ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील छायाचित्रामधील किंवा व्हिडिओमधील कॉण्टेंटशी संवाद साधण्यासाठी लाइव्ह टेक्स्ट वापरणे

लाइव्ह टेक्स्ट तुम्हाला ऑनलाइन सापडलेल्या तुमच्या छायाचित्रांमधील, व्हिडिओमधील आणि इमेजमधील टेक्स्ट ओळखते. तुम्ही ह्या टेक्स्टशी अनेकप्रकारे संवाद साधू शकता. कॉपी, शेअर किंवा भाषांतर करण्यासाठी तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता किंवा फोन कॉल करणे, संकेतस्थळ उघडणे किंवा चलन रूपांतरित करणे ह्यासारखी कामे करण्यासाठी तुम्ही ‘त्वरित कृती’ वापरू शकता.

लाइव्ह टेक्स्ट सपोर्ट केलेल्या मॉडेल वर उपलब्ध आहे आणि Safari, ‘छायाचित्र’, कॅमेरा, क्विक लुक आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये वापरले जाऊ शकते.

लाइव्ह टेक्स्ट चालू करणे

तुम्ही लाइव्ह टेक्स्ट वापरणे सुरू करण्यापूर्वी, सर्व सपोर्ट केलेल्या भाषांसाठी ते चालू केले असल्याची खात्री करा.

  1. सेटिंग  > सामान्य > ‘भाषा व प्रदेश’ वर जा.

  2. लाइव्ह टेक्स्ट चालू करा (हिरवा रंग चालू आहे).

छायाचित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये टेक्स्ट कॉपी करणे, भाषांतर करणे आणि तपासणे

  1. टेक्स्ट असलेले छायाचित्र उघडा किंवा व्हिडिओ पॉज करा.

  2. ‘टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टवर टच आणि होल्ड करा.

  3. विशिष्ट टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी ग्रॅब पॉइंट वापरा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :

    • टेक्स्ट कॉपी करा : नोट्स किंवा संदेश ह्यासारख्या दुसऱ्या ॲपमध्ये पेस्ट करण्यासाठी टेक्स्ट कॉपी करा.

    • सर्व सिलेक्ट करा : फ्रेममधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा.

    • तपासा : वैयक्तिकृत वेब सूचना दाखवा.

    • भाषांतर करा : टेक्स्टचे भाषांतर करा.

    • वेबवर सर्च करा : वेबवर सिलेक्ट केलेले टेक्स्ट तपासा.

    • शेअर करा : AirDrop, ‘संदेश’, ‘Mail’ किंवा इतर उपलब्ध पर्याय वापरून टेक्स्ट शेअर करा.

  4. छायाचित्र किंवा व्हिडिओवर परत जाण्यासाठी ‘सिलेक्ट केलेले टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा.

त्वरित कृतींसह छायाचित्र किंवा व्हिडिओमध्ये कामे करणे

छायाचित्र किंवा व्हिडिओच्या कॉण्टेंटनुसार, तुम्ही फोन कॉल करणे, दिशानिर्देश मिळवणे, भाषांचे भाषांतर करणे, चलन रूपांतरित करणे आणि इतर अनेक गोष्टी करण्यासाठी स्क्रीनच्या खाली असलेल्या ‘त्वरित कृती’ वर टॅप करू शकता.

  1. टेक्स्ट असलेले छायाचित्र उघडा किंवा व्हिडिओ पॉज करा.

  2. ‘टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या खाली असलेल्या ‘त्वरित कृती’ वर टॅप करा.

  4. छायाचित्र किंवा व्हिडिओवर परत जाण्यासाठी ‘सिलेक्ट केलेले टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा.

लाइव्ह टेक्स्ट सर्व प्रदेश किंवा भाषांमध्ये उपलब्ध नाही. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.