागात, माहिती बटण ‘व्हिज्युअल लूक अप’ माहिती उपलब्ध असल्याचे दर्शविणारा आयकॉन डिस्प्ले करते.

टिप : तुम्ही हेच फीचर टेक्स्ट स्कॅन करण्यासाठी आणि ऑनलाइन सर्च करण्यासाठी वापरू शकता. तुमच्या iPhone कॅमेऱ्यासह लाइव्ह टेक्स्ट वापरणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.